एलिव्हेट
By Admin | Updated: January 29, 2015 15:50 IST2015-01-29T15:32:27+5:302015-01-29T15:50:46+5:30
एक अॅप- तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारू शकतं. नवीन वर्षात काय काय करायचं याचे संकल्प आज महिनाअखेर होता होता शिळेही झाले असतील. आणि मग उरते मनात एक बोच की, ठरवलं बरंच होतं, झालं काहीच नाही

एलिव्हेट
अॅपसर्च
भन्नाट अॅपचा बिनधास शोध
एक अॅप- तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारू शकतं.
नवीन वर्षात काय काय करायचं याचे संकल्प आज महिनाअखेर होता होता शिळेही झाले असतील. आणि मग उरते मनात एक बोच की, ठरवलं बरंच होतं, झालं काहीच नाही ! तसं होऊ नये म्हणून आता आपल्या हातातच एक जादू आहे, तिचं नाव मोबाइल. नवीन गोष्ट शिकायची असेल, स्वत:मध्ये सुधारणा करायची असेल, नवीन स्किल्स शिकायची असतील तर मदत घ्या तुमच्याच फोनची.
त्या फोनमध्ये एलिव्हेट नावाचं हे अॅप फक्त डाउनलोड करून घ्या !
सध्या हे अॅप लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
हे अॅप तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये सुधारणा करायला मदत करतं, म्हणून सध्या जो तो हे अॅप डाउनलोड करून घेतोय.
या अॅपमध्ये खास काय?
* अॅप डाउनलोड केल्यावर एक छोटी पर्सनॅलिटी टेस्ट होईल. आणि त्यावरून तुमच्यासाठीचा अभ्यासक्रम ठरवला जाईल.
* मग रोज तुम्हाला छोटे छोटे टास्क मिळतील. टेस्ट्स असतील. तुमचं भाषा कौशल्य, रिझनिंग, लॉजिक, एखादं संभाषण ऐकून त्यातून महत्त्वाच्या गोष्टी टिपणं असं काय काय हे टास्क सांगतील.
*छोट्या छोट्या गोष्टी रोज इंटरेस्टिंग क्विझ फॉरमॅटमध्ये सोडवल्यानं तुमचं इंग्लिश सुधारेल, शब्द संग्रह वाढेल, पटकन निर्णय घेण्याची क्षमताही वाढेल.
* हे अँप तुम्हाला कंटाळा येऊ न देता रोज नवीन गोष्टी देत राहील. जसजसे तुम्ही या गोष्टी सोडवत रहाल, तशी या गोष्टींची काठिण्यपातळी वाढत राहील. तुम्हाला सूचना मिळतील, न जमलेल्या गोष्टी पुन्हा सोडवता येतील. तुमची जी कौशल्य कमकुवत असतील त्यावर काम करायला हे अँप तुम्हाला मदत करेल.
खेळता खेळता थोडा स्वत:चा फायदा करुन घ्यायचा असेल तर अँप मस्ट आहे.
अॅप कुठं मिळेल?
http://elevateapp.com/ ¹ या साइटवर जाऊन तुम्ही हे अॅप डाउनलोड करू शकता.
-अमृता दुर्वे