शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
"प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
4
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
5
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
6
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
7
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
8
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
9
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
10
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
11
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
12
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
13
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
14
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
15
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
16
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
17
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
18
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
19
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
20
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल

अठरावं वरीस मोक्याचं! मौके पे चौका मारताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 12:28 IST

सतरावं संपून आता अठरावं लागणार असे हे तीन दोस्त. १८ वर्षांच्या नव्या पिढीचे तीन प्रातिनिधिक चेहरे. सतराव्या वर्षाचा उंबरठा ओलांडताना काय विचार आहेत त्यांच्या मनात?

- गौरी पटवर्धनकुठल्याही कॉलेजच्या मुला-मुलींना विचारलं की, आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं वर्ष कुठलं? तर बहुतेक सगळे जण सांगतील अठरावं!अठरा पूर्ण व्हायच्या आधी आणि नंतर माणसाच्या आयुष्यात फार मूलभूत बदल होतात. त्यातला सगळ्यात पहिला आणि मोठा बदल म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स काढता येतं. तसं सोळाव्या वर्षीपण कमी कपॅसिटीच्या बिनगिअरच्या टू व्हिलरचं लायसन्स मिळतं म्हणा; पण त्यात काही मजा नसते. त्या गाड्या म्हणजे सायकलपेक्षा जरा बºया, पण एकूण भातुकलीमधल्या छोट्या छोट्या गाड्या असतात. सगळ्या खºया बाइक्स आणि फोर व्हिलर्स चालवण्याचं लायसन्स मिळायला अठरा वर्षं पूर्ण व्हावी लागतात. त्यामुळे अनेक जण आणि जणी अठराव्या वाढदिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. त्यातले अनेक जण लायसन्स काढतातसुद्धा आणि त्यांच्या लक्षात येतं की प्रत्येक आनंदाची एक किंमत चुकवावी लागते. त्यांचे आईबाबासुद्धा त्यांना लायसन्स मिळण्याची त्यांच्या इतक्याच आतुरतेने वाट बघत असतात. आणि मग मित्र/मैत्रिणीला घेऊन बाइकवर फिरण्याच्या बरोबरीने आत्याला जरा सोडून ये, भाचीला शाळेतून घेऊन ये, आईला भाजी आणायला घेऊन जा असली अनेक पडीक कामं केवळ ‘लायसन्स असल्यामुळे’ त्यांच्या गळ्यात पडायला लागतात.जी गोष्ट लायसन्स मिळण्याची तीच गोष्ट घरात मिळणाºया लेक्चरची पातळी उंचावण्याची! इतके दिवस केवळ आपल्या नाकर्तेपणाचा घरात उद्धार होत असतो. पण अठरा वर्ष पूर्ण झाली की आपल्या प्रत्येक चुकीबरोबर, आळशीपणाबरोबर, चालढकल करण्याबरोबर देशाचं भवितव्य जोडलं जायला लागतं.