शहरं
Join us  
Trending Stories
1
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
2
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
3
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
4
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
5
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
6
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
7
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
8
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
9
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
10
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
11
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
12
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न
13
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
14
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
15
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
16
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
17
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
18
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
19
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
20
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित

..अजूनही शिकतोय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 07:53 IST

शिक्षणानं नवीन जग दाखवलं, संधी दिल्या, प्रवास सुरुच ठेवला..

मी बीड जिल्ह्यातील बनसारोळा या गावचा. ग्रामदैवत बनेश्वराच्या आशीर्वादाने गावामध्ये चांगल्यापैकी सुखसमृद्धी आहे. गावात नामांकित शाळा व महाविद्यालय आहे. मात्र माझा प्रवास खूप वळणा- वळणाचाच आहे.सध्या मी अष्टविनायक महाविद्यालय, मुरूड. ता. जि. लातूर येथे प्राचार्यपदावर कार्यरत आहे; परंतु ईथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नाही. माझं प्राथमिक शिक्षण गावातच जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर महाराष्ट्र विद्यालयातून दहावी पास झालो. अकरावीला अंबाजोगाई येथे अ‍ॅडमिशन घेतले. सोळाव्या वर्षी पहिल्यांदा गाव सोडलं. मी व माझे मित्र भाड्यानं एक खोली घेऊन राहायचो. प्रतिमहिना १५० रुपये भाडं होतं. तीनशे रुपये मेसचे. बारावी झालो.गावात नुकत्याच सुरू झालेल्या जनविकास महाविद्यालयात बी.ए. साठी प्रवेश घेतला. चांगल्या प्रकारे कॉलेज करून पास झालो. जिवाभावाचे मित्र सोबत होतेच. याच काळात (२००१-०२) लोकमतचा मैत्र हातात पडला (आताचा आॅक्सिजन). जीवन जगण्याचा एक नवा आयाम मिळाला. जगात काय घडतंय, आपण कुठे आहोत, आपल्याला काय करता येईल, अशा प्रकारच्या डोक्याचा किस पाडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे सोडण्यास त्यावेळच्या शुक्रवारच्या ‘मैत्र’ची मला अनमोल अशी मदत मिळाली.बी.ए. झाल्यानंतर पुढे वैद्यनाथ महाविद्यालय, परळी येथे लोकप्रशासन विषयात एम.ए. केलं. कृष्णाई अध्यापक महाविद्यालय, मुरूड, ता. जि. लातूर इथं बी.एड. केलं.लगेच अंबाजोगाईमध्ये संगणकशास्त्र महाविद्यालयात क्लार्क म्हणून रूजू झालो. ही माझ्या जीवनातली पहिली नोकरी. याच काळात मी इंग्रजीतही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. पुढे २०११ साली ज्या महाविद्यालयात मी बी.ए. केलं तिथंच प्राध्यापकपदी रूजू झालो. तीन वर्षे या ठिकाणी अध्यापन केल्यानंतर २०१४ मध्ये मुरूडच्या महाविद्यालयात प्राचार्यपदी रूजू झालो ते आजतागायत.दररोज बनसारोळा ते मुरूड अप-डाउन. हा तीन जिल्ह्यांचा प्रवास आहे. अजून हा प्रवास कुठे घेऊन जाणार हे माहीत नाही; पण या प्रवासानं हिंमत शिकवली आणि सतत शिकत राहण्याची प्रेरणा दिली हे नक्की.- चंद्रकांत उमाकांत गोरेता. केज, जि. बीड.

टॅग्स :educationशैक्षणिक