मिसळ-र्ती हकळ डाएट चिवडा

By Admin | Updated: November 5, 2015 21:57 IST2015-11-05T21:57:50+5:302015-11-05T21:57:50+5:30

सगळं नवं काही पचत नाही, सगळं जुनं सुटत नाही. तेव्हा मग या दोन्हींचा थोडा थोडा हात धरत जे ‘मध्यम’ जगणं

Fine-hearted Diet Choice | मिसळ-र्ती हकळ डाएट चिवडा

मिसळ-र्ती हकळ डाएट चिवडा

 सगळं नवं काही पचत नाही,

सगळं जुनं सुटत नाही.
तेव्हा मग या दोन्हींचा
थोडा थोडा हात धरत
जे ‘मध्यम’ जगणं
आकार घेतं ते फ्यूजन.
आणि त्याची झलक 
सध्या बाजारपेठेतही दिसतेय!
ॅफ्यूजन
-हा असा एक शब्द आता नव्यानं आपल्या आयुष्याला वेढतो आहे.
सर्वच अर्थानं!
आपण ना जुनाट आहोत, ना मॉडर्न.
ना धड पूर्ण पारंपरिक आहोत ना धड पूर्ण आधुनिक.
जुनं आपल्याच्यानं सुटत नाही, नवं आपण  पूर्ण स्वीकारत नाही.
आपण कायमच अधलेमधले.
ते चांगलं की वाईट?
त्यानं बरे परिणाम होणार की, वाईट याचा खल करत बसायचा तर वेगळी चर्चा करता येईल!
पण ती आत्ता ऐन दिवाळीत नको.
आता मुद्दा एवढाच की, आपण थोडे देसी आहोत, थोडे ग्लोबल होतो आहोत.
थोडे मॉडर्न लूकवाले आहोत, थोडे खुर्द-ब्रुद्रूकवाले..
आणि त्यात कमीपणा वाटायला पाहिजे असंही काही नाही..
कारण नव्या-जुन्याचा मेळ घालत, जे जे चांगलं, ते ते घेत आपण आपल्या आयुष्याचा गोफ विणत चाललो आहोत..
तो गोफ सुंदर विणला जावा हीच आपली इच्छा असते, म्हणून तर प्रत्येक गोष्टीत आपण टोकाची भूमिका न घेता काहीतरी सुवर्णमध्य काढत मधला मार्ग स्वीकारतो.
मग आपले सणवार तरी त्याला अपवाद कसे असतील?
आणि विशेषत: दिवाळीसारखे मोठे सण!
पारंपरिक दागिने, कपडे, अगदी भांडीही यानिमित्तानं बाहेर निघतात. वर्षभर चिवडा-चकल्या-लाडू मिळूनही दिवाळीतला ‘फराळ’ हा महत्त्वाचा असतोच. त्याची सर वर्षभरातल्या पदार्थाना नसतेच!
तसंच हे, वर्षभर जे मिळतं ते मिळतंच. दिवाळी फराळ हवा.
पण तळलेल्या करंजीपेक्षा बेक्ड करंजी ट्राय करून पाहण्याचा उत्साहही असतोच.
लो कॅलरी फराळाचं फॅडही डोकं वर काढतंच.
आणि नेहमीच्या साटो:याबरोबर गुलकंद बेक्ड साटोरीही ट्राय करून पाहण्याचा मोह होतोच..
 म्हणजे काय तर मिसळ तर हवीच, र्तीही हवी पण त्यात डाएट चिवडा घालायचा.
म्हणजे सुख मिसळीचंही, डाएट केल्याचंही!
फ्यूजन म्हणतात ते यालाच!
मधला मार्ग काढत दोन गोष्टींची सरमिसळ करत आपल्याला आवडेल ते घेणं हे फ्यूजनचं एक रूप.
म्हणून तर या दिवाळीत मार्केटमधे जा..
हे फ्यूजन सगळीकडे दिसेल..
मिठायांमधे, कपडय़ांमधे, वस्तूंमधे, अगदी रांगोळीच्या साच्यांमधेही!
नवं-जुनं एकत्र हवं ही नवीन मानसिकता..
त्या ग्राहक मानसिकतेचा मार्केटही उत्तम वापर करतं आहे..
आणि त्यातून निर्माण होतेय एक वेगळी संस्कृती. एक वेगळी ओळख.
फ्यूजनची आणि आपलीही!
म्हणून यंदा दिवाळीत स्वत:चा लूक ठरवताना आपणही असाच फ्यूजन विचार करतोय का?
जरा तपासून पाहूच..
 
- निशांत महाजन

Web Title: Fine-hearted Diet Choice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.