coronavirus : sports in crisis - काय सांगतो आजवरचा इतिहास?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 15:52 IST2020-04-30T15:22:03+5:302020-04-30T15:52:14+5:30
खेळावर संकट आलं की त्या संकटात खेळ कसे तगतात, याची आजवरची ही कहाणी. ती कुठल्याही मॅचपेक्षा कमी थरारक नाही.

coronavirus : sports in crisis - काय सांगतो आजवरचा इतिहास?
-समीर मराठे
2017 मध्ये लंडनच्या ओव्हल मैदानावर झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी आठवते?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ती फायनल होती. स्टेडियम प्रेक्षकांनी नेहमीप्रमाणोच खचाखच भरलेलं होतं. एक क्रिकेट फॅन स्टेडिअममध्ये फिरत होता. त्यानं घातलेल्या जर्सीवर लिहिलं होतं, ‘ही मॅच जो जिंकेल, त्याला काश्मीर मिळेल !’
खेळ लोकांची मनं कसं घडवतो, त्याचं हे एक उदाहरण.
खरं तर खेळ, क्रिकेट, राजकारण, काश्मीर, युद्ध. यांचा अर्थाअर्थी तसा काहीच संबंध नाही. पण लोकांची मनं, समाजमन घडवण्यात आणि राजकारण, अर्थकारण, समाजकारणासाठीही आजवर खूप वेळा खेळांचा उपयोग झाला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने तर प्रत्यक्ष युद्धापेक्षाही जास्त हिरिरीने मैदानावर आणि ते प्रत्यक्षात तसेच टीव्हीवर पाहणा:या, माध्यमांत त्यांच्या बातम्या वाचणा:या रसिकांच्या मनांतही अधिक अटीतटीनं खेळलं गेलं आहे.
आपापल्या देशांतील परिस्थिती, इतकंच काय, आपलं दु:ख, दैना आणि रोजच्या जगण्याची भ्रांत विसरायला लावण्यासाठीही आजवर अनेकदा भारत आणि पाकिस्तान यांच्या क्रिकेट मॅचकडे पाहिलं गेलंय.
अर्थातच या दोन देशांमधील तणाव निवळण्यासाठीही ‘क्रिकेट डिप्लोमसी’चा वापर अनेकदा झालाय. या दोन्ही देशांतील क्रिकेट सामन्यांनी प्रेक्षकसंख्येचे रेकॉर्डही आजवर अनेकदा मोडले आहेत.
2क्19ला झालेल्या वर्ल्ड कप क्रिकेटच्या सामन्यांनी दर्शकसंख्येचा विक्रम करताना जगभरात विविध माध्यमांतून चक्क एक अब्ज 6क् कोटी प्रेक्षकसंख्येची मर्यादा ओलांडली. त्यात भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सर्वोच्च प्रेक्षकसंख्या होती.
‘मॅच फिक्सिंग’सारख्या प्रकारांनी क्रिकेटच्या राजेशाही खेळाला, काही काळ कमीपणाही आणला; पण लोकांमधलं स्पिरिट जागं ठेवण्यासाठी कायमच क्रिकेट आणि इतर खेळांनी लोकमतावर अधिराज्य गाजवलंय.
आज कोरोनाच्या काळात तर जगभरात असा एकही देश आणि एकही खेळ नाही, ज्याला कोरोनाचा फटका बसला नाही. जवळपास सर्वच खेळांचे सामने एकतर रद्द तरी झाले किंवा पुढे तरी ढकलण्यात आले. यंदाचं जपान ऑलिम्पिकही त्याला अपवाद नाही.
.पण तरीही कोरोना कधी संपतो, यापेक्षाही खेळांचे सामने पुन्हा कधी सुरू होतात, याकडे अख्ख्या जगाचं लक्ष लागलं आहे.
कारण मैदानावरची हीच ऊर्जा आणि हेच स्पिरिट त्यांना आपल्या वर्तमान आणि भविष्याच्या चिंतेपासून दूर नेणार आहे. त्यांच्यातला आत्मविश्वास, जिद्द आणि प्रेरणा पुन्हा सकारात्मकतेकडे नेणार आहे.
या सामन्यांमुळे लोक आपल्या समस्या विसरतात, आपलं दु:ख, दैना पाठंगुळी फेकून देतात. त्यांच्यातलं नैराश्य झटकलं जातं आणि ते पुन्हा ताजेतवाने होऊन जगण्याच्या लढाईला सज्ज होतात. उमेदीनं भविष्याकडे बघायला लागतात.