‘मतदानाचा अधिकार मिळालाय आपल्याला आता तरी जरा जबाबदारीने वागा! तुमच्यासारखे नागरिक असतील तर कसा आपला देश महासत्ता होणार,’ असे प्रश्न आपल्याला वेळी-अवेळी विचारले जाऊ शकतात. आपल्या हे सतत लक्षात आणून दिलं जातं की आपण वेळेवर न विसरता लाइट बिल भरणे ही देशाला महासत्ता बनविण्याची एक सुवर्णसंधी होती आणि आपण ती गमावली.गाडी चालवायला मिळते, मतदानाचा अधिकार मिळतो, मुलींना लग्न करण्याची परवानगी मिळते; पण त्याचबरोबर अनेक कागदपत्रीय कटकटी आपल्या मागे लागतात. इतके दिवस कॉलेजचं आयकार्ड सांभाळलं की आपली जबाबदारी संपत असे; पण आता पॅन कार्ड, आधार कार्ड, व्होटिंग कार्ड अशा अनेक ठिकाणी रांगेत उभं राहायची वेळ येते. बरं यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी अनेक कागदपत्र लागतात; ओळखपत्र, वास्तव्याचा पुरावा इ. काहींसाठी फोटो लागतात, ते अमक्याच साइझचे लागतात, काही कागदं अटेस्टेड लागतात, काही सेल्फ अटेस्टेड चालतात आणि यातलं नेमकं कुठलं कॉम्बिनेशन पाहिजे आहे ते कुठल्याच आॅफिसमधले लोक सहसा पटकन सांगत नाहीत. त्यामुळे मग दहा वेळा चकरा मारायला लागतात, दहा खिडक्यांमध्ये चौकश्या करायला लागतात, ‘काय बावळट आहे, एवढी साधी गोष्ट समजत नाही? असं म्हणणारे लुक्स झेलावे लागतात तेव्हा कुठे या सगळ्या कागदपत्रांची जुळवाजुळव होते आणि आपण भारत देशाचे एक जबाबदार नागरिक म्हणून मिरवायला मोकळे होतो. आता आपल्याला आपलं स्वत:चं, आपल्या एकट्याच्या सहीने चालणारं बँक अकाउण्ट येतं. अनेक सोशल नेटवर्किंग साइट्सवरची काही कुलुपं आपोआप उघडतात. पण या अचानक झालेल्या बदलांसाठीची आपली तयारी मात्र झालेली असतेच असं नाही.अठराव्या वर्षी अधिकृतरीत्या ‘लहान’, ‘अज्ञान’ ही सोयीची बिरुदं आपल्याकडून काढून घेतली जातात. इथून पुढे कायदा आपल्याकडे एक स्वतंत्र सज्ञान व्यक्ती म्हणून बघू लागतो आणि सगळा घोळ सुरू होतो. इतर बाबतीत कायद्यावर बोट ठेऊन बोलणारे आपले आईवडील आणि प्राध्यापकांचा या बाबतीत मात्र कायद्यावर अजिबात विश्वास नसतो. त्यामुळे कायदा काहीही म्हणाला तरी आपण ‘सज्ञान’ झालोय यावर विश्वास ठेवायला ते अजिबात तयार होत नाहीत.‘त्याला/तिला काय कळतंय?’ हे वाक्य अजूनही आपला पिच्छा सोडत नाही. एकीकडे कायदा आपल्याला बहुतेक सगळं स्वातंत्र्य अठरा पूर्ण झाल्यावर देऊ करतो आणि घरचे मात्र घरी यायला आठऐवजी साडेआठ झाले तरी उलटतपासणी घ्यायचे थांबत नाहीत.ज्या गोष्टी कायदा आपल्याला व्हर्च्युअली अक्षरश: एका क्षणात देऊन टाकतो त्या गोष्टी प्रत्यक्षात घरच्यांकडून पदरात पडून घ्यायला मात्र पुढचा बराच काळ जाऊ शकतो, पण तेही हळूहळू का असेना घडतं. घरचे आपल्या ‘सज्ञान’ असण्यावर विश्वास ठेवायला लागतात, आपल्यावर जबाबदारी टाकायला लागतात. आपणही जबाबदारीने वागायला लागतो. मतदान जवळ आल्यानंतर का असेना राजकीय चर्चेत भाग घेऊ लागतो. नागरिक म्हणून असलेले आपले हक्क आणि जबाबदाºयांचं भान आपल्याला यायला लागतं. आपल्या लक्षात येतं की आपण खरोखरच आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. सोळावं वर्ष वगैरे कल्पना फारच रोमॅण्टिक आणि ओव्हररेटेड वाटायला लागतात. लक्षात येतं की सोळावं वरीस धोक्याचं असेल कदाचित, पण अठरावं वरीस मात्र नक्कीच मोक्याचं आहे!

