Fake followers are sold, bought on social Media but who are these fake followers? | फेक फॉलोअर्स विकले जातात , विकत  घेतले  जातात , मात्र हे फेक  काम  करणारे असतात  कोण ?

फेक फॉलोअर्स विकले जातात , विकत  घेतले  जातात , मात्र हे फेक  काम  करणारे असतात  कोण ?

-मनीषा म्हात्रे

गेल्या काही वर्षात जाहिरात क्षेत्रत सोशल मीडियाचं प्राबल्य वाढलं आहे. उत्पादक आपल्या उत्पादनाची जाहिरात जास्तीत जास्त लोकांर्पयत पोहोचविण्याच्या प्रयत्नात असतात. 
मात्र नेहमीच्या जाहिरातींपेक्षा कुणी सेलिब्रिटीने जर त्या उत्पादनाविषयी माहिती दिली तर त्याचा प्रभाव वाढतो असं दिसतं. त्यामुळे ज्या सेलिब्रिटीचे चाहते जास्त त्याचे मूल्यही अधिक. त्यामुळे जाहिरातदार अशा व्यक्तीकडे आकर्षित होऊ लागले. यातच अशा फेक फॉलोअर्सनं डोकं वर काढण्यास सुरुवात केली. सध्याच्या स्पर्धेच्या जगात त्यांची मागणीही वाढली. आणि फेक फॉलोअर्सचं एक भलतंच जग उभं राहिलं.
चेक या सायबर सुरक्षेबाबत कार्यरत असलेल्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, या फेक फॉलोअर्समुळे जाहिरात कंपनीना नऊ कोटींचा फटका बसला आहे. 
धक्कादायक बाब म्हणजे या रॅकेटमध्ये शिक्षित तरुणच जास्त सहभागी आहेत. गुन्हे गुप्तावार्ता विभागाच्या (सीआययू) कारवाईतून हे उघड झालं आहे. सीआययूचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी फॉलोअर्स कार्ट या संकेतस्थळाचा पर्दाफाश केल्यानंतर बनावट चाहते प्रकरणाचा घोटाळा उघडकीस आला.
यात सुरुवातीला अविनाश दवडे नावाच्या तरु णाला अटक झाली. कुर्ला परिसरात राहणारा अविनाश पदवीधर. एका पीआर कंपनीत नोकरीला असताना, त्याला फॉलोअर्स कार्ट संकेतस्थळाबाबत माहिती मिळाली. त्यातूनच पीआरची नोकरी सोडून तो यात अडकला. त्याने फॉलोअर्स कार्ट या संकेतस्थळामार्फत हजारो बनावट फॉलोअर विकत घेणा:या 176 जणांसाठी काम केलं. यात मुंबई, अहमदाबादसह देशभरातील चित्रपट आणि मालिका विश्वातील तारे-तारका, फोटोग्राफर, निर्माते, दिग्दर्शकांचा समावेश आहे. या संकेतस्थळाने समाजमाध्यमांवर अस्तित्व असलेल्या, नसलेल्या व्यक्तीच्या नावाचा, फोटोचा वापर करत फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर लाखो बनावट खाती तयार केली. या संकेतस्थळाचा सव्र्हर फ्रान्समध्ये आहे.  तर  1क्क् पेक्षा जास्त सोशल मीडिया मार्केटिंग पोर्टल या रॅकेटमध्ये सहभागी आहेत.  बनावट फॉलोअर्स, खोटय़ा ओळखी किंवा बॉट्सद्वारे हे पोर्टल काम करतात. हे रॅकेट भारतीय तसेच परदेशी इंटरनेट नेटवर्क व सव्र्हरद्वारे कार्यरत आहे. अशी 54 संकेतस्थळं वाङो यांच्या पथकाने शोधून काढली आहेत.
याच तपासादरम्यान जोगेश्वरीत राहणारा सिव्हिल इंजिनिअरिंग केलेला कशिफ मन्सूर पथकाच्या हाती लागला.
त्याने  एवीएमएसएमएम नावाची कंपनी थाटून हा धंदा सुरू केला होता. 


