घरगुती कामांचं स्किल
By Admin | Updated: May 7, 2015 18:06 IST2015-05-07T18:06:00+5:302015-05-07T18:06:00+5:30
‘डोमेस्टिक हेल्प’ हे एक नवंच क्षेत्र आता झपाटय़ानं आकार घेतं आहे. लो स्किल जॉब म्हणून आज ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ते उद्या हायली पेड जॉब असतील!

घरगुती कामांचं स्किल
>एल्डर केअर टेकर
माणसाचं आयुष्यमान वाढतं आहे. घरात म्हातारी माणसं आहेत. काही आजारी, काही एकेकटी. मुलांचं करिअर बिझी. वेळ नाही. अशा माणसांची देखभाल करायची तर यापुढे माणसं लागतील. सोबत करायची तरी पगारी माणसं नेमावी लागतील. अशा माणसांना एल्डर केअर टेकर असं म्हणतात. येत्या काळात या कामासाठी मिळणारा पैसाही वाढेल आणि गरजही.
काम काय?
खरंतर सोबत करणं, गप्पा मारणं. आजी-आजोबांची देखभाल, त्यांचं औषधपाणी, दवाखान्यात नेणं, फिरायला नेणं आणि खूप आजारी असतील तर त्यांचे शेवटचे दिवस सुखाचे करणं हेच काम.
संधी कुणाला?
जेमतेम लिहिता वाचता येणारा पण उत्तम संवादकौशल्य असणारा, प्रेमळ आणि उत्तम देखभाल करू शकणा:या कुणालाही हे काम मिळावं.
ऑलराऊण्डर नर्स
नर्स हे काम नवीन नाही, पण त्याची डिमाण्ड येत्या काळात वाढणार आहे. विशेषत: अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून ज्यांना उत्तम काम करता येईल, इंग्रजी उत्तम असेल आणि हातात स्किल असेल अशा नर्सेसची मागणी जगभर वाढत आहे. मुख्य म्हणजे हे काम आता फक्त महिलांनाच नाही, तर पुरुषांनाही उपलब्ध होत आहे.
काम काय?
नर्सिग हेच काम. पण अत्यंत मोठय़ा सर्जरी, मोठमोठे दवाखाने, लाइफ केअर आणि सपोर्ट सिस्टिम हे सारं वापरून ज्यांना काम करता येईल अशा नर्सेसचे नवे काम हे अधिक आव्हानात्मक असेल. मुख्य म्हणजे मोठी हॉस्पिटलच नाही, तर गावपातळीर्पयत हे काम उपलब्ध होईल.
संधी कुणाला?
नर्सिग कोर्स करणा:यांना!
टेकसॅव्ही प्लंबर
प्लंबर हे काय नवीन काम नाहीच, त्यातही लो स्किल मानलं जातं! मात्र नव्या काळात जगभर टेकसॅव्ही प्लंबरची मागणी वाढणार आहे. गगनचुंबी इमारती आणि मॉल बांधले जात असताना त्यातली प्लंबिंगची यंत्रणा हे एक नवे क्षेत्र आहे. कमी पाणी वापरून नव्या ड्रेनेज व्यवस्था लावणं हेदेखील एक आव्हान आहेच.
काम काय?
प्लंबिग, मेण्टेनन्स, रिपेअर हेच काम. मात्र मोठे मॉल, इमारती, हॉस्पिटल यांसह घरगुती टप्प्यात काम करण्यासाठी प्लंबर आत्ताच मिळेनासे झाले आहेत.
संधी कुणाला?
प्लंबिगचा कोर्स करणा:या कुणालाही संधी. पण नव्या टप्प्यात बांधकामाची नवी टेक्नॉनॉलॉजीही समजून घ्यावी लागणार आहे.
क्राऊडसोर्सिग मॅनेजर
या नावावरून असं वाटेल की काहीतरी हायफाय असेल. तसं अजिबात नाही. गर्दी गोळा करणारे हल्लीचे जे ठेकेदार असतात, जे रोजानं सभांना माणसं पुरवतात त्याचंच हे पुढचं स्वरूप. पण ही गर्दी फक्त प्रत्यक्ष नाही, तर ऑनलाइन जगातली गोळा करायची आहे. आणि पैसे, ते तर मोजायला लोक तयारच आहेत. कारण माणसं फुकट मिळणं मुश्कील.
काम काय?
गर्दी गोळा करून देणं हेच काम. सभांना गर्दी, मेळाव्याला गर्दी म्हणून माणसं पुरवायची. तेच टेलिव्हिजनच्या शोसाठी आणि एखाद्या कार्यक्रमासाठीही. ऑनलाइन जगात लाइकची ठोक गर्दी पुरवणारेही हेच माणसं.
संधी कुणाला?
जेमतेम लिहिता वाचता येणारा, पण उत्तम संवादकौशल्य असणारा, लीडरशिप क्वालिटी असणारा कुणीही हे काम करू शकतो.
फिजिकल थेरपी असिस्टंट
लाइफस्टाईल डिसिजचा हा काळ आहे. त्यात लोक व्यायाम करत नाहीत. हाडांचे विकार, पॅरालिसिस, मोठय़ा ऑपरेशननंतर करायचे व्यायाम यासाठी आत्ताच थेरपिस्टची गरज वाढते आहे. भविष्यात जगभरातच या फिजिकल थेरपिस्टना मागणी वाढणार आहे.
काम काय?
रुग्णाच्या गरजेप्रमाणो व्यायाम करून घेणं, विविध व्यायाम सुचवणं यांसह विविध फिजिकल थेरपी करणं म्हणजेच योगा, विविध आयुर्वेदिक प्रक्रिया हे सारं या फिजिकल थेरपीचा भाग.
संधी कुणाला?
फिजिऑलॉजीचा कोर्स करणं यासाठी आवश्यक.
फिजिकल थेरपी असिस्टंट
लाइफस्टाईल डिसिजचा हा काळ आहे. त्यात लोक व्यायाम करत नाहीत. हाडांचे विकार, पॅरालिसिस, मोठय़ा ऑपरेशननंतर करायचे व्यायाम यासाठी आत्ताच थेरपिस्टची गरज वाढते आहे. भविष्यात जगभरातच या फिजिकल थेरपिस्टना मागणी वाढणार आहे.
काम काय?
रुग्णाच्या गरजेप्रमाणो व्यायाम करून घेणं, विविध व्यायाम सुचवणं यांसह विविध फिजिकल थेरपी करणं म्हणजेच योगा, विविध आयुर्वेदिक प्रक्रिया हे सारं या फिजिकल थेरपीचा भाग.
संधी कुणाला?
फिजिऑलॉजीचा कोर्स करणं यासाठी आवश्यक.
हाय स्किल इलेक्ट्रीशियन
इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर्स मिळतात पण डिप्लोमावाले मिळत नाहीत आणि साधा इलेक्ट्रीशियन मिळणं हे तर फार अवघड काम. त्यात आता नव्या जगात तर सगळं टेकसॅव्ही होत असताना इलेक्ट्रीशियनची गरज मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे.
काम काय?
घरं, इमारती, मॉल, मल्टिप्लेक्स, मोठमोठे हायवे, कंपन्या, प्लाण्ट या सा:यासाठी इलेक्ट्रीशियनला मोठं काम उपलब्ध होत आहे.
संधी कुणाला?
आयटीआयसारखे इलेक्ट्रीशियनचे ट्रेड करणा:या कुणालाही या क्षेत्रत संधी आहे.