शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

DIY- स्वतः बनवा , स्वतः वापरा ! - हा आहे फॅशनचा कोरोना ट्रेण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 6:02 PM

फॅशन म्हणजे कुणीतरी डिझाइन केलेली गोष्ट अनेकांनी वापरणं, कोरोनाकाळानं तेही बदलून टाकलं, आता जे आपण स्वत: करू, तेच फॅशनेबल असा नवा ट्रेण्ड आलाय.

ठळक मुद्देजे हवं ते स्वत: बनवा. तोच ट्रेण्ड. तीच फॅशन.

सारिका पूरकर-गुजराथी 

कोविड-19ने जगभरातील विविध उद्योगांना करकचून ब्रेक लावला. फॅशन जगतही यास अपवाद नाही.घरात लॉकडाउनमध्ये अडकलेल्यांना काय गरज आहे फॅशनची अशीही चर्चा झाली.पण तरुणांच्या इस्टाग्राम जगाला फॅशन कळतात. घरबसल्याही इन्स्टावर फॅशनचे वारे वाहिलेच.लॉकडाउन फॅशनची  इन्टाग्राम  साक्ष बनून राहिले आहे. सध्या इन्स्टावर लॉकडाउनमधील स्वत:च बनवलेले फॅशनचे फंडे भरभरून वाहताहेत. बरं, हे काही नामांकित फॅशन डिझायनरने डिझाइन केलेले कपडे नाहीयेत तर घरबसल्या जे सुचले, त्यातून स्वत:वर ट्राय करत हा जुमला, जुगाड केला जातोय. विशेष म्हणजे हे डीआयवाय म्हणजेच डू इट युवरसेल्फ फंडे तुफान व्हायरल होताहेत, हिट होताहेत.‘डीआयवाय फॅशन’ ट्रेंडच या लॉकडाउन काळात जन्माला आलाय. फॅशन डिझायनर, फॅशन ब्लॉगर, फॅशनप्रेमी, कलाकार ही सर्वच मंडळी नवनवीन संकल्पना घरबसल्या, घरात उपलब्ध कपडे व इतर साहित्यातून शोधत हा नुसता डीआयवाय ट्रेंड कल्पकतेचा भन्नाट नमुना आहे.महिलांचे टॉप्स, कुर्तीज, पॅण्ट्स, पुरु षांचे पायजमे, शर्ट्स यांच्या हजारो नवीनवीन डिझाईन्स या ट्रेंडमधून साकारलेल्या दिसताहेत. कुणी सिंड्रेला स्टाइल गाऊन ट्राय करतंय, कुणी टॉयलेट रोल पलाझो ट्राय करतंय, क्वॉरण्टाइन मेकओव्हर म्हणून इन्स्टावर हा असा धुमाकूळ सुरू आहे. घरात ज्या ज्या वस्तू उपलब्ध आहेत, त्यात फॅशन शोधली जातेय. लॉकडाउनमधली निराशा, मरगळ झटकून टाकण्यासाठी काही फंकी ड्रेसेस घरी तयार केले जाताहेत. या ट्रेण्डमुळे अनेकजण फॅशन पर्सनलाइज्ड करू लागलेय. स्वत:ला जे आवडेल ते स्वत:च डिझाइन करून वापरायचं असादेखील ट्रेंड यातून पुढे येऊ लागलाय. जगभरात, भारतात अनेक सेलिब्रिटीही डीआयवाय ट्रेण्ड ट्राय करताहेत.  हाताशी असलेले कपडे, रंग, बटन्स, पिन्स याचा वापर करून कपाटातील कपडय़ांचा मेकओव्हर होऊ लागलाय. घरात अडगळीत ठेवलेली शिलाई मशीन बाहेर निघाली आहेत. अनेकजण घरीच कपडे शिवताना  दिसताहेत. डीआयवाय ट्रेण्डमध्ये टाय अॅण्ड डाय हा प्रकार खूपच हिट झालाय. कारण अत्यंत  कमी साहित्यात करता येणारा हा प्रकार खूप व्हायब्रंट, कलरफूल तरीही ट्रॅडिशनल लूक मिळवून देतो. इंटरनेटवर टय़ुटोरियल्स पाहून अनेकांनी लॉकडाउनमध्ये जुन्या कपडय़ांवर हा फंडा ट्राय केलेला आढळून आला आहे.  टी-शर्ट पेंटिंग हा डीआयवाय प्रकारदेखील खूपच ट्रेण्डी ठरला आहे. हेच नाही तर कपाटातील शूज, हातरूमाल, स्कार्फ यांचासुद्धा मेकओव्हर झालेला दिसून येतोय. होममेड तेच सुंदर असाही ट्रेण्ड कोरोनामुळे आल्याचे चित्न आहे आता. कारण रेडिमेडपेक्षा स्वत:ची कल्पकता, मेहनत यास एक वेगळाच सुगंध असतो, तोच या ट्रेण्डने कोविड काळात अनेकांनी अनुभवला.

