रुटीन ही महाबोअर आहे असं वाटतं तुम्हाला ? - मग कोरोनाकोंडीत तुमचं काही खरं नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 07:30 IST2020-05-07T07:30:00+5:302020-05-07T07:30:07+5:30

कधीही उठायचं, कधीही झोपायचं, वाटलं तर जेवायचं, नाहीतर नाही, रात्री 2 ला खायचं पहाटे 4 ला झोपायचं हे सगळं करणं म्हणजे थ्रिल आणि रूटीन बोअर असतं असं वाटतं तुम्हाला या कोरोनाकाळात? आणि म्हणून वाट्टेल तसं वागताय तुम्ही?

Do you think routine is a big bore? - Then beaware- in corona lockdown- it is dengerous. | रुटीन ही महाबोअर आहे असं वाटतं तुम्हाला ? - मग कोरोनाकोंडीत तुमचं काही खरं नाही !

रुटीन ही महाबोअर आहे असं वाटतं तुम्हाला ? - मग कोरोनाकोंडीत तुमचं काही खरं नाही !

ठळक मुद्देरूटीन बोअर नहीं होता बॉस!

- गौरी पटवर्धन

‘किती वेळ लोळत पडला/पडली आहेस? ऊठ आता! 12 वाजत आले. घरात काही मदत तर करतच नाहीत, वर यांच्यासाठी वेगळ्याने चहा करा. नुसते घोडे झालेत; पण दमडीची अक्कल आलेली नाही. सारखं आपलं त्या मोबाइलच्या डबडय़ात डोकं घालून बसायचं,  कामं करायला नकोत.’
- लॉकडाउनच्या या काळात बहुतेक तरुण मुलामुलींचा उठायचा घरोघरी हाच अलार्म हाच असतो. 
आई किंवा वडील येऊन हाका मारतात आणि मग स्वत:शी बडबड करत दुस:या खोलीत निघून जातात. 
मात्र आईबापाने कितीही ठणाणा केला तरी होता होईल तोवर अंथरु णातून बाहेर यायचंच नाही असाच तरु ण मुलांचा सध्या प्लॅन आहे.
मुळात त्यांचा प्रश्न आहे की, घाईघाईनं सकाळी लवकर उठून तरी करायचं काय? बाहेर जाता येत नाही, कट्टय़ावर जाता येत नाही, लहान घरात मित्न-मैत्रिणींशी फोनवर बोलता येत नाही, बोलता येत नाही म्हणून चॅटिंग करायला घेतलं की, ‘सारखा मोबाइल हातात’चं तुणतुणं परत चालू होतं. त्यापेक्षा डोळे मिटून डोक्यावरून पांघरूण घेऊन पडून राहणं सोपं वाटतं. त्यात कानात हेडफोन्स असतील तर फारच छान.. 
हा युक्तिवाद एरव्ही योग्य वाटतो. मात्र त्याचे दुष्परिणाम आपल्यावरच होत आहेत हे काही लक्षात येत नाही आणि आईबाबांची एक कटकट यापलीकडे कुणी विषयाला महत्त्व देत नाहीत.
त्यामुळे रोज रात्नी दीड-दोन वाजेर्पयत सोशल मीडिया नाहीतर वेब सिरीज बघण्यात जागं राहायचं. मग 12 वाजल्याशिवाय जाग येत नाही. शिवाय जाग आल्यानंतरही काहीच करावंसं वाटत नाही. जेवायच्या वेळी भूक लागत नाही. भलत्याच वेळी भूक लागते. त्यावेळी जेवावंसं वाटत नाही. मग काहीतरी अरबट चरबट खावंसं वाटतं. ते खाल्लं की वजन वाढतं. असल्या खाण्याने चेहे:यावर पिंपल्स येतात. शिवाय आता लॉकडाउनमुळे बाहेरून काही विकत आणता येत नाही. आई आधीच घरातली कामं करून कंटाळलेली असते, त्यामुळे ती इतर काही करून द्यायला नाही म्हणते. मग संध्याकाळी 5 वाजता एकटय़ाने/एकटीने ताट वाढून जेवायला बसायची वेळ येते. त्यात इतर लोक सोशल मीडियावर ‘आज काय काय केलं’ त्याच्या पोस्ट्स टाकत असतात, भारी भारी टिकटॉक व्हिडीओ बनवून टाकत असतात आणि आपण बसलो इथे येडय़ासारखे हे फीलिंग काही केल्या जात नाही.
 म्हणजे एकुणात होतं काय? तर आपण आईबापाच्या मनासारखं वागत नाही, आपण स्वत:ला पाहिजे तेच करत राहतो; पण त्यातून आपल्याला आनंद मात्न मिळत नाही. बाकी सगळ्या जगाचं चांगलं चाललंय आणि आपण फक्त आयुष्य वाया घालवतोय हे फीलिंग काही केल्या जात नाही. त्यात आईवडील गिल्ट देतच राहतात.  आपली चिडचिड वाढत जाते. कारण आपलं नेमकं काय बिनसलंय आणि बाकी लोक असं काय वेगळं करतायत ज्यामुळे त्यांचं सगळं बरं चाललंय हेच आपल्या लक्षात येत नाही. एक स्टेज अशी येते की ते सीक्रि ट आपल्याला कळलं तर आपणसुद्धा ते फॉलो करून आपलं आयुष्य ताळ्यावर आणून टाकू असं आपल्याला वाटायला लागतं, पण ते सीक्रि ट आहे तरी काय???
तर त्या सीक्रिटचं एक नाव आहे. आणि ते नाव प्रथमदर्शनी तरी फार बोअर आहे.
त्याला म्हणतात - रूटीन!
रूटीन पाळणं हेच सगळ्याचं सीक्रि ट आहे. 
आपला प्रॉब्लेम काय होतो, तर आपण रूटीन कायम इतर कोणासाठी पाळतो. म्हणजे कसं? तर आपण एरवी सकाळी 6 वाजता उठतो. 
कशासाठी? तर 7 वाजता आपला क्लास असतो. खरं म्हणजे इतक्या सकाळचा क्लास लावण्याची आपली इच्छा नसते. पण एक अभ्यासू मित्न सांगतो की तोच क्लास सगळ्यात चांगला आहे. म्हणून आपण त्याच्याबरोबर तिथे जात असतो. किंवा आपण रोज संध्याकाळी 6 वाजता चालायला जातो कारण आपल्या मैत्रिणीने रोज संध्याकाळी चालायला जायचं ठरवलेलं असतं आणि आपण तिला सोबत म्हणून जात असतो. मग ते कम्पल्शन गेल्याबरोबर आपलं रूटीन बिघडतं. आपल्या झोपण्या-उठण्याच्या वेळा बदलतात, शेडय़ूलची वाट लागते.
सकाळचा क्लास बंद झाल्यावरसुद्धा तो मित्न सकाळी त्याच वेळेला इतर काही तरी अभ्यास करत असतो. पुढच्या परीक्षेची तयारी करत असतो. किंवा एखाद्या अॅपवरून एखादी परकीय भाषा शिकत असतो. बाहेर चालायला जाता येत नाही म्हटल्यावर ती मैत्नीण घरातल्या घरात करण्यासारखे व्यायाम शोधून काढते. ती संध्याकाळी तिच्या वेळेला घरात का होईना व्यायाम करते. वजन वाढू नये यासाठी घरात असलेल्या किराणातून काय पदार्थ करता येईल ते शोधते. आणि आपण?
आपण त्यांचे टिकटॉक व्हिडीओज बघतो, मनातून जळफळत वरवर त्यांना हार्ट्स वाटत फिरतो.
हे नको असेल तर त्यावर उपाय एकच, आपण, आपल्यासाठी, आपल्या मर्जीनं ठरवलेलं एक रूटीन पाहिजे आणि होता होईतो ते शंभर टक्के रोज निभावलं पाहिजे. ते कसं निभेल तर आपण आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं द्यावीत. 
आपलं आयुष्य आपल्यासाठी महत्त्वाचं आहे का नाही? आपलं आयुष्य वाया घालवण्यासाठी आहे का? याचं उत्तर द्या आणि फक्त चौदा दिवस एखादी गोष्ट ठरवून करा. चौदा दिवस काही बेसिक रूटीन पाळा. मग त्याची आपोआप सवय होत जाते. 
आपण स्वत:साठी इम्पॉर्टण्ट आहोत असं वाटत असेल तर एवढं तर करावं लागेल, नाहीतर आहेच, रोज सकाळी शिव्यांचा गजर !

