शिस्तीचा रियाज आणि अपार आनंद

By Admin | Updated: July 10, 2014 18:52 IST2014-07-10T18:49:38+5:302014-07-10T18:52:24+5:30

ताकाहिरो अराई मूळचा जपानचा. रॉक बॅण्ड ड्रमर होता, पण स्टिक्स सोडल्या आणि भारतात आला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संतूरवादक पंडित शिवकुमार शर्माकडे तो संतूर शिकतो. भारतात येऊन तो फक्त अभिजात संगीतच नाही तर हिंदीसह भारतीय जीवनपद्धती शिकला. उत्तम हिंदी बोलतो, हा हसरा शिष्य सांगतोय, त्याच्या गुरुजींविषयी आणि त्यांनी शिकवलेल्या नव्या कलेविषयी.

Discipline and immense pleasure | शिस्तीचा रियाज आणि अपार आनंद

शिस्तीचा रियाज आणि अपार आनंद

 

- टीम ऑक्सिजन
 
जपानमध्येही मी म्युझिक शिकतच होतो. रॉक बॅण्ड ड्रमर होतो.हातात स्टिक्स होत्या.बाकीही सगळं म्युङिाक आवडायचं, ऐकायचो.इंडिया, क्लासिकल म्युङिाक असं मात्र काही माहिती नव्हतं. पण नंतर जपानमध्येच मी एका गुरुजींकडे भारतीय क्लासिकल म्युङिाक शिकलो. ते मला प्रचंड आवडलं. त्यातलं काय आवडलं, काय भिडलं, नाही सांगता येणार. पण आवडलं. ते माङो गुरुजी पं. शिवकुमार शर्माचे शिष्य होते. माझी भारतीय संगीताची ओढ पाहता त्यांनी मला पं. शिवकुमार शर्माना म्हणजेच गुरुजींना भेटवलं. आणि त्यांच्याकडेच शिकायचं असं म्हणत मी 2क्क्7 मध्ये भारतात आलो.
आता 8 वर्षे झाली, भारतात येऊन. तेव्हापासून गुरुजींकडे म्युङिाक शिकतोय. एकटाच भारतात राहतोय. माङो काही जपानी मित्र होते, आता खूप सारे भारतीय मित्र झालेत. त्यांच्याकडून हिंदी बोलायला शिकलो. भारतीय पद्धतीचं जेवण बनवायला शिकलो.
सगळं सहज जमलं, मला काहीच अवघड वाटलं नाही. हिंदी येणा:या माङया एका जपानी मित्रनं मला हिंदी शिकवलं. का माहिती नाही, पण हिंदी बोलणं मला काही फार अवघड गेलं नाही. जमलं चटकन. तेच स्वयंपाकाचं. मला आता भारतीय पद्धतीचे पदार्थ करता येतात. आवडतातही. मी जिथे राहतो तिथली भाषा, तिथलं जेवण, माहौल सगळंच आवडायला लागलं. कधीकधी वाटतं की, आपल्या अवतीभोवतीची माणसं जपानी माणसांइतकी फ्लेक्ङिाबल नाहीयेत. पण कधीतरीच, बाकी मला सगळं आवडतं.
मी गुरुजींबरोबर कार्यक्रमांना जातो, त्यांचं ऐकतो. खूप ऐकतो. त्यांच्याबरोबर असलेला एकूणएक क्षण काही ना काही शिकवतच असतो. मला लोक विचारतात की, जपानमधून येऊन हिंदी बोलण्यापासून भारतीय अभिजात संगीतार्पयत सगळंच कसं जमलं. 
मी म्हणतो, ‘जमलं. जे मला आवडत होतं, जे शिकायचंच होतं, ते शिकण्याचा आनंदच इतका मोठा होता की बाकी सगळंही सहज जमलं, अवघड प्रवास संगीत शिकण्याचा, बाकी काय अवघड?’
‘खरं सांगतो, गुरुजींकडे फक्त मी म्युङिाक नाही शिकलो. म्युङिाक तो सिख ही रहां हू, उसके साथ साथ ये भी सिख रहा हूॅँ की बेहतर इन्सान कैसे बनते है, लाईफ हॅण्डल कैसे करते है.’
आज इतकी र्वष झाली शिकतोय, तरी अजून कितीतरी शिकायचं आहे.संगीत तर असीम, अमर्याद आहे, शिकू तेवढं कमी, येईल तितकं कमी.
मला जमतं आता संतूर वादन असं कोणत्या तोंडानं म्हणू. मेरे गुरुजी ही कहते है की, वो अभी भी सिख रहे है.ते जर असं म्हणत असतील तर मला म्युङिाक जमतं, कळतं हे मी कशाच्या बळावर म्हणणार, मी तर आत्ता कुठं शिकायला लागलोय.
जपानमध्ये शिकायचो तेव्हा सुरुवातीला हे क्लासिकल म्युङिाक, वेगवेगळे राग हे काही समजायचं नाही, आत्ता ते सारं समजतं, म्हणून तर त्यातली अमर्याद ताकदही समजते.
गुरुजींच्या सोबत राहून, त्यांच्याकडे पाहूनच हे कळतं की, आपल्याला अजून किती शिकायचंय.
कधीतरी गुरुजींचा फोन येतो. अमुक गोष्टीचा रियाज करायला ये, तमुक शिकायला ये.
त्यावेळी मन अधीर होत त्यांच्याकडे धावत, नवीन काही शिकणं, नव्या आनंदाजवळ नेऊन ठेवून.
ये आनंद एण्डलेस है.अच्छा लगता है.!
 
 
 
 
 
 
 

Web Title: Discipline and immense pleasure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.