डू युवरसेल्फ ब्यूटी प्रोडक्ट्स 

गेल्याच आठवडय़ात करिना कपूरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  या फोटोत तिने स्वत: घरीच तयार केलेला फेस पॅक लावलेला एक फोटो होता आणि दुसरा फोटो होता फेसपॅक धुतल्यानंतरचा. लॉकडाउनमुळे पार्लर्स, ब्यूटिशियन्स यांनाही फटका बसला. पण मग करिनाने घरीच हळद, चंदन, दूध, व्हिटामिन इ वापरून फेसपॅक तयार केला व लावला. या फेसपॅकची रेसिपीही तिने शेअर केली. हा फेसपॅक प्रचंड चर्चेत राहिला, हिटही झाला.   मार्च महिन्यापासून गुगलवर होममेड ब्यूटि प्रोडक्ट्स सर्च करणा:यांची व संख्या दुपटी-तिपटीने वाढल्याचे बातम्या सांगतात.ब्यूटि टिप्स, फेसपॅक, हेअरमास्क, आयब्रो ग्रूमिंग केसं कसे कापायचे, कसे रंगवायचे, आयब्रो कशा शेप करायच्या, होम फेशियल कसे करायचे यासंदर्भातील अनेक साइट्स या दरम्यान सर्च करून डीआयवाय ब्यूटि प्रोडक्ट घरीच तयार केले जाताहेत. थोडक्यात काय तर घरचं ते घरचंच असं आपली आजी, आई नेहमी सांगत असते आपल्याला, ते आत्ता कुठे सगळ्यांना पटायला लागलंय, नाही का? अन्न असो, फॅशन असो, ब्यूटि असो होममेडने आपल्या जीवनात पुन्हा प्रवेश केलाय. 

मॅचिंग मास्क  होय, सध्या जगभरात, भारतात डिझायनर मास्क  चर्चेत आहेत. दिवसरात्न घरात कोंडून घेण्याचे, बाहेर पडताना मास्क घालण्याच्या या  दिवसांमध्येही स्वत:ला प्रेङोंटेबल, फ्रेश आणि तेही मास्क लावून कसे ठेवता येईल या विचारानेच डिझायनर मास्क तयार होऊ लागलेत. हळूहळू घरगुती स्वरूपाच्या या मास्कमेकिंगमुळे मास्कची डिझायनर रूपं समोर येऊ लागली, ती जाम लोकप्रिय होऊ लागली.  डिझायनर मास्क बरोबरच आता मॅचिंग मास्क हा नवा ट्रेण्ड सेट झालाय. जयपूर येथे नुकत्याच झालेल्या एका विवाहसोहळ्यात वधू-वराने चक्क त्यांच्या पेहरावाला मॅचिंग असे जरदोसी वर्क केलेले मास्क लावले होते.  ऑरनॅमेंटल फेस मास्क म्हणून ते हिट झाले. आसाममध्येही नववधूने तिच्या सिल्क साडीला मॅचिंग सिल्क मास्क घातला होता. परंतु, जगभरात होममेड, हॅण्डमेड ट्रेण्डने धूम केलीय, विशेषकरून मास्कची दुनियाच बदलून टाकलीय. मास्क आता फॅशनप्रेमींसाठीही नवी अॅक्सेसरी, स्टाइल स्टेटमेंट ठरतोय. सध्या फ्लोरल प्रिंट, पोलका डॉट, क्विल्ट, कार्टून प्रिंट, स्माइल, लाफिंग, किंवा ड्रॅगन टीथ, चिली प्रिंट, स्पायडर मॅन प्रिंट, काही शब्दांच्या गमतीजमती असलेले असे कितीतरी रंग आणि  ढंग या मास्कचे दिसत आहेत.

