शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

JUNK खाताय? डोळे जातील, कान बधीर होतील, सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 7:45 AM

सतत जंक फूड खाऊन खाऊन डोळे जाऊ शकतात, कान बधिर होतात, कुपोषणाचा फटका बसतो. तरी जंक खायचंच आहे?

ठळक मुद्देआपण गांभीर्यानं आपल्या आहाराचा विचार केला नाही तर आपलं शरीर त्याच्या क्षमता गमावून बसेल.

इंग्लंडमधली एक अलीकडची घटना.एका सतरा वर्षाच्या मुलाची दृष्टी अधू झाली आणि श्रवणशक्तीवरही परिणाम झाला. कारण असं की गेले साधारण दशकभराचा काळ तो सलग फक्त जंक फूडच खात होता.जेवण म्हणून दहा वर्षे फक्त जंक फूड? तेही फक्त वेफर्स, व्हाइट ब्रेड, प्रोसेस्ड मांसाहारी पदार्थ. त्याचं कारण तो असं सांगतो की, त्याला एक वेगळ्याच प्रकारची डिसऑर्डर आहे. ज्याला इटिंग डिसऑर्डर म्हणतात. त्याचं नाव अव्हॉइडण्ट रिस्ट्रीक्टिव्ह फूड इनटेक डिसऑर्डर. त्याचा अर्थ असा की तो प्राथमिक शाळेत होता तेव्हापासून त्याला फळं आणि भाज्या खाण्यानं त्रास व्हायचा. त्यामुळे त्यानं ते खाणंच बंद केलं.परिणाम असा झाला की, पोषण आहारच घेत नसल्यानं आणि निकृष्ट दर्जाचं अन्न सतत सेवन करत राहिल्यानं त्याच्या शरीरात विविध व्हिटॅमिनच्या कमतरता निर्माण झाल्या. त्यामुळे त्याचं पुरेसं पोषण तर झालं नाहीच, पण कुपोषण झालं. जे आजार कुपोषित मुलांमध्ये दिसतात तेच आजार त्याला झाले, त्यानं त्याच्या मेंदूकडे जाणार्‍या नसांवर परिणाम झाला. विकसित देशात कुपोषण ही समस्याच नाही, मात्र त्यापद्धतीचा आजार मात्र या तरुण मुलाला झाला आणि त्यानं त्याच्या डोळ्यांच्या नस दुखावल्या गेल्या. त्यामुळे त्याची दृष्टी अधू झाली.आता वेळीच उपचार केले नाही तर तो कायमचा अंध होण्याची शक्यता आहे. 

या मुलाची ही केस अलीकडेच अ‍ॅनल्स ऑफ इंटर्नल मेडिसीन या अहवालात प्रसिद्ध झाली आहे. डॉ. डेनीझ अटन यांनी ही केस मांडली. आणि जंक फूडच्या सतत सेवनाचे परिणाम, त्यातून होणारे आजार ही समस्या पुन्हा एकदा अत्यंत गंभीरपणे मांडली. सतत जंक फूड खाल्ल्यानं डोळ्यांवर परिणाम होतो याची जाण अजूनही डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांना नाही, तर लोकांना असण्याचं काही कारण नाही असं ते मांडतात.एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, या केसमध्ये अतिच जंक फूड खाणं होतं, मात्र वेळीच निदान झालं नसतं तर या मुलाला दृष्टी कायमची गमवावी लागली असती. अ-पोषण आणि कुपोषण आणि डोळ्यांवर त्यांचा होणारा परिणाम याचं अत्यंत जवळचा संबंध आहे. मेंदू-डोळ्यांचे डॉक्टर याची मांडणी सतत करत आहेत. मात्र अजूनही जंक फूड खाणं, कुपोषण आणि दृष्टिदोष यांचा एकत्र विचार केला जात नाही.’या केसच्या निमित्तानं सध्या तरुण मुलं घेत असलेला आहार, त्यांचं कुपोषण, जंक फूड खाण्याचं प्रमाण, आहारातील अनियमितता हे सारे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.आणि आपण गांभीर्यानं आपल्या आहाराचा विचार केला नाही तर आपलं शरीर त्याच्या क्षमता गमावून बसेल.आणि ते आपल्याला परवडणारं आहे का?