-नितांत महाजन‘चलो इकबार फिर से अजनबी बन जाए हम दोनो.’ असं या काळात अनेकांना वाटलं असेल का? तसा डेटा तर काही उपलब्ध नाही. आकडेवारी हाताशी नाही.मात्र तरुण मित्र-मैत्रिणींशी, जे कोरोनापूर्व काळात प्रेमात पडलेत त्यांच्याशी बोलताना अनेकदा जाणवतं की ते कनेक्टेड तर आहेत, म्हटलं तर सोबत आहेत, म्हटलं तर त्यांचा मोबाइल हा त्यांच्यातला लाइव्ह दुवा आहे.आणि म्हटलं तर तोच मोठा व्हिलन आहे. असं अनेकांना वाटतं की, हल्ली बोलताना सतत भांडणंच होत आहेत. आपण काय बोलतोय, भलता काय बोलतोय. आपला मूड काय, तिचा मूड काय?आपल्याला कुणाच्या घरात पावसाचं पाणी शिरलं हे पाहून उदास वाटतं, तिला पागोळ्या पाहून रोमॅँटिक