क्रिएटिव्हीटी इन टाइम ऑफ कोरोना, हा ट्रेंड काय आहे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 13:38 IST2020-05-14T13:37:46+5:302020-05-14T13:38:39+5:30
लॉकडाउनने तर जगभरात तरुणांना घरात बसवलं आहे, त्यातले काहीजण मात्र वेळ सत्कारणी लावत, स्वत:ला ‘सुकून’ हवा म्हणून अनेक कल्पक, कलात्मक गोष्टी करत आहेत.

क्रिएटिव्हीटी इन टाइम ऑफ कोरोना, हा ट्रेंड काय आहे ?
सारिका पूरकर-गुजराथी
वेडेपिसे होऊन घडय़ाळाच्या काटय़ांवर धावत होतो आपण सगळे.
दिल ढुंढता है फिर वही फुरसत के रात दिन, अशी गाणी म्हणत कढही काढायचो की, काय ती फुरसत नाही, जगण्यातला निवांतपणाच हरवला.
मात्र कोरोनाने सगळ्यांनाच ही फुरसत दिली, आणि जगण्याचा नव्यानं विचार करण्यापलीकडे आपल्या हातात फारसं काही उरलं नाही.
कोरोना गेला तरी कोरोना आधीचं आणि नंतरचं जग सारखं - सेम असणार नाही हे तर आताच उघड आहे.
मात्र आता कोरोना काळातही जो तो आपल्यापुरती मानसिक ऊर्जा टिकवण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. उमेद देण्यापलीकडे फारसं हातात काही नाही अशीही अवस्था अनेकांची आहे.
आणि भारतातच कशाला जगभरात हे चित्र आहे. अनेक तरुण आपल्या लॉकडाउनच्या काळात काहीना काही करून पाहत आहेत.
त्यातल्या काहींनी आपले अनुभव समाज माध्यमात लिहिले त्यातून सापडलेल्या या काही नोंदी.
****
शिकागोमधील रॉबेन फ्रॉस्ट व व्हिक्टोरिया रोङोली हे शिकागोत एका अॅड एजन्सीत काम करतात. लॉकडाउनमुळे रोङोली फ्लोरिडात, तर फ्रॉस्ट शिकागोत आपापल्या घरात आहेत. भरपूर वेळ हाताशी मिळालाय म्हणून ते एकमेकांना लॉकडाउन काळात काढलेले फोटो सोशल मीडियावर पाठवत होते. अचानक दोघांनी ठरवलं, या फोटोंचा वापर करून पोस्टकार्ड डिझाइन करायचं. त्यांनी न्यू यॉर्क लंडन, अॅमस्टरडॅममधील आपल्या मित्नांना आवाहन केलं, की लॉकडाउन काळात त्यांच्या घराच्या खिडकीतून, गॅलरीतून, बाल्कनीतून काढलेले फोटो पाठवा, हे फोटो काढताना त्यांच्या मनात काय भावना होती, घरात बंद असताना खिडकीबाहेरचं हे जग त्यांना कसं दिसलं याविषयीही लिहा. त्या मित्रंनी असे फोटो काढून, त्याखाली आपल्याला जे सुचलं, वाटलं, दिसलं ते लिहून पाठवलं. या भावनांचेच कॅप्शन त्यांना फोटोंना देण्यात आले.
आणि त्यातून तयार झालं, क्वॉरण्टाइन व्ह्यूज ऑफ सिटीज क्लासिक पोस्टकार्ड्स. या कार्डाना आता छान प्रतिसाद मिळाला आणि त्याचं कौतुकही झालं सोशल मीडियात.
**
तसे अनेकांनी घरी बसून गाणी रेकॉर्ड केली, जनजागृती व्हिडीओही तयार झाले. अनेक कलाकार सोशल मीडियात लाइव्ह गाणी सादर करत आहे.
आपल्याकडेही सुखनची मैफल अशीच नुकतीच ऑनलाइन रंगली. काही अॅपदेखील संगीतप्रेमींसाठी पर्वणी ठरत आहेत. जगभरात अनेक भाषांतले कलाकार सध्या विविध अॅपवर, यू-टय़ूबवर आणि समाजमाध्यमांत आपली कला सादर करून श्रोत्यांशी कनेक्ट होऊ पाहत आहेत.
जाहिरात ही 65वी कला म्हणून ओळखली जाते. म्हणूनच लॉकडाउन काळात व्यवसाय, उद्योग ठप्प असले तरी जाहिरात कलेला ओहोटी आलेली नाही. उलट लॉकडाउन परिस्थितीचा बॅकड्रॉप घेऊन अतिशय कल्पकतेने जाहिराती बनवण्यातही अनेकजण अग्रेसर आहेत. शॉर्ट फिल्ममेकिंगही खूप जोरोशोरो से सुरू आहे. लॉकडाउन काळातील भवतालचं प्रतिबिंब शूट करताना दिसतेय तरुणाई. काही फिल्म्स फेसबुकसाठी तयार केल्या जाताहेत. आपल्याकडे एन सूर्या, सचिन राज, आर एनेयन या वकिली शिकणा:या तीन विद्याथ्र्यानी घरात बसून 3 इन, कोरोना आउट ही फिल्म बनवलीय. फिल्ममेकिंगची हौस लॉकडाउनमुळे पूर्ण झाल्याचे ते म्हणताय. ऑनलाइन फिल्ममेकिंगचे टय़ुटोरिअल्स पाहून त्यांनी ही करामत केलीय.
**
चित्नकलेनेही लॉकडाउन काळात अनेक नवीन विषय हाताळण्याची संधी युवा कलाकारांना दिलीय. किमी जुनेजा हिला दुबई येथे होणा:या वल्र्ड आर्ट फेस्टिव्हलमध्ये मला सहभागी व्हायचं होतं. परंतु, ते लांबणीवर पडलंय आता. लॉकडाउन पूर्वी किमीने नेहमीच मैत्नी, प्रेम, सुंदरता अशा विषयांवर चित्नं काढली होती. लॉकडाउन काळात मात्न तिने स्पिरिच्युअल पेंटिंग केले. हा विषय या काळात हाताळता आल्याचं समाधान वाटतं असं ती सांगते. चित्नकारच कशाला, आपल्याकडे सलमान खान, संस्कृती बालगुडे, हिना खान, करण टैकर या कलाकारांनीही लॉकडाउनचा पुरेपूर उपयोग चित्नकलेसाठी करून घेतलाय. सलमानने त्याचे चारकोल पेंटिंग, संस्कृतीने तिचे वॉल पेंटिंग, हिना खान, करण टैकर यांनी त्यांचे स्केच नुकतेच सोशल मीडियावर शेअर केलं होतं. अशा अनेक चित्नांच्या अनेक कथाच यानिमित्ताने तयार झाल्याय.
***
काही ऑनलाइन क्लासेसही सुरू झालेत, त्याचाही आनंद कलासक्त तरु णाई घेतेय. ऑनलाइन कथावाचन, कवितावाचन स्पर्धाही आपल्याकडे घेतल्या जाताहेत.
जगणं हवालदिल होतं, तेव्हा कला माणसाला जगवते म्हणतात. या कोरोना कोंडीतही कलेतून अशी उमेद निर्माण होते आहे.
(सारिका मुक्त पत्रकार आहे.)