हर रंग कुछ कहता है.
By Admin | Updated: December 25, 2014 18:34 IST2014-12-25T18:34:51+5:302014-12-25T18:34:51+5:30
कुठला रंग कुठे आणि कधी वापरायचा? रंगांचं आणि आपल्या मूडचं काही कनेक्शन असतं का?

हर रंग कुछ कहता है.
>
प्राची खाडे, स्टायलिस्ट आणि ब्यूटी एक्सपर्ट
कुठला रंग कुठे आणि कधी वापरायचा? रंगांचं आणि आपल्या मूडचं काही कनेक्शन असतं का?
-------------
रंग आणि भावना यांचं एक परस्पर नातं असतं. एखादा रंग पाहिला की विशिष्ट भावना निर्माण होते. त्यामुळेच कुठले रंग कुठे आणि कधी घालावेत याचं एक तंत्र आहे. ते शिकून घेतलं तर आपल्या भावना आणि रंग यांचा मेळ घालून आपण आपलं स्टाइल स्टेटमेण्टही उत्तम ठेवू शकतोच.
पण ते करायचं कसं, असा प्रश्न पडतोच.
त्याचं उत्तर मी तरी एकच देते, खिडकीतून जरा बाहेर पहा. अवतीभोवतीचे रंग पहा. म्हणजे काय तर पावसाळ्यात सगळीकडे हिरव्या रंगाच्या अनंत छटा दिसतात. मातीचे रंग दिसतात. काही करडय़ा छटा दिसतात. भरून आलेल्या आभाळाचा रंगच वेगळा दिसतो.
अशावेळी जे रंग बाहेर दिसत नाहीत ते आपण घालावेत. ब्राईट यलो, ऑरेंज, पिंक, पीच असे रंग घातले की एकसारख्या वातावरणात तुम्ही उठून दिसाल. हाच नियम सगळ्या ऋतूंमधे वापरायचा.
त्यामुळे अनेकदा बाहेरच्या वातावरणामुळे जे उदास वाटतं, ते आपण या रंगांमुळे टाळू शकतो.
मात्र होतं काय, आपण आपल्याला जो रंग आवडतो तोच कायम घालतो. अमुक रंग आपल्याला चांगलाच दिसत नाही असंही अनेकांच्या डोक्यात असतं. ते सारं बाजूला ठेवून आपण सगळे रंग वापरायला हवेत. ज्या रंगांचे कपडे टाळतो ते निदान आपल्या अॅक्सेसरीजमधे तरी आलेच पाहिजेत.
नव्या वर्षात जे कपडे घ्याल ते घेताना त्यांच्या रंगांचे अर्थ जरा समजून घ्या. आणि कुठले रंग आपल्या आयुष्यात अॅड करणं आवश्यक आहेत हे समजून त्याप्रमाणो रंग वापरा.
येणारं वर्ष तुम्हाला अत्यंत सुंदर रंगांनी नटलेलं जावो याच शुभेच्छा.
> पांढरा
पांढरा रंग हा स्वच्छतेचं, शांततेचं आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक. तुम्ही पांढरा रंग घालता म्हणजे दिवसाची सुरुवात स्वच्छ मनानं करता, स्वत:ला आणखी एक संधी देता. तुमच्या व्यक्तिमत्त्वालाही एक प्रसन्न, ब्राईट आयाम देत इतरांनाही तसा फील देता.
> काळा/करडा
हे रंग म्हणजे स्वत:ला लो प्रोफाईल ठेवणं. आपल्याकडे दुस:याचं लक्ष न वेधून घेणं. तुम्हाला तेच अपेक्षित असेल तर जरूर काळा/करडा रंग वापरा. मात्र तसं तुमचं इण्टेन्शन नसेल तर मात्र काळा रंग वापरू नका.
> लाल
लाल म्हणजे सत्तेचं प्रतीक. एक पॉवरफुल कलर. आपण कॉन्फिडण्ट आहोत असं तुम्हाला दाखवायचं असेल तर लाल नक्की घाला. अर्थात मुलाखतीला लाल रंगाचे कपडे घालू नयेत. अति लाल वापरू नये. कारण जी माणसं बुजरी असतात ती या भडक लालमुळे आणखीन घाबरून जातात. त्यामुळे कमीत कमी शेड्स, मरुन कलर वापरा. त्यातून एक कॉन्फिडन्स मिळेल.
> निळा
निळा हा शांत रंग. एक कम्फर्ट झोनचं फिलिंग हा रंग देतो. ज्यादिवशी तुम्हाला थोडं नव्र्हस, थोडं उदास वाटत असेल तर नक्की निळा रंग, निळ्याच्या शेड्स वापरा.
> हिरवा
हिरवा म्हणजे समृद्धीचा, निसर्गाचा रंग. तुम्हाला जेव्हा नवीन सुरुवात करायची, क्रिएटिव्ह फील द्यायचा, तर जरूर हिरव्या छटांचा वापर करा.
> यलो
सूर्याचा सोनसळी रंग. तो ऊर्जा देतो. हे कपडे नक्की तुमचा मूड मस्त ठेवतील. तुम्हाला उमेद देतील.
> ऑरेंज
हा एनर्जीचा रंग. केशरी रंग घातला की तुम्हालाही एकदम क्रिएटिव्ह-उत्फुल्ल वाटू लागेल.
> पर्पल
ज्यादिवशी तुम्हाला ‘स्पेशल’ फील करावंसं वाटत असेल, चारचौघात भाव खायचा असेल तर नक्की पर्पल वापरा.
> गुलाबी
गुलाबी हा प्रेमाचा रंग. असं छान कनेक्टेड-रोमॅण्टिक वाटायचं असेल तर गुलाबी रंगाच्या छटा वापराच.