फळं खा. पाणी प्या.
By Admin | Updated: December 25, 2014 18:25 IST2014-12-25T18:25:51+5:302014-12-25T18:25:51+5:30
चिपचिपी त्वचा, बेफाम केस नकोत ना नव्या वर्षात? मग एवढं कराच.

फळं खा. पाणी प्या.
धनश्री संखे, ब्युटी एक्सपर्ट
चिपचिपी त्वचा, बेफाम केस नकोत ना नव्या वर्षात? मग एवढं कराच.
--------------
का? म्हणजे, माङो केसच असे आहेत. काहीही करा, मस्त सुळसुळीत सिल्की दिसतच नाहीत. नुस्ता अवतार.
बाकीच्यांचे केस कसे ‘सही’ दिसतात.
तेच चेह:याचं. काहीही करा, चेह:याचं कॉम्प्लेक्शन सुधारेल, स्किन ग्लो करेल असं नाहीच. बाकीच्यांचे चेहरे बघा कसे तुकतुकीत दिसतात.
- असं गा:हाणं घेऊन अनेक टीनएजर्स आमच्याकडे येतात. त्यांना जे उपाय आम्ही सुचवतो, ते तुम्हीही लक्षात ठेवायला हवेत.
येत्या वर्षी सुंदरच दिसायचं असा आग्रहच असेल आणि चेह:यावरचा एक जरी पिंपल तुम्हाला छळत असेल तर तुम्ही या काही गोष्टी नक्की लक्षात ठेवाच.
1) टीनएजर अर्थात वयात येणा:या मुलामुलींमधे खूप हार्मोनल बदल होत असतात. मूड स्विंग्ज फार होतात. त्याच सा:याचा एक भाग म्हणजे केस आणि त्वचेतही काही गडबड सुरू होते. त्यामुळे आपल्या वयाच्या या टप्प्यावर हे सारं होणारच हे लक्षात ठेवा.
2) हार्मोनल चेंजेसमुळे ‘सीबम’चा अर्थात त्वक्स्नेही ग्रंथींचाही तोल बिघडतो. त्यातून मग चिपचिपी त्वचा, चिपचिपे केस अशी लक्षणं दिसू लागतात.
3) आपलीच त्वचा अशी का, असा प्रश्न पडत असेल तर हे या वयात होतं असं मान्य करून योग्य आहार आणि स्किन क्लिंङिांग रुटीन हे दोन उपाय तातडीनं करायला हवेत.
4) त्वचेचा पोत लवकरात लवकर सुधारायचा असेल तर रोज दिवसातून दोनदा पाच मिनिटांची एखादी स्किन केअर ट्रिटमेण्ट घरच्याघरी करायलाच हवी.
5) त्यासाठी तज्ज्ञांनी सुचवलेल्या योग्य क्रिम्स चेह:याला न चुकता लावायला हव्यात.
6) आठवडय़ातून किमान तीनदा अर्धा तास व्यायाम कराच.त्यानं रक्ताभिसरणं सुधारून त्वचेला लाभच होईल.
7) भरपूर पाणी प्या. त्यामुळं शरीरातून टॉक्सिन बाहेर पडायला मदत होते.
8) फळंच न खाणं, भाज्या न खाणं, सतत तळकट, बाहेरचं खाणं यामुळंही शरीरात टॉक्सिनच ं प्रमाण वाढतं. त्यामुळं भरपूर ताजी फळं, भाज्या खा.
9) क्लिङिांग, टोनिंग, मॉयश्चुरायङिांग या तीन प्रकारांनी चेह:याचं कॉम्प्लेक्शन नक्की सुधारू शकतं.
1क्) नवीन वर्षी एक करा, तुम्ही आठवडाभर काय काय खाता, याची रोज एक डायरी लिहा. वेफर्सऐवजी फळं खा, चॉकलेट-कोल्डड्रिंकऐवजी फ्रेश ज्यूस, पाणी, सरबत असं काही प्या. तुमच्याच लक्षात येईल की, हळूहळू तुमच्या त्वचेचा पोत कसा सुधारतोय. नवीन वर्षात स्वत:साठी एवढंतरी कराच.
समाप्त