डोळे गाल ओठ

By Admin | Updated: December 11, 2014 20:04 IST2014-12-11T20:04:07+5:302014-12-11T20:04:07+5:30

लग्नसराई सुरू झाली, आपलं नसलं तर ना सही, मित्रमैत्रिणींची, भावाबहिणींची लग्न असतातच या काळात,

Eyes cheek lip | डोळे गाल ओठ

डोळे गाल ओठ

 

धनश्री संखे, ब्युटी एक्सपर्ट - 
 
लग्नसराई सुरू झाली, आपलं नसलं तर ना सही, मित्रमैत्रिणींची, भावाबहिणींची लग्न असतातच या काळात, कुणाची बारशी, कुणाची पार्टी, आणि इयर एण्ड सेलिब्रेशन ते तर असतंच. 
आणि आपल्याला काहीतरी ‘खास’ ट्राय करायचं असतं. नेहमी दिसतो त्यापेक्षा वेगळं दिसायचं असतं. मग नेहमीचा प्रश्न, पण त्यासाठी करायचं काय? चेहर्‍यावर मेकपचे थर चोपडले तर भयाण दिसतं कधीकधी, आणि नेमकं पण थोडंसंच काय करावं ते कळत नाही. त्यासाठीच या काही टिप्स.
स्पेशल मेकअपसाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचे गाल, डोळे, आणि ओठ यांना जरी पुरेसं हायलाइट केलं ना, तरी तुमचा लूक एकदम खास दिसू शकतो.
फारच खास आणि वेगळं दिसायचं असेल तर तुम्ही खोट्या आयलॅशेस अर्थात बाजारात मिळणार्‍या कृत्रिम पापण्या लावू शकता. डोळ्यांचा खास ‘शिमर’ म्हणजेच चकाकीवाला मेकअप झाला की, गालांसाठी विशेष कॉम्प्लेक्शन ट्राय करू शकता.
लग्न असेल, खूप फोटो काढायचे असतील, तर कायम मॅट कलरच मेकअपसाठी वापरा. त्यात थोडासाच शिमर मिसळा कारण अतिचकाकीनं तुमचे फोटो बिघडू शकतात.
त्यात काहीजण काय करतात एकाच वेळी डोळे, गाल, ओठ यांचा एकाचवेळी मेकअप करतात. तसं करू नये. एकावेळी डोळे आणि ओठ, एवढेच हायलाइट करावेत.  मात्र तिन्हीकडे एकदम मेकअपचे थर चढवू नयेत.
गालांचा मेकअप म्हणजे फाउण्डेशन वापरणं आलं. ते सरसकट कुठलंही वापरू नये. कुठलंही फाउण्डेशन आधी तुमच्या हनुवटीच्या कडेला लावून पहा, ते चांगलं दिसलं, तर लावा. अनेक मुली एक चूक हमखास करतात. फाउण्डेशन तुमच्या हेअरलाइनच्या अर्थात चेहर्‍याला लागून असलेल्या केसांशी नीट ब्लेंण्ड व्हायला हवं, ते तसं नाही केलं तर वाईट दिसतंच. त्यामुळे फाउण्डेशन नीट लावून उरलेलं सगळं, कापसानं नीट पुसून घ्या.
आयश्ॉडो लावताना ते तुमच्या ड्रेसशी नीट मॅच होईल, त्याला सुट होईल असंच लावा. शक्यतो मीडियम टोनचेच कलर्स वापरा, ते हल्ली बाजारात भरपूर मिळतात. ते लावणं सोयीचं.
 लिप्स्टिक लावण्यापूर्वी पेन्सिल लिप्स्टिक शार्पनरने चांगली शार्प करून घ्या. वरच्या ओठाच्या आउटर कॉर्नरपासून सुरू करा. नीट आउटलाइन काढून लिप्स्टिक लावा. लिक्विड लिप्स्टिक वापरणार असाल तर नीट सुकू द्या.
 
 

Web Title: Eyes cheek lip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.