DANGER ZONE ?
By Admin | Updated: June 5, 2014 17:47 IST2014-06-05T17:47:25+5:302014-06-05T17:47:25+5:30
ते अभ्यासबिभ्यास करतात. पेपरही बरे गेले म्हणतात. आणि मग सांगून टाकतात, मी ठरवलंय, ‘यंदा ‘ड्रॉप’ घ्यायचा. आणि वर्षभराचा ड्रॉप घेऊन असे घरी ‘बसणारे’ बरेच आहेत.

DANGER ZONE ?
>ते अभ्यासबिभ्यास करतात.
पेपरही बरे गेले म्हणतात.
आणि मग सांगून टाकतात,
मी ठरवलंय,
‘यंदा ‘ड्रॉप’ घ्यायचा.
आणि वर्षभराचा ड्रॉप घेऊन असे
घरी ‘बसणारे’ बरेच आहेत.
आता पालकच
मुलांना सांगताहेत,
‘तुला हवा ना,
त्यापेक्षा भारी
स्मार्टफोन घेऊन देतो.
बट गिव्ह मी अ रिझल्ट.
तुझा सोशल प्रेझेन्स
दिसला पाहिजे..
‘व्हॉट्स अँप’-‘फेसबुक’वर
तुझे चर्चे पाहिजेत.’
नाहीतर तुझं
सोशल नेटवर्किंग
वाढेल कसं?
एसएससी बोर्ड?
सो बोअरिंग.
इंटरनॅशनल बोर्डच
घ्यायचं यंदा.
अँब्रॉड जायचं तर
तयारी करायलाच हवी
असं त्यांनी ठरवून टाकलंय.
कसला बोअर कौन्सिलर आहे, असंच त्यांना वाटतं.
त्यांनाच का, त्याच्या मम्मी-पप्पांनाही वाटतं,
जरा बरा करिअर कौन्सिलर शोधायला हवा.
एक ना दोन, तीन कधीतरी चार-चार कौन्सिलर
ते गाठतात.टेस्टवर टेस्ट करत राहतात आणि विकत घेतात
फक्त कन्फ्युजन आणि फ्रस्ट्रेशन
काही जणांचा भेजा एकदम क्लिअर, नो कन्फ्युजन अँट ऑल.
जिथे पैसा तिथे जाऊ, उगीच माईण्डचे फार लाड करायचे नाहीत.
म्हणून तर त्यांनी ठरवून टाकलंय, मार्क नाही पडले
तर पप्पांना पैसे भरायला लावू पण डिग्री तर इंजिनिअरिंग हवीच.
विषय तज्ज्ञ -
डॉ. हरीश शेट्टी
(सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ)
अनुराधा प्रभुदेसाई
(करिअर कौन्सिलर)
(‘करिअर स्पेशल’ मालिकेतला समारोपाचा अंक)
विशेषांक लेखन -
ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com