शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

दिवाळी शॉपिंग ऑनलाइन करताय; पण....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 6:40 AM

उत्सवाच्या काळात ऑनलाइन खरेदी करताना, डुप्लिकेट उत्पादनांपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी?

ठळक मुद्दे उत्पादनाच्या फोटोंच्या मोहात पडण्याआधी......

- प्रसाद ताम्हनकर

उत्सवांच्या काळात अनेक ऑनलाइन पोर्टल्सतर्फे मोठय़ा प्रमाणावरती सेल आयोजित केले जातात आणि विविध उत्पादनांवरती भरघोस सूटदेखील देण्यात येते. मात्र आपण निवडलेली उत्पादन हे खात्रीशीर आहे का नाही याची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. सर्वात आधी हे उत्पादन कोणातर्फे विकले जात आहे आणि कोणातर्फे शिपिंग केले जात आहे याची नीट माहिती घ्यावी. बरेचदा ‘फुलफिल्ड’ असं बिरु द लावलेली उत्पादनं ही थर्ड पार्टी सेलर्सकडून तुमच्यापर्यंत पोहोचत असल्याचे, त्याबद्दल पूर्ण माहिती घेऊनच उत्पादनाची निवड करावी. उत्पादनाखाली असलेले रिव्ह्यूज नक्की वाचावे, मात्र त्यावरती लगेच विश्वास ठेवू नये. एखाद्या उत्पादनाबद्दल कौतुकच कौतुक करणारे आणि पाच पाच स्टारची रेटिंग देणारे रिव्ह्यूज हे उत्पादक किंवा सेलरकडून खोटय़ा खात्यांद्वारेदेखील टाकलेले असू शकतात. अशावेळी ‘फेकस्पॉट’सारखी ऑनलाइन टूल्स तुम्हाला खात्रीशीर रिव्ह्यूू ओळखण्यासाठी खूपच मदत करतात. उत्पादनाच्या फोटोंच्या मोहात पडण्याआधी, ते फोटो डाउनलोड करून घ्या, आणि गूगल रिव्हर्स इमेजेसच्या मदतीने ते भलत्याच कुठल्या वेबसाइटवरून उचलून तर टाकण्यात आलेलं नाही ना याची खात्री करा. आपण निवडलेल्या उत्पादनाची किंमत, त्याची रिटर्न पॉलिसी, त्याचे स्पेसिफिकेशन्स याची माहिती नीट वाचा आणि समजून घ्या. इंटरनेटवरती उपलब्ध असलेल्या इतरही ऑनलाइन पोर्टल्सची मदत घेऊन आपण निवडलेल्या उत्पादनाची इतर ठिकाणी असलेली किंमत, त्यातील मिळणार्‍या सुविधा याची तुलना करायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरेदी करताना वेबसाइटच्या सुरक्षेची पूर्ण खात्री करून घेऊनच आपली वैयक्तिक माहिती आणि डेबिट / क्र ेडिट कार्डची माहिती दाखल करा.