कोरोना संपेल तेव्हा संपेल; पण जगावर जेव्हा जेव्हा आपत्ती आली, दु:ख, वेदना आणि कष्टांचा सामना त्यांना करावा लागला, त्या त्या वेळी, खेळानंच त्यातून मार्ग काढला, जगाला एक पाऊल पुढे नेलं हा इतिहास आहे.
जगातली सगळीच युद्धं आज प्रत्यक्ष रणांगणापेक्षाही खेळांच्या मैदानांवर खेळली जातात, असं म्हटलं जातं.
ऑलिम्पिक हे त्याचं जिवंत उदाहरण, पण याच खेळांनी जगाला पुढे नेण्याचं, वैरभाव विसरायला लावण्याचं संकटमोचक कामही वेळोवेळी केलं आहे.
कोरोनाच्या साथीमुळे आज कोणताही देश, कोणताही क्लब आणि कोणतीही संघटना आपापल्या खेळांचे सामने पूर्ववत सुरू करण्यास तयार नाही; पण अशाच प्रकारची आपत्ती यापूर्वी जगावर कधी आली होती? आणि आली होती का?
- हो, पण त्याचं स्वरूप आताइतकं भयानक नव्हतं.
काही वर्षापूर्वी ‘इबोला’च्या साथीनं जगावर भीतीची छाया धरली होती. त्यावेळी त्याचं रूप जगानं पाहिलं होतं. संपूर्ण आफ्रिका खंडातील देशांसाठी ‘आफ्रिकन नेशन्स कप’ (एएनसी) ही फुटबॉलची नामांकित स्पर्धा भरवली जाते. वर्ल्डकप फुटबॉलच्याच हिरिरीनं सगळे आफिक्रन देश आणि त्यांचे खेळाडू या स्पर्धेत प्राणांची बाजी लावून खेळतात. 2015चे हे सामने त्यावेळी मोरोक्कोत होणार होते; पण इबोलाच्या संसर्गाच्या भीतीनं मोरोक्कोनं हे सामने घेण्यास असमर्थतता दर्शवली, एरवी ही स्पर्धा आपल्याकडे घ्यावी, यासाठी सर्वच आफ्रिकन देशांमध्ये अहमहमिका लागते, जगभरातल्या प्रेक्षकांनी आपल्या देशाला भेट द्यावी यासाठी प्रय} केले जातात; पण यावेळी अनेक देश ही स्पर्धा घेण्यासाठी अनुत्सुक होते, एवढंच काय, ‘इबोला इन्फेक्टेड’ पश्चिमी आफ्रिकन देशांतील लोकांनी आपल्याकडे येऊ नये, असंही जगातील अनेक देशांना वाटत होतं.
साथीच्या रोगांमुळे अजून एकदा जागतिक सामन्यांवर प्रश्नचिन्ह उमटलं होतं, ते म्हणजे 2003 सालची महिला फुटबॉल स्पर्धा. चीनमध्ये ही स्पर्धा होणार होती; पण ‘सार्स’च्या भीतीमुळे या स्पर्धा अमेरिकेत हलवण्यात आल्या. महिला वर्ल्ड कप हॉकीचे सामनेही चीनमध्येच होणार होते; पण नंतर ही स्पर्धाच रद्द करण्यात आली.
1918च्या दरम्यान इन्फ्लूएन्झाच्या महामारीनं जगावर असंच एक संकट आणलं होतं; पण त्यावेळी ऑलिम्पिकवगळता आंतरराष्ट्रीय सामने फारसे कुठे होतच नव्हते. ऑलिम्पिक सुरू झालं 1896पासून, पण 1912र्पयत या स्पर्धेचं स्वरूपही तसं छोटंच होतं.
पण ऑलिम्पिकचा इतिहास काय सांगतो?
कुठल्या साथींमुळे, आजाराच्या धोक्यामुळे ऑलिम्पिकचे सामने कधी रद्द किंवा पुढे ढकलावे लागले?.
याबाबतीतही कोरोनानं आपलं वेगळंपण राखलं आहे.
यंदा 2क्2क्ला जपानमध्ये होणार असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा कोरोनामुळे वर्षभर पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कुठल्याही कारणानं ऑलिम्पिकच्या स्पर्धा पुढे ढकलाव्या लागण्याची ही आजवरची पहिलीच वेळ. याआधी तीन वेळा ऑलिम्पिकच्या स्पर्धा रद्द झाल्या; पण त्या पुढे कधी ढकलाव्या लागल्या नव्हत्या.
