डिव्हायडर
By Admin | Updated: April 27, 2017 17:11 IST2017-04-27T17:11:36+5:302017-04-27T17:11:36+5:30
एक नवीन समर फॅशन

डिव्हायडर
>-ऑक्सिजन टीम
डिव्हायडर रस्त्याला असतात, पॅण्ट्सचं नाव डिव्हायडर असेल असं कुणाला कधी वाटलं होतं का?
पण यंदाच्या उन्हाळ्यात ही डिव्हायडरची फॅशन एकदम जोरात आहे.
लॉँग कुर्ता आणि ढगळीढुगळी सलवारसारखी पण स्ट्रेट फिटिंगची डिव्हायडर पॅण्ट ही सध्याची मुलींच्या जगातली फॅशन आहे. मुलीच कशाला तमाम सेलिब्रिटीही या पॅण्टच्या प्रेमात आहेत. म्हणून तर हल्ली मोठा कुर्ता आणि मोठी स्कर्टसारखी भासणारी डिव्हायडर याची एक मोठी क्रेझ आहे.
1)अनारकली ड्रेसच्या वर्गातलाच हा प्रकार. लॉँग कुर्ता आणि त्याला कट. सोबत ही ढगळी स्ट्रेट फिट डिव्हायडर. आणि गळ्यात मोठ्ठं गळ्यातलं. किंवा फक्त हातात ठसठशीत ब्रेसलेट किंवा बांगडी हा मल्टीपर्पज फॅशनेबल लूक आहे.
2) डिव्हायरवर शॉर्ट कुर्ताही घालता येतो. पण आपलं वजन खूप जास्त किंवा खूप कमी असेल तर मात्र तो फार बरा दिसत नाही.
3) डिव्हायडर इतकीच कम्फर्टर्बेल किंवा साधारण त्याच वळणाची पलाझो. पलाझोवर लॉँग, शॉर्ट कुर्ते, टॉप्स, टय़ुनिक्स, टी शर्ट असं काहीही घालता येवू शकतं.
4) त्यापुढचा टप्पा म्हणजे हेरम. हेरम पॅण्ट्स तर सगळ्यात मस्त. आणि स्वस्तही. त्या सलवारसारख्या वापरता येतात. टी शर्टवरही चांगल्या दिसतात. ( आठवा जब वी मेटची करीना).