ड्रग्ज गेम्स आणि पोर्नोग्राफी!

By Admin | Updated: October 1, 2015 17:39 IST2015-10-01T17:39:40+5:302015-10-01T17:39:40+5:30

प्रौढांच्या मोबाइलमध्ये असल्या क्लिप्स असतात(च) आणि ब:याचदा मुलांर्पयत त्यांचा शिरकाव तिथूनच होतो.

Drugs Games & Pornography! | ड्रग्ज गेम्स आणि पोर्नोग्राफी!

ड्रग्ज गेम्स आणि पोर्नोग्राफी!

>‘डीजीपी’ नावाच्या नव्या व्यसनाचे बळी नक्की ठरतात कोण?
 
अॅडिक्ट आहोत,हे ओळखायचं कसं?
मोबाइलमध्ये, घरातल्या पीसीवर, इंटरनेटवर पोर्नोग्राफी कोण पाहतं?
प्रौढांच्या मोबाइलमध्ये असल्या क्लिप्स असतात(च) आणि ब:याचदा मुलांर्पयत त्यांचा शिरकाव तिथूनच होतो.
पण असल्या व्हिडीओ क्लिप्स फक्त पाहण्यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. तरुणांबरोबरच शाळकरी मुलांनीही त्यात आता बरीच मजल मारली आहे.
आपली मुलं पोर्नोग्राफीच्या ‘आहारी’ गेलेली आहेत, ‘अॅडिक्ट’ झाली आहेत, हे ब:याचदा पालकांना कळतच नाही. मग तुम्हीच तपासा. यातली कोणती ‘लक्षणं’ आपल्या मुलांत (यात मुली अपवाद नाहीत.) दिसतात ती..
यातली काही लक्षणं दिसतात तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये? किंवा तुम्ही तरुण असाल तर स्वत:च्या वागण्यामध्ये?
तसं असेल तर तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात. 
 
 
तर तुम्ही अॅडिक्ट आहात!
- आपला किशोरवयीन, तरुण मुलगा/मुलगी रात्री ब:याच उशिरा झोपतो आणि सकाळी खूप उशिरा उठतो? झोपेतून उठल्यावरही तो आळसावलेला, थकलेला दिसतो?
- काही मुलं रात्री झोपताना किंवा ब:याचदा दिवसाही आपल्या रूममध्ये गेल्यावर रूम आतून बंद करून घेतात, मोबाइल, इंटरनेटवर रात्ररात्र ‘खेळतात’..
- व्हॉट्सअॅपशिवाय मुलांना होत नाही. दर मिनिटा- दोन मिनिटाला ती त्यातली चित्रं, व्हिडीओ पाहात असतात..
- आपल्या मित्र-मैत्रिणींबद्दल (अपोजिट सेक्सबद्दल) म्हणजे मुलगा मुलींविषयी आणि मुली मुलांविषयी सारखी कुरकुर करीत असतात. हा असाच, ती तशीच..
- द्वयर्थी किंवा सरळसरळ कामोत्तेजक शब्द असलेलं लाउड म्युङिाक, संगीत ते सतत ऐकत असतात.
- एकदा का बाथरूममध्ये घुसले की तासन्तास तिथे ठाण मांडतात. इतका वेळ ती तिथे काय करतात, अंघोळीला जास्तीत जास्त किती वेळ लागू शकतो, असा हिशेब घरातले इतर जण लावायला लागतात.
- माङया मोबाइलची मेमरी एकदम फालतू आहे, त्याच्यात काही बसतच नाही, साधा एखादा व्हिडीओ डाउनलोड केला तरी त्याची मेमरी ठपते, अशी तक्रार वैतागून मुलं वारंवार करायला लागतात.
- प्रत्यक्ष जगाऐवजी आभासी, व्हच्यरुल जगात मुलं जास्त रमायला लागतात, एकेकटी राहतात, एकटं राहणंच पसंत करायला लागतात, कोणाची कंपनी त्यांना नकोशी व्हायला लागते.
- मुलांच्या बेडरूममध्ये पोर्नस्टार्सचे फोटो दिसायला लागतात..
- ‘पोर्नोग्राफी साइट्स बंद केल्या पाहिजेत’ असं नुसतं म्हटलं तरी ज्यांच्या अंगाचा तीळपापड व्हायला लागतो, कुरकुर वाजायला लागतो.
-  हे सारं असंच घडत असेल तर ते ‘तेच’ करत असतील, असा पूर्वग्रह करून घेऊ नका. लगेच त्यांना फैलावर घेऊ नका. पण धोक्याची घंटी वाजू द्या आणि पाहा एकदा खरंच तसं काही आहे का? आणि असेल तर थोडं धीरानं घ्या.
 
- डॉ. हरीष शेट्टी
सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ

Web Title: Drugs Games & Pornography!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.