फूड स्टायलिस्ट - पाककृतींचा मेकप करणारी ही कोण माणसं?

By Admin | Updated: May 30, 2014 10:36 IST2014-05-30T10:36:28+5:302014-05-30T10:36:28+5:30

टीव्हीवरच्या वेगवेगळ्या रिअँलिटी शोंमुळे तमाम ‘मास्टर शेफ’ आता आपल्या चांगलेच परिचयाचे झाले आहेत. स्वयंपाक करणं म्हणजे काय बायकी काम, असं पुरुषांना आणि बायकांनाही वाटण्याचे दिवस इतिहासजमा होऊ लागलेत ही एक आनंदाची गोष्ट म्हणायची

Food Styalists - Who are the recipients of recipes? | फूड स्टायलिस्ट - पाककृतींचा मेकप करणारी ही कोण माणसं?

फूड स्टायलिस्ट - पाककृतींचा मेकप करणारी ही कोण माणसं?

>पाककलेत करिअर म्हणजे फक्त स्वयंपाक हे कुणी सांगितलं?
 
टीव्हीवरच्या वेगवेगळ्या रिअँलिटी शोंमुळे तमाम ‘मास्टर शेफ’ आता आपल्या चांगलेच परिचयाचे झाले आहेत. स्वयंपाक करणं म्हणजे काय बायकी काम, असं पुरुषांना आणि बायकांनाही वाटण्याचे दिवस इतिहासजमा होऊ लागलेत ही एक आनंदाची गोष्ट म्हणायची. आता अनेक मुलांनाही ‘मास्टर शेफ’ बनणं चॅलेंजिंग आणि इंटरेस्टिंग वाटायला लागलं हे चांगलंच.
मात्र पाककलेतली ही रुची करिअरच्या टप्प्यावर मात्र एक आणखी नवी वाट आता घेऊन आली आहे. त्याला म्हणतात ‘फूड स्टायलिंग.’ काही जण केटरिंग कोर्सेस करतात, मग फक्त ‘स्वयंपाकात’ स्पेशलायझेशन करतात. म्हणजे कुणाला इटालियन तर कुणाला जापनिज फूडमध्ये स्पेशलायझेशन करायचं असतं. पण हे फूड स्टायलिंग स्वयंपाकाच्या पुढचं एक पाऊल. आपण बनवलेल्या डिशला उत्तम मेकप करवून, सजवून धजवून पेश करण्याची ही एक कला.
आणि ज्या गतीनं भारतात हे क्षेत्र विस्तारत आहे ते पाहता येत्या पाच वर्षांत या क्षेत्रात ६0 लाख नोकर्‍या निर्माण होण्याची शक्यता आहे. फूड आणि फूड प्रोसेसिंग या क्षेत्रात गेल्या दोन वर्षांत ३५ टक्के वाढ झाली आहे. स्वयंपाक करणं, फूड ब्लॉग्ज-रायटिंग, स्टायलिंग, फूड टेस्टिंग, फूड फोटोग्राफी ही सगळी क्षेत्रं जोमानं वाढीस लागलेली आहेत.
 
फूड स्टायलिस्ट कोण असतात?
 
याला म्हणतात ‘फूड स्टायलिंग.’ काही जण केटरिंग कोर्सेस करतात, मग फक्त ‘स्वयंपाकात’ स्पेशलायझेशन करतात. म्हणजे कुणाला इटालियन तर कुणाला जापनिज फूडमध्ये स्पेशलायझेशन करायचं असतं.
पण हे फूड स्टायलिंग स्वयंपाकाच्या पुढचं एक पाऊल. आपण बनवलेल्या डिशला उत्तम मेकप करवून, सजवून धजवून फूड फोटोग्राफीसाठी अर्थात फोटोसेशनसाठी सज्ज करायचं हे त्यांचं मुख्य काम. जाहिरातीत, मासिकात ती विशेष डिश कशी दिसेल याची ते काळजी घेतात. मुख्य म्हणजे हे सारं करतात पदार्थाचा रंग, टेक्श्‍चर, त्याचा स्वभाव या सार्‍याचा त्यांना विचार करावा लागतो.
त्यामुळे डिश सजवणं म्हणजे काय वरवर खोबरं-कोथिंबीर टाकण्याचं काम असं समजू नका. हा जो कुणी फूड स्टायलिस्ट असतो त्याला स्वत:ला पदार्थाची उत्तम समज असणं आवश्यक असतं. त्याला उत्तम स्वयंपाक तर करता यावा लागतोच, पण त्याचबरोबर त्यामागचं पदार्थविज्ञान, सौंदर्यदृष्टी याचीही चांगली माहिती लागते. खाण्यावर आणि स्वयंपाकावर प्रचंड प्रेम असलेल्या माणसालाच हे स्टायलिंग उत्तम जमूू शकतं. 
 
स्कोप काय?
हे जग मोठय़ा वेगानं वाढत असताना एक्स्पर्ट माणसांची गरजही वाढते आहे. त्यामुळे फोटोग्राफी, जाहिरात, फूड र्जनालिझम यासह विविध प्रकारच्या केटरिंग संस्था, नवीन रेस्टॉरण्ट, सुपर मार्केट, फूड पॅकेजिंग इंडस्ट्री या क्षेत्रात कामाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.
 
 
प्रशिक्षण कुठे ?
१) मुळात कुठल्याही केटरिंग कॉलेजात या विषयावरची माहिती मिळू शकते. त्यासाठी जवळच्या हॉटेल मॅनेजमेण्ट स्कूलमध्ये संपर्क करून माहिती मिळवता येऊ शकेल.
२) हल्ली ऑनलाइन कोर्सेसही चालतात. त्यासाठी http://www.culinaryschools.org/  सारख्या साईट्सवरून माहिती घेता येईल.
 
 

Web Title: Food Styalists - Who are the recipients of recipes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.