पहिल्या महायुद्धाच्या काळात 1916ला आणि दुस:या महायुद्धाच्या काळात 1940 आणि 1944मध्ये ऑलिम्पिकच्या ठरलेल्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. (याशिवाय याच काळात; म्हणजे 1940 आणि 1944च्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धाही रद्द करण्यात आल्या होत्या.)
मात्र ज्या ज्या काळांत जगात, विविध खंडांत, देशांत आपत्ती आली, त्या त्या वेळी खेळांचे सामने रद्द करण्यात आले किंवा पुढे ढकलण्यात आले; पण परिस्थिती ‘नॉर्मल’ करण्यासाठी शक्य तितक्या लवकर ते पुन्हा सुरू करण्यासाठीही प्रय} करण्यात आले.
पुन्हा भारत आणि पाकिस्तान ! अगदी पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. अनेकदा हा तणाव युद्धात परावर्तित होईल की काय, अशीही भीती निर्माण झाली; पण त्या त्या प्रत्येक वेळी, परिस्थिती ‘नॉर्मल’ करण्यासाठी पहिल्यांदा भारत-पाक क्रिकेट सामन्यांचाच विचार करण्यात आला, अगदी हे सामने झाले नाहीत तरी.. (अर्थातच तणाव वाढल्यावर पहिल्यांदा गदा आली तीही याच सामन्यांवर !) आता कोरोना काळात संपूर्ण जग मंदीच्या खाईत लोटलं जात असताना, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी भारत-पाक सामन्यांचा विचार केला जातोय, तोही यामुळेच.
जगाच्या आजही स्मरणात असलेला 9/11चा; 11 सप्टेंबर 2क्क्1ला अमेरिकेवर झालेला, आजवरचा जगातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. या हल्ल्यानं अख्खं जगच हादरलं. अमेरिकन नागरिक तर अगदी सैरभैर झाले. आपलं आयुष्य किती क्षणभंगूर आहे, कोणत्याही क्षणी आपला जीव जाऊ शकतो, या भयाण वास्तवानं लक्षावधी नागरिकांना नैराश्येच्या गर्तेत ढकलून दिलं. पण या नैराश्यातूनही त्यांना लवकर बाहेर काढण्याचं काम केलं ते स्पोर्ट्सनं!
अमेरिकेत बेसबॉल खूपच लोकप्रिय आहे. तिथे ‘मेजर लीग बेसबॉल’ (एमएलबी) या संघटनेतर्फे बेसबॉलची वर्ल्ड सिरीज भरवली जाते. तब्बल 117 वर्षाची परंपरा असलेल्या आणि अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय असलेल्या या स्पर्धेत वेगवेगळ्या प्रांतातील तब्बल तीस टीम भाग घेतात. 9/11च्या हल्ल्यामुळे अर्थातच ही स्पर्धा पुढे ढकलली गेली; पण हल्ल्यानंतर केवळ पाच आठवडय़ांतच ही स्पर्धा घेण्याचा निर्णय तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जार्ज बुश आणि संघटनेच्या अधिका:यांनी घेतला. सैरभैर झालेल्या, निराशेच्या गर्तेत बुडालेल्या आणि आत्महत्येच्या विचाराप्रत आलेल्या अनेक नागरिकांना या सामन्यांनी पुन्हा माणसांत, आयुष्यात आणलं. जगण्यासाठीचं त्याचं मनोबल वाढवलं. अमेरिकेच्या सांस्कृतिक आणि क्रीडाक्षेत्रत ही घटना आजही मैलाचा दगड समजली जाते.
खेळ हा म्हटलं तर केवळ काही जणांमध्ये, व्यक्तींमध्ये, टीममध्ये खेळला जाणारा उपक्रम; पण जगाच्या, त्या त्या देशांच्या आणि व्यक्तींच्या जडणघडणीत त्यानं खूप मोठा व्यापक परिणाम घडवून आणला आहे.
आपत्ती आणि संकटाच्या काळांतील त्याचं महत्त्व तर असाधारण.