तर काय करता येईल?
1. उठायची वेळ (ही बदलायची नाही. रात्नी झोपायला उशीर झाला तरी सकाळी ठरलेल्या वेळेलाच उठायचं. दोन-तीन दिवस दिवसभर झोप आली, डोकं दुखलं तरी चालेल. पण सकाळी ठरलेल्या वेळेलाच उठायचं.)
2. जेवणाची वेळ (दोन्ही वेळचं जेवण ठरलेल्या वेळेलाच करायचं. त्यावेळी भूक लागली नाही तर जेवढी भूक असेल तेवढं खायचं. पण मध्ये मध्ये काही खायचं नाही.)
3. संध्याकाळी निदान 15 मिनिटं व्यायाम करायचा. (घरातल्या घरात चालायचं, सूर्यनमस्कार, योगासनं, जोर बैठका यातलं जे तुम्हाला आवडेल ते करा. पण रोज ठरलेल्या वेळी व्यायाम करायचाच. रोज थोडा थोडा वाढवायचा.)
4. अजून कुठलीही एक अॅक्टिव्हिटी ज्यातून तुम्ही नवीन काहीतरी शिकाल अशी गोष्ट करा. (इंटरनेटवर याचा खजिना आहे. हस्तकलेपासून स्वयंपाकार्पयत आणि व्यायामापासून बेसिक अॅप बनवण्यार्पयत सगळं इंटरनेटवर उपलब्ध आहे.) सुरुवात करताना एक गोष्ट ठरवा आणि तिची वेळ ठरवा.


(गौरी मुक्त पत्रकार आहे.)

 

Web Title: Do you think routine is a big bore? - Then beaware- in corona lockdown- it is dengerous.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.