फॅशन म-हाटी शोभल तुला.

By Admin | Updated: March 20, 2015 15:57 IST2015-03-20T15:57:59+5:302015-03-20T15:57:59+5:30

खणाच्या कापडाची कुर्ती; तशीच मॅचिंग खणाची चप्पल आणि लेगिन्स? येस, इट्स फॅशन मराठी!!

Fashion mahati bhagal bula | फॅशन म-हाटी शोभल तुला.

फॅशन म-हाटी शोभल तुला.

 
लग्न ठरलंय;
बाकी सगळं शॉपिंग झालंय;
पण डिझायनर नऊवारी कुठं मिळत नाही?
डिझायनर साडी?
आणि तीही नऊवारी?
- का नसावी?
घागरा-शरारा-लेहंगा
रिसेप्शनला घालता येतोच;
पण लग्नात विधींना 
ट्रॅडिशनल नऊवारी साडीच हवी
आणि तीही न-ऊ-वा-री!
शिवलेली नको;
चक्क स्पेशल डिझाईन केलेली,
एकदम टिपिकल मराठी ट्रॅडिशनल!!
लग्नविधींसाठी नऊवारी साडी डिझाईन करून घेण्याचा एक खास ट्रेण्डच आता सुरू झाला आहे.
 
*****
चिंचपेटी?
कोल्हापुरी साज?
मोहनमाळ?
केसात माळायची गुलाब आणि कमळफुलं?
हे सारं जुनाट झालंय,
हा समज खोटा!
आता हेच सारं नव्यानं,
फॅशनचा भाग होतं आहे!
***
 
महाराष्ट्रीय ‘ओळखी’च्या खाणाखुणा
आता फॅशन्स म्हणून
अंगावर पुन्हा एकदा दिसायला लागल्या आहेत.
उद्याच्या गुढीपाडव्यानिमित्त
एक स्पेशल लूक 
या ‘फॅशन मराठी’ नामे ट्रेण्डवर!
- ऑक्सिजन
 

 

Web Title: Fashion mahati bhagal bula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.