एन्जॉय!!!
By Admin | Updated: December 11, 2014 20:49 IST2014-12-11T20:49:16+5:302014-12-11T20:49:16+5:30
डीअर फ्रेण्ड्स. तसं पाहिलं तर हे दिवस काही ‘सिरीयस’ टॉपिकवर सिरीयस्ली बोलावेत असे नाही. छान गुलाबी थंडीचे रोमॅण्टिक दिवस.

एन्जॉय!!!
>
- ऑक्सिजन टीमoxygen@lokmat.com
डीअर फ्रेण्ड्स. तसं पाहिलं तर हे दिवस काही ‘सिरीयस’ टॉपिकवर सिरीयस्ली बोलावेत असे नाही.
छान गुलाबी थंडीचे रोमॅण्टिक दिवस.
लांबच लांब थंडगार रात्रींचे, कोवळ्या उन्हाचे आणि शेकोटीशी रंगणार्या उबदार गप्पांचे.
एरवी भल्या थंडीत तोंडावरचं पांघरूण काढवत नाही, मस्त गुरफटून उन्हं अंगावर पडेपर्यंत झोपून राहावंसं वाटतं.
पण कॉलेज तर नेमकं सकाळीच.
जायला तर हवंच! (लेरसाठी कोण म्हणतं?) कट्टय़ासाठी जायला हवं! कॅण्टीनमधली मिसळ, कट्टय़ावरच्या गप्पा आणि नेहमीच्या टपरीवरच्या कटिंग चहासाठी तरी जायलाच हवं. म्हणजे खरंतर जावंच लागतं! त्यात आता कॉलेजात वेगवेगळे ‘डेज’ सुरू झालेत.
मस्त नटूनथटून डेक्टप होऊन जाण्याचे आणि फोटोबिटो काढून मकडण्याचे, शाईन मारण्याचे हे दिवस.
इम्प्रेस करण्याचे आणि व्हायचेही दिवस!
या अशा दिवसांत कुणी जरा सिरीयस टॉपिकवर बोललं तर सगळा कट्टा त्याला ‘प्लीज यार बोअर मारू नको’ म्हणत गप्प बसवणार!
सो, डोण्ट वरी!
नो डोसपिलाओ कार्यक्रम टूडे!
मस्त एन्जॉय करा, सगळे डेज.
आपण फार बुद्धीमान, आपण नाही करत असला उल्लूपणा म्हणत लायब्ररीत उगीच घुसू नका. म्हणजे लायब्ररीत जा, पण हे सारं ‘मिस’ करू नका. कारण हा सारा रोमान्स, हे दिवस, हे मित्रमैत्रिणी, हे पागलपण एकदा आयुष्यातून गेलं की परत येत नाही.
तसला उल्लूपणा करण्याची परवानगीही आयुष्य कधी देत नाही. तेव्हा, भान ठेवून मजा करा, होष आणि जोष दोन्हीही काबूत ठेवून धम्माल करा.
रोमॅण्टिक व्हायचे बहाने आहेत, व्हा रोमॅण्टिक.
आणि म्हणूनच आजच्या अंकातही सेलिब्रेशन अशाच एका रोमान्सचं.
वेड होण्याचं!