१. ख-या बाइक्स आणि फोर व्हिलर्सचालवण्याचं लायसन्स मिळतं,२. आपल्या एकट्याच्या सहीने चालणारंबँक अकाउण्ट येतं,३. अनेक सोशल नेटवर्किंग साइट्सवरचीकाही कुलुपं आपोआप उघडतात,४. मतदानाचा अधिकार मिळतो,५. मुलींना लग्न करण्याची परवानगी मिळते;६. पण अनेक कटकटीही मागे लागतात.७. घरात मिळणाºया लेक्चरचीपातळी उंचावयाला लागते.८. आपल्या प्रत्येक चुकीबरोबर,आळशीपणाबरोबर,चालढकल करण्याबरोबरदेशाचं भवितव्य जोडलं जायला लागतं.९. ...पण हेही खरं, की आपलं स्वतंत्रआयुष्य हळूहळू आकार घ्यायला लागतं!पळणार, झुलणार, भटकणारही!‘ए आई.. मला माझं फेसबुक अकाउण्ट ओपन करायचंय गं, माझे सगळे मित्र आहेत फेसबुकवर.’ मी आईला जरा चाचरतच सांगितलं. ‘फेसबुक? वय किती गं तुझं? फेसबुकवर यायचंय म्हणे, तू १८ वर्षांची झालीस ना की तू आणि तुझं फेसबुक काय हवा तो गोंधळ घाला, पण आत्ता नाही म्हणजे नाही’- इति आई.- असे संवाद प्रत्येक घरात ऐकायला येतात. १८ पूर्ण झालं की हे स्वातंत्र्य तरी मिळणार याची खातरी वाटते.मला आता १८ वं लागणार तर मला बरंच काही करून पहायचंय. दºया-खोºयांतून मनमुराद भटकायचं, कवितांच्या जगात हरवून बसायचंय, कॉलेजचे लेक्चर बंक करण्याकडे कल असला तरी करिअरची स्वप्नं पहायची आहेत. त्या मागे वेड्यासारखं धावत सुटायचं आहे. मतदानाचा हक्क मिळणार तर जरा जबाबदारीनं वागण्याचा, देशासाठी काहीतरी करण्याचाही विचार मनात येतोच. आपण मोठे होतोय म्हणताना पाडगावकरांच्या ओळी आठवतात-दिवस तुझे हे फुलायचे,झोपाळ्या वाचून झुलायचे..- तसंच काहीतरी करीन म्हणते.. - अदिती सरदेसाईमी स्वतंत्र आणि जबाबदारही!वाटतं आहे मुक्त आहे मी. स्वतंत्र. १८ वर्ष पूर्ण होत असल्याचा आनंदही आहेच.पण याच बरोबर आपली कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी वाढतेय याची ही मला जाणीव आहे. स्वत:च्या कारकिर्दीला सुरुवात करून स्वत:च्या पायावर उभं राहणं, आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करणं आता माझ्यााठी फार महत्त्वाचं आहे.मतदानाचा अधिकार मिळणार, इथल्या नागरिकांसाठी चांगला उमेदवार निवडून देण्यासाठी हातभार लावता येईल याचाही मला खूप आनंद झाला आहे. - सिद्धी प्रकाश कुळकर्णीमी आणि माझा देशभविष्य काय असेल, याचा फारसा विचार अद्याप केला नाही. कारण सगळं घरबसल्या मिळतं; पण काल इंटरनेटवर अमेरिकेवरची एक डॉक्युमेंटरी पाहत होतो. पाहता पाहता कधी त्या चमचमत्या शहरात हरवून गेलो हेच कळलं नाही. क्षणात जागा झालो आणि परत विदेश टू स्वदेश असा प्रवास करताना काही गोष्टी आढळल्या. माझा देश रात्रीच्या अंधारात असाच दिसेल या विचारातून मी बाहेर पडलो, कारण थोड्या वेळानं बाहेर गेलो तर रस्त्यावरच्या गर्दीत एक माणूस भयाण दुर्गंध असलेल्या कचरापेटीत काहीतरी शोधू लागला. त्याने त्या कचºयातून पावाचा तुकडा काढला आणि क्षणाचाही विचार न करता तो खाऊन टाकला. मी हादरलो. चालू लागलो. माझ्या देशाची अमेरिका झालेली मला आवडणार नव्हती कारण जिथे प्रगतीच्या नावावर हजारो झाडं तोडली जातात.. विकास म्हणजे हे असं वागणं नाही.शंभरातली दहा माणसं कायम उपसमारीने मरत असतील तर आपला देश तरी काय विकास करतोय? मला माझ्या देशात विदेशातला चकचकाट नसला तरीही चालेल, पण माझा भारत देश नवविचारांनी अन् उमेदीच्या कृतीने भारलेला हवाय...- ललित चंद्रकांत सुतार

(patwardhan.gauri@gmail.com )