मास्क नावाची नवीन फॅशन

कोविड-19चा संसर्ग टाळण्यासाठी मास्क अनिवार्य आहे. मात्न कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडताना छानसे कपडे घातल्यावर तोच तोच मेडिकलमध्ये मिळणारा मास्क घातला तर आजारी असल्याचा फील नको म्हणून डिझायनर मास्क लोकप्रिय होत आहेत.या मास्कचं कस्टमायजेशन करण्याकडे नामांकित ब्रॅण्ड्सचा कल वाढलाय. सुरुवातीला मास्कच्या किमती परवडत नाहीत म्हणून अनेक घरगुती पद्धतीने, म्हणजे जे साहित्य घरात उपलब्ध आहेत त्यापासून मास्क शिवले गेले. आता हेच मास्क डिझायनर बनले आहेत. कापडाचे वेगवेगळे पोत वापरूनही ते बनवले जाताहेत. कॉटनबरोबरच पॉलिएस्टर मास्क आले आहेत. मॅचिंग मास्क तर एकदम हिट आहेत. लग्नसमारंभांसाठी लहंगा, शेरवानीच्या रंगांचा मास्क बनवून घेतला जातोय. अन्य मास्कवरपण कुठे एम्ब्रायडरी, कुठे वेगवेगळ्या प्रिंट्स बघायला मिळताहेत.लवकरच होममेड, हॅण्डमेडचा हा ट्रेंड, मास्क सह ग्लोव्हजदेखील नव्याने येतील अशी चिन्हं आहेत.- प्राची खाडे,  सुप्रसिद्ध स्टायलिस्ट, पर्सनल शॉपर***फॅशनप्रेमीही डिझायनर मास्कबरोबरच कोविड काळात आणखी काय हटके करता येईल या विचारात कामाला लागलेत. काहींनी तर भन्नाट आयडियाज शोधल्या आहेत. न्यू यॉर्कमधील मॉडेल व टेलरिंग व्यावसायिक लिनेट हॅले हिने घरीच न्यू युनिफॉर्म या नावाचा ट्रेंड डिझाइन केलाय. पुरु षांसाठी मास्कच्या रंगाचा टाय, आणि महिलांसाठी मास्कच्याच रंगाचा टॉप किंवा टॉपच्या रंगाचा मास्क ती शिवून विकतेय. कोरिना एमरिच या युवा डिझायनरनेही मास्क स्वत:च डिझाइन करून शिवले आहेत शिवाय या मास्कच्या माध्यमातून ती प्राणी वाचवा हा संदेशही देतेय. भारतातही अनेक नामांकित ब्रॅण्ड्स आता मास्कचा फॅशन अॅक्सेसरी म्हणून वापर करताहेत. महिलांसाठी टय़ुनिक, शॉर्ट्स, मिडीज, गाउन्सबरोबर त्याच रंगाचा, त्याच कापडाचा मास्क तसेच मास्कच्या रंगाचीच, त्या कापडाचीच क्र ॉस बॉडी बॅग असे कॉम्बो मिळू लागले आहेत. फॅमिली पॅक म्हणूनही त्या त्या सदस्याच्या पेहरावाला मॅचिंग मास्क पुरवले जात आहेत.पुरु षांसाठी शर्टच्या रंगाचाच, त्याच कापडाचा मास्क, जोडीला बरमुडा, थ्री फोर्थ पॅण्ट असे कॉम्बो उपलब्ध झाले आहेत. ऑनलाइन पोर्टलवरही ते उपलब्ध होऊ लागलेत. ऑफिससाठी फॉर्मल डिझाइन्सचे माक्स, शॉपिंग, आउटिंगसाठी कॅज्युअल, कंटेपररी डिझाइन्स दिसू लागले आहेत.

( सारिका मुक्त पत्रकार आहे.)