याच स्पोर्ट्सनं आजवर संघभावना दृढ केली आहे. जगाला जवळ आणलं आहे. एकमेकांतला वैरभाव विसरायला लावला आहे. संकटांच्या काळात आशेचा किरण दाखवला आहे. जगण्यावरचा आणि हातात हात घालून चालण्यावरचा विश्वास वाढवला आहे. आपापल्या देशाची शान वाढवली आहे. मान ताठ करून चालायला शिकवलं आहे.
एवढंच नाही, स्पोर्ट्सनं त्या त्या देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भर घातली आहे. देशांतले रोजगार वाढवले आहेत. लोकांमध्ये ऐक्य आणि समर्पणाची भावना वाढीस लावली आहे. जगण्यासाठीचे आणि आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणारे आयकॉन्स निर्माण केले आहेत, मुलांसाठी आदर्श घडवले आहेत, जिंको अथवा हरो, मूल्यांच्या एका समान धाग्यात सर्वाना बांधून ठेवलं आहे..
कोरोनानं प्रत्येकाच्या मनात एक-दुस:याविषयी अविश्वास आणि संशय निर्माण केला असताना, स्पोर्ट्स हाच घटक पुन्हा आपल्या सगळ्यांना प्रेम आणि आपुलकीनं जोडण्यासाठी आपली उमेद जागी करणार आहे..
जेसी ओवेन्सनं केला हिटलरचा पराभव!
जेसी ओवेन्स हा अमेरिकेचा एक महान अॅथलिट. आफ्रिकन अमेरिकन.
हिटलरनं ज्या काळात ज्यूंना संपवायला सुरुवात केली आणि अख्ख्या जगाला महायुद्धात ओढून लाखो लोकांच्या मृत्यूला तो कारणीभूत ठरला, त्याच काळात 1936ला जर्मनीत बर्लिनमध्ये ऑलिम्पिकचे सामने होते. सर्व जगात आर्यच श्रेष्ठ आणि जर्मन आर्य आहेत, म्हणून जर्मनीनं जगाचं नेतृत्व केलं पाहिजे अशी त्याची धारणा होती. याच बर्लिन ऑलिम्पिकमध्ये प्रत्यक्ष हिटलरसमोर आफ्रिकन वंशाच्या जेसी ओवेन्सनं विक्रमांचा धडाका लावला. शंभर मीटर, दोनशे मीटर, चार बाय शंभर मीटर रिले आणि लॉँग जम्प अशी तब्बल चार गोल्ड मेडल्स पटकावताना त्यानं तीन वर्ल्ड रेकॉर्डही केले. आपल्या या पराक्रमानं ‘आर्यच जगात सर्वश्रेष्ठ’ या हिटलरच्या भूमिकेला त्याच्यासमोरच खोटं ठरवून मूठमाती देताना हिटलरच्या विचारांचा पराभवही केला.
याच ऑलिम्पिकमधली अजून एक घटना म्हणजे जर्मनीचाच एक अॅथलिट कार्ल लुडविग लॉँग ऊर्फ ‘लूज लॉँग’ यानं लांब उडीत जेसी ओवेन्सनंतर दुस:या क्रमांकाची कामगिरी करताना सिल्व्हर मेडल पटकावलं. सुवर्णपदक विजेत्या जेसी ओवेन्सचं सर्वप्रथम अभिनंदन तर केलंच; पण हातात हात मिळवून दोघं एकत्रच मेडल घेण्यासाठी गेले. या घटनेबद्दल जेसी ओवेन्सनं म्हटलंय, ‘प्रत्यक्ष हिटलरसमोर अशी कृती करणं, मला मित्र माणून माझा हात हातात घेऊन मेडल घ्यायला जाणं म्हणजे हिमतीची (आणि तत्त्वांची) परिसीमा होती. माझी आतार्पयतची सर्व गोल्ड मेडल्स आणि कप वितळवूनही या क्षणाची किंमत होणार नाही. 24 कॅरट अस्सल मैत्रीचं जे कोंदण लॉँगनं लावलं त्याची तुलना कशाशीही करता येणार नाही.
‘कॅशिअस क्ले’चा युद्धविरोधी पंच!
