शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शाहरुखने ‘टेड टॉक’च्या व्यासपीठावर सहा महिन्यांपूर्वी केलेलं भाषण पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 11:02 IST

गेल्याच आठवड्यात ‘किंग खान’ म्हणेजच शाहरूख खान याचा ५२वा वाढदिवस साजरा झाला. त्याच्या वाढदिवसाचे फोटोग्राफ्स तुम्ही फेसबुक किंवा ट्विटरवर नक्कीच पाहिले असतील.

-   प्रज्ञा शिदोरेगेल्याच आठवड्यात ‘किंग खान’ म्हणेजच शाहरूख खान याचा ५२वा वाढदिवस साजरा झाला. त्याच्या वाढदिवसाचे फोटोग्राफ्स तुम्ही फेसबुक किंवा ट्विटरवर नक्कीच पाहिले असतील. रावन आता बावन झाला वगैरे पीजे वाचूनही आपण हसलोच. पण त्याने ‘टेड टॉक’च्या व्यासपीठावर सहा महिन्यांपूर्वी केलेलं भाषण पाहिलंत का?नसेल पाहिलं तर पाहून घ्या. माझ्या मते आपल्या आवडत्या एसआरकेचा आजपर्यंतचा हा बेस्ट परफॉर्मन्स आहे.तो त्याच्या आकर्षक, मनोरंजक भाषणातून आपल्याला खिळवून ठेवतो. आणि जाता जाता त्याला समजलेल्या आयुष्याबद्दलचं ज्ञान आपल्याला देऊन जातो.व्हिडीओची सुरुवात करताना तो आपल्याला त्याच्या लहानपणच्या दिल्लीत घेऊन जातो. त्याचं दिल्लीतलं लहानपण, त्याचे आईवडील, त्यांचा मृत्यू असं सगळं वर्णन करतो. कुठेही नाटकीपणा नाही, खोटे हावभाव नाहीत. सरळ साधा संवाद. मग, तो म्हणतो की, ‘ही मानवजात बरीचशी माझ्यासारखीच आहे !’ मग तो त्याच्या आयुष्यातली प्रत्येक पायरी आणि मानवजातीची पहिली पावलं अशी सुंदर गुंफण करतो. त्यामध्ये मग इंटरनेटनं बदललेलं जग, सार्वजनिक आणि खासगी आयुष्याच्या बदललेल्या सीमारेखा आपल्या अनुभव कथनामधून अचूक टिपतो.आणि मग तो आपल्या पन्नाशीबद्दल बोलायला लागतो.तो म्हणतो की, आपली मानवजात आत्ता अशा एका उंबरठ्यावर आहे जेव्हा तिला सगळ्यात गरज आहे ती प्रेम आणि दयाभावाची. मी स्वत: आता अनुभवातून शहाणा झालो आहे. अनेक बरेवाईट अनुभव घेतले आहेत. म्हणून आता वेळ आली आहे. अनुभवांमधून शिकण्याची ही गोष्ट आहे. मानवजातीचं भविष्य आता एका म्हातारपणाकडे झुकलेल्या सुपरस्टारसारखं असायला हवं, असं तो म्हणतो. म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला हा व्हिडीओ बघूनच समजेल.या भाषणामध्ये तो काय सांगतो ते हे खरं आणि महत्त्वाचं वाटतं याचं कारण त्याची बोलण्याची शैली. कदाचित खूप खरं सांगत असल्यामुळेच ते आपल्या मनाला एवढं भिडतं.हा व्हिडीओ बघण्यासाठी टेड टॉकच्या वेबसाइटवर जाऊन शाहरूख खान असं टाइप केलं तरी लगेचच तुम्हाला तो बघायला मिळेल.किंवा ही लिंक पहा..https://www.ted.com/talks/shah_rukh_khan_thoughts_on_humanity_fame_and_love

किंग खानबद्दल खरं तर आपल्याला ब-यापैकी माहिती आहेच. त्याचे डायलॉग्ज अनेकजण तोंडपाठ म्हणूनही दाखवतात. पण त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला हवी असेल तर त्याची विकिपीडिया एण्ट्री आणि आयएमडीबी या वेबसाइटवरची माहिती नक्की वाचा. इथं त्याने आजपर्यंत केलेले सर्व चित्रपट आणि इतर गोष्टींची इत्थंभूत माहिती आहे. या टेड टॉकवर टेड टॉक ब्लॉग्सवर लोकांनी भरभरून लिहिलं आहे. हा व्हिडीओ आवडला आणि तो जे बोलतो आहे ते पटलं तर या एण्ट्रीजदेखील नक्की वाचा. यापैकी ब्रायन ग्रीन नावाच्या पत्रकाराने लिहिलेला ब्लॉग खरंच कमाल आहे.तो या लिंकवर वाचा..

https://blog.ted.com/the-quest-for-love-and-compassion-shah-rukh-khan-speaks-at-ted2017/ 

टॅग्स :Shahrukh Khanशाहरुख खान