पंचविशीत करायच्या 5 गोष्टी
By Admin | Updated: October 15, 2015 17:36 IST2015-10-15T17:36:07+5:302015-10-15T17:36:07+5:30
वयाच्या फार तर पंचविशीर्पयत आपण ‘फ्री’ असतो. नोकरी करून तातडीनं पैसे कमावण्याचं, लग्न करून ‘सेटल’ होण्याचं प्रेशर अनेकांवर नसतं.

पंचविशीत करायच्या 5 गोष्टी
>
वयाच्या फार तर पंचविशीर्पयत आपण ‘फ्री’ असतो. नोकरी करून तातडीनं पैसे कमावण्याचं, लग्न करून ‘सेटल’ होण्याचं प्रेशर अनेकांवर नसतं.
काहींवरचं ओझं ग्रॅज्युएशननंतर म्हणजे विशीनंतर वाढायला लागतं. पण तरी अनेकजण निदान वयाच्या पंचविशीर्पयत ब:यापैकी ‘फ्री’ असतात. मुक्त असतात. जबाबदा:यांचं ओझं नसतं आणि मनासारखं जगून घेण्याची संधी असते!
असं मनासारखं जगण्याची संधी सिनेमात मिळते. त्या ‘क्वीन’ सिनेमातल्या राणीला तर अपघातानंच मिळाली, तशी संधी आपल्याला काही मिळत नाही, ती आपल्याला मिळवावी लागते. तेव्हा जरा जगण्याचे काही स्पेशल अनुभव आपल्या गाठी लागतील. आता ज्यांना असं वाटतं की, कशाला जाऊ कॉलेजात, पाहू टीव्ही, जेवू-झोपू. कशाला उठाठेव. त्यांच्यासाठी हे सारं नाही.
पण ज्यांना वाटतं की, मस्त मुक्त जगावं, नवे अनुभव घेत नवीन जग पाहावं.
जगून घ्यावं त्यांच्यासाठी या पाच गोष्टी.
वयाची पंचविशी गाठण्यापूर्वी त्या कराच.
जेव्हा पन्नाशीत पोहचाल तेव्हा हेच दिवस फार सुंदर वाटतील.
1) एकटय़ानं राहा.
शक्य असेल तर एकदा तरी घरापासून, आईबाबांपासून, स्वत:च्या शहरापासून लांब राहून पाहा. एकटे राहा. जमल्यास स्वत:पुरते पैसे स्वत: कमवा. त्यासाठी पार्टटाइम नोकरी करावी लागली तरी चालेल! स्वत:ची जबाबदारी अशी स्वत: घेता आली की आपले सारे अॅटिटय़ूड गळून पडतात. नवा आत्मविश्वास मिळतो, धमक वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेवाईट अनुभव आपली नजर तयार करतात. हे ‘एकटं’ राहणंच आपल्याला सांगतं की, चांगलं वागलं नाही तर खड्डय़ात पडशील. त्यामुळे खड्डे टाळूनही नव्या वाटांवर चालण्याचं बळ यातूनच मिळतं.
2) प्रवास करा. भटका. वाट्टेल तसं.
बसू नका. चालायला लागा. हाच एक मंत्र. म्हणजे काय तर खूप भटका. पायी चाला, सायकलवर जा, बाईकवर जा, बसने जा. शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, शेअरिंग रिक्षा, बस, टमटम, टेम्पो जे मिळेल ते. त्यानं पैसे वाचतील, माणसं भेटतील. लांब जायचं नसेल तर आपल्या गावात जा. गावातून तालुक्याला, तिथून जिल्हा. मग आपला देश पाहा. आणि जमलंच तर पैसे साठवून एक परदेश प्रवासही स्वत:च्या हिमतीवर करून या. बघा. काय काय भेटतं वाटेत ते!
3) जुने मित्र कशाला?
जुन्या मित्रंची दोस्ती घट्ट. आजही शाळेपासूनचेच मित्र माङयाशी बोलतात. हे ऐकायला चांगलं वाटलं, तरी ते अनुभव नवीन देत नाहीत. त्यामुळे आपल्या भाषेचे नसलेले, जातिधर्माचे नसलेले, प्रांताचे नसलेले मित्र करा. त्यांची दोस्ती नव्या गोष्टी सांगेल. नवीन संस्कृती दाखवेल, नवे पदार्थ खाऊ घालेल. हे सारं नवीन असेल. त्यामुळे त्याच त्या दोस्तांचं वतरुळ सोडा, नवे मित्र करा.
4) कार्यकर्ते व्हा.
म्हणजे काय तर जवळच्याच एका सामाजिक संस्थेत, उपक्रमात भाग घ्या. तिथं काम करून पाहा. त्यानिमित्तानं कामाचा अनुभव तर मिळेलच, पण आपल्या नजरेचे परीघही बदलतील. नवी माणसं दिसतील. ओळखी होतील. त्यामुळे नाटक करा, पथनाटय़ करा, वेगळ्या उद्योगांना भेटी द्या. समजून घ्या, जेवढं जमेल तेवढं, जमेल तसं!
5) विसरून जा.
म्हणजे काय तर आपण कसं भारी काहीतरी करतोय याचे पाढे फेसबुक-व्हॉट्सअॅपवर वाचू नका. तेच ते शेअरिंग करू नका. झालं ते विसरून जा. चांगले वाईट अनुभव अगदी व्यक्तिगतही असतील तरी ते विसरून जा. आणि मुक्त मनानं नवनवे अनुभव घेत रोज नवीन काहीतरी करून पाहा.
अगदी चित्र काढा, गाणं म्हणा, सायकलिंग करा, झाडं लावा.
पण जे काल केलं, त्यापेक्षा वेगळं काही आज करून पाहा..
निशांत महाजन