मुहम्मद अली ऊर्फ ‘कॅशिअस क्ले’ आजही शतकातला सर्वाेत्तम बॉक्सर म्हणून गणला जातो. 196क्च्या रोम ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल पटकावणा:या मुहम्मद अलीचं ऑलिम्पिक स्पर्धावर खूप प्रेम होतं आणि आपल्या अमेरिकन खेळाडूंचा तो खंदा पुरस्कर्ताही होता. पण तरीही आपल्याच देशात त्याला वंशभेदाचा सामनाही करावा लागला. फक्त गो:या लोकांसाठी असणा:या एका रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तिथे सव्र्हिस देणं नाकारल्यामुळे उद्वेगानं त्यानं आपलं ऑलिम्पिक गोल्ड मेडल नदीत फेकून दिलं असं म्हटलं जातं. व्हिएतनामविरुद्धच्या लढाईत अमेरिकन लष्करात दाखल होण्यास नकार दिल्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली. तुरुंगातही जावं लागलं. पण नंतर अथेन्स येथे झालेल्या शंभराव्या ऑलिम्पिकमध्ये ऑलिम्पिक ज्योत पेटवण्याचा सन्मान मुहम्मद अलीला देण्यात आलं आणि दुसरं रिप्लेसमेंट मेडलही त्याला देण्यात आलं. युद्धविरोधी प्रय}ांचा समर्थक म्हणून त्याच्या या कृतीकडे पाहिलं जातं.
कॅथी फ्रीमननं एकत्वाची भावना केली प्रबळ !
सिडनी येथे भरलेलं 2क्क्क्चं ऑलिम्पिक. मायदेशात होत असल्यानं अर्थातच ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा 628 खेळाडूंचा भलामोठा ताफा या स्पर्धेत होता. पण त्यात केवळ 11 आदिवासी होते आणि त्यातली एक होती कॅथी फ्रीमन. 4क्क् मीटर स्पर्धेची विजेती म्हणून तिच्याकडे पाहिलं जात असलं आणि ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित करण्याचा मानही तिला दिला गेला असला, तरी ‘काळ्या-गो:याचा’ भेद तिथेही होताच. प्रचंड दडपण असतानाही आयकॉनिक स्किनसूट परिधान केलेल्या कॅथीनं स्पर्धेत सहजपणो गोल्ड तर पटकावलंच; पण आपल्या विजयाचं प्रतीक म्हणून ऑस्ट्रेलियन आणि आपला पारंपरिक आदिवासी ध्वजही तिनं उंचावले. आपल्या या कृतीतून ऑस्ट्रेलियाची ‘सहिष्णू’ ही प्रतिमा तर तिनं चिरंजिव केलीच; पण ऑस्ट्रेलियन जनतेतही एकत्वाची भावना दृढ केली.
दोन मुठींनी दिलं नागरी हक्कांना बळ!
अमेरिकेत समान नागरी हक्कांची चळवळ जोरात होती, त्याचवेळी मेक्सिकोमध्ये 1968चे ऑलिम्पिक सामने भरवण्यात आले होते. आपल्यावरच्या अन्यायाविरुद्धचं प्रतीक म्हणून आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या खेळाडूंनी या स्पर्धेवर बहिष्कार टाकावा असं आवाहन अमेरिकेतील काही नागरी हक्क कार्यकत्र्यानीही केलं होतं; पण त्याऐवजी टोमी स्मिथ आणि जॉन कालरेस या खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला आणि दोनशे मीटर स्प्रिंटमध्ये अनुक्रमे गोल्ड आणि ब्रॉँझ मेडलही पटकावलं. त्यानंतर पदक प्रदान समारंभाच्यावेळी राष्ट्रगीताची धून सुरू असताना या दोघा खेळाडूंनी आपल्या मुठी उंचावून ‘ब्लॅक पॉवर सॅल्यूट’ केला. त्यांच्या या अहिंसक; पण ठाम कृतीनं नागरी हक्क चळवळीच्या संघर्षाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली ! त्यानंतर स्मिथनंही स्पष्ट केलं की, आमची कृती म्हणजे ‘ब्लॅक पॉवर’ला नव्हे, तर ‘मानवी हक्कां’ना सॅल्यूट होता!.
पॅरालिम्पिकची सुरुवात!
दुस:या महायुद्धानंतरचा काळ. युद्धभूमीवरील आगीचे लोळ आता तसे शांत झाले असले तरी त्याची धग सोसलेल्यांच्या वेदना अजूनही कमी झालेल्या नव्हत्या. सर लुडविंग गटमन हे न्युरॉलॉजिस्ट युद्धकाळात मणक्यांची दुखापत झालेल्यांवर इंग्लंडमध्ये उपचार करीत होते. त्यांच्यावरच्या उपचारांचा आणि त्यांचं मनोबल वाढवण्याचा एक भाग म्हणून त्यांच्या अॅथलेटिक स्पर्धा ते भरवत होते. त्यांचं पाहून इतर युनिट्सनंही अशा स्पर्धा भरवायला सुरुवात केली. याचा फारच सकारात्मक शारीरिक आणि मानसिक परिणाम रुग्णांवर दिसून आला.