त्याच्या चौकशीत त्याने आतार्पयत 25 हजार जणांना दोन कोटी 30 लाख बनावट फॉलोअरची विक्री केली आहे. यात, सुरुवातीला बनावट अकाउण्टद्वारे त्याने चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी धडपड करणा:यांना टार्गेट केले. यात, रेटकार्ड दाखवून तो फॉलोअरची विक्री करत होता. ही कलाकार मंडळीही त्याच्या जाळ्यात अडकली. प्रसिद्धीसाठी त्यांनी बनावट फॉलोअरचा आधार घेतला आहे. यात, मन्सूरने कोटय़वधी रुपये कमावले आहेत.


अशी ही फेक फॉलोअर्सची दुनिया. जिला भुलून भलतेच व्यापार इथं सुरू असतात.
याच रॅकेटमधील ठगांनी बॉलिवूड पाश्र्वगायिका भूमी त्रिवेदी सोबतच्या बनावट चॅटिंगच्या स्क्रीनशॉटचा वापर करत तिच्या फॉलोअर कलाकार मंडळीची फसवणूक केली. तर ओशिवरा परिसरात राहणा:या अभिनेत्री कोयना मित्र हिच्या फोटो आणि नावाचा वापर करत बनावट इन्स्टाग्राम अकाउण्ट तयार केल्याचे 3 जुलै रोजी तिच्या निदर्शनास आले. त्याचे जवळपास 36 हजार फॉलोअर होते. या अकाउण्टच्या माध्यमांतून कोणी तरी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याने तिने याबाबत मित्रमैत्रिनींनाही अवगत केले. तसेच इन्स्टाग्रामवर अधिकृत अकाउण्टसाठी आधार कार्डसह अन्य कागदपत्रे जमा केले. मात्र इन्स्टाग्रामने कागदपत्रची पडताळणी न करता 9 तासांतच तिचे अकाउण्ट रद्द केले. अखेर तिने 7 जुलै रोजी ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देत याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार हे प्रकरण पुढील तपासासाठी सीआययूकडे वर्ग करण्यात आले आहेत. तिचे बनावट फॉलोअर्स आणि यू-टय़ूब चॅनल हटविण्यात आले.

हे सगळं चालतं कसं?
सध्या भारतात इन्स्टाग्रामवरून सोशल मीडिया मार्केटिंगवर (एसएमएम) अधिक भर आहे. सामाजिक संदेशाआड ब्रॅण्डचा प्रचार करण्यात येत आहे. यातच बॉट्स या सॉफ्टवेअरद्वारे एकाच वेळी हजारो बनावट खाते तयार करून चाहत्यांचा आकडा कृत्रिमरीत्या फुगवून देणारी यंत्रणा कार्यान्वित झाली. सोशल नेटवर्कच्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणोत हे फेरफार करून अशा बनावट प्रोफाइल पोस्ट करतात. यात, चाहते, लाइक्स, कमेंट तसेच चाहत्यांचे वय, स्री, पुरुषा, तरुण, तरुणी याची विभागणीही बोगस असते. 
 ..

प्रसिद्ध अभिनेत्रीचे 45 टक्के बनावट फॉलोअर्स..
इन्स्टिटय़ूट ऑफ कंटेम्परी म्युङिाकने गेल्या वर्षी बनावट फॉलोअर प्रकरणी प्रसिद्ध कलेल्या अहवालात बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये भूमिका बजावणा:या दोन बडय़ा अभिनेत्रीचे 45 टक्क्यांहून अधिक बनावट चाहते असल्याचा दावा केला होता. हा अहवालही सीआययूने चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे. त्यामुळे गरज पडल्यास त्यांनाही चौकशीसाठी बोलावू शकतो, असे एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले. 

पीआर कंपनी रडारवर
बनावट चाहते प्रकरणात चौकशीसाठी बोलावलेल्या 18 पैकी 12 सेलिब्रिटींचे जबाब नोंद करण्यात आले आहेत. त्यांच्या चौकशीत त्यांनी त्यांचे काम पीआर कंपनीना दिले होते. त्यामुळे यात पीआर कंपनीच्या माध्यमांतून याला खतपाणी मिळत असल्याच्या संशयातून संबंधित पीआर कंपनीनाही समन्स बजावून चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहेत.


(मनीषा लोकमतच्या मुंबई आवृत्तीत  गुन्हे वार्ताहर आहे.)
 

Web Title: Fake followers are sold, bought on social Media but who are these fake followers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.