धोतर- कुडत्याचा ट्रेण्ड येईल?
By Admin | Updated: July 16, 2016 14:26 IST2016-07-15T18:33:45+5:302016-07-16T14:26:01+5:30
नुकताच जागतिक साडी डे सगळीकडे साजरा झाला. त्यादिवशी अनेक मुलींनी इतकेच नव्हे तर अगदी अभिनेत्रींनीही त्यांचे साडीतले फोटो सोशल मिडीयावर शेअर केले

धोतर- कुडत्याचा ट्रेण्ड येईल?
>- भक्ती सोमण
नुकताच जागतिक साडी डे सगळीकडे साजरा झाला. त्यादिवशी अनेक मुलींनी इतकेच नव्हे तर अगदी अभिनेत्रींनीही त्यांचे साडीतले फोटो सोशल मिडीयावर शेअर केले. फेसबुक तर साडीच्या फोटोंनी न्हाऊन गेले होते. एवढे सतत आपटणारे फोटो पाहून अनेकांनी, बापरे आता किती दिवस फक्त साड्याच साड्या चोहीकडे बघायच्या, साड्या नेसण्याचे कौतुक टिकेल चार दिवस असे काहीना काही बोलून दिवस गाजवला. त्यात आता '१०० साडी पॅक्ट'नावाचा एक ट्रेण्डही आहे, वर्षाकाडी शंभर साड्या तरी नेसायच्याच असं ठरवणारा!
एकीकडे महिलांना साड्याचे विविध प्रकार यानिमित्ताने नेसायला मिळतायत. पण यावर मुलींची री ओढणाºया मुलांचं काय? त्यांनाही संस्कृती जपण्यासाठी म्हणा किंवा वेगळेपण दाखवण्यासाठी एखाद्या डे पेक्षा 'धोतर- कुडता'चा ट्रेंड सुरू करायला काय हरकत आहे?
आठवड्यातून एकदा धोतर नेसून त्यावर वेगवेगळ््या स्टाईलचे कुडते घालायचे आणि टाकायचे फोटो एफबीवर. हा प्रकार मुलांना 'धोती अपना स्टाईल' या आशयाने करता येऊ शकतो. मुलांचे वेगवेगळ््या रंगाच्या धोती वा धोतरामधले विथ कुडता फोटोही प्रचंड गाजतील. मुलींप्रमाणेच मुलांनाही मिरवता येईल. असे फोटो टाकल्यावर त्यांच्यावरही पडतील की कमेंटा. कुडत्यात युआर लुकींग फेब, अशा प्रकारच्या.
पण मुलांनी असा ट्रेंड सुरू करायचा असेल तर एकतर त्यात काही महत्वाच्या गोष्टी बघाव्या लागतील.हेही तेवढेच खरे. याबाबतीत चैतन्य काळे म्हणतो. मुली अगदी आॅफिसमध्येही साडी नेसून जाऊ शकतात. पण मुलांना त्यांच्या आॅफिसमध्ये असं काहीतरी हटके करण्याची सवलत मिळणार आहे का? हा विचार व्हायला हवा. जर तशी संधी मिळाली नाहीच तर काय करायचं हा विचारही करायला हवा. शेवटी हा ट्रेंड सुरू करायचा की नाही हे त्याच्यात्याच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे. मी कराटे फिल्डमध्ये असल्याने मला तरी असं धोतरात वावरता येणं शक्य नसल्याचं चैतन्य नमूद करतो.
मुलींप्रमाणे मुलांनींही काहीतरी वेगळं करावं की! इच्छा असेल तर अगदी आपल्या सुट्टीच्या दिवशीही हे ट्रेंड आपण फोलो करू शकतो, जरा काहीतरी रोजच्यापेक्षा वेगळं अनुभवता येईल, असं संग्राम सुरवटे सांगतो.
थोडक्यात काय तर साडी नेसून मुली खूप मिरवत असल्या तरी मुलांनाही मिरवायचं आणि असेल संस्कृती जपायची असेल तर धोतर-कुडत्याच्या ट्रेंडचा विचार करायला हवा! तुम्हाला काय वाटतं?