1948मध्ये गटमन यांनी इंग्लंडमधील ज्या नागरिकांनी दुस:या युद्धात भाग घेतला असेल किंवा जे नागरिक त्यात जखमी झाले असतील, त्यांच्यासाठीही अॅथलेटिक स्पर्धा भरवायला सुरुवात केली. अर्थात फक्त मणक्यांची दुखापत झालेल्यांसाठीच या स्पर्धा होत्या. अशाच प्रकारच्या स्पर्धा 1952मध्येही झाल्या. ‘अपंगांसाठीच्या’ अशा प्रकारच्या या पहिल्याच स्पर्धा होत्या. त्यात 13क् आंतरराष्ट्रीय अपंग खेळाडू सहभागी झाले होते. 196क्च्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्यानंतर काहीच दिवसांत त्याच ठिकाणी अपंगांच्या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत तब्बल 23 देशांच्या चारशे पॅरा अॅथलिट्सनी भाग घेतला होता. अर्थातच या स्पर्धा व्हीलचेअरवरील खेळाडूंच्या आणि फक्त मणक्यांची दुखापत झालेल्यांसाठी होत्या. याच स्पर्धेपासून ख:या अर्थानं पॅरालिम्पिक सुरू झालं आणि त्यानंतर जगभरातले अपंग खेळाडू आपल्यातलं कौशल्य अजमावू लागले!
महिलांसाठीही खुलं झालं ऑलिम्पिक!
ऑलिम्पिक स्पर्धाना सुरुवात तर झाली; पण सुरुवातीला केवळ पुरुष स्पर्धकांनाच यात भाग घेण्याची परवानगी होती. त्यानंतर काही काळानं टेनिस, नौकानयन, अश्वारोहन, गोल्फ यांसारख्या काही खेळांत ऑलिम्पिकमध्ये महिलांना भाग घेता येऊ लागला. 19क्क्च्या पॅरीस ऑलिम्पिकमध्ये महिलांनी पहिल्यांदा भाग घेतला. त्यात 997 अॅथलिट्समध्ये केवळ 22 महिला होत्या ! 2क्12च्या लंडन ऑलिम्पिकपासून मात्र महिलांना सर्वच खेळांत सहभागी होण्याची परवानगी मिळाली. दुस:या कुठल्या खेळाचा जर ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला, तर त्यासाठीही महिला सहभागाचा मार्ग मोकळा झाला. स्री-पुरुष समानतेचं आणि त्यांच्या हक्कांचं बीज ख:या अर्थानं मग रोवलं गेलं.
वर्णभेदामुळे ऑलिम्पिकवर बहिष्कार!
वर्णभेदाचा पुरस्कार केल्याच्या कारणावरून दक्षिण आफ्रिका हा देश ब:याचदा चर्चेत आला. ऑलिम्पिकवरही त्याचं प्रतिबिंब पडलं. 1975च्या सुमारास न्यूझीलंडनं आपल्या देशाचा रग्बी संघ ‘वर्णभेदी’ दक्षिण आफ्रिकेच्या दौ:यावर पाठवला होता. अनेक देशांनी त्याचा निषेध केला होता, तरीही 1976च्या मॉँट्रियल ऑलिम्पिकमध्ये न्यूझीलंडला प्रवेश देण्यात आला. याच कारणावरून या ऑलिम्पिकवर जवळपास 29 आफ्रिकन देशांनी बहिष्कार टाकला होता. आपल्या या कृतीचं समर्थन करताना केनियाचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री जेम्स ओसोगो यांनी निवेदन दिलं होतं, केनियन सरकार आमच्या नागरिकांच्या मते कोणत्याही पदकापेक्षा मूल्यांची किंमत अधिक आहे. त्यामुळे आम्ही या ऑलिम्पिकवर बहिष्कार घालत आहोत. त्यानंतर अमेरिकेच्या अॅथलिट्सनीही रशियानं अफगाणिस्तानात केलेल्या घुसखोरीच्या निषेधार्थ 198क्च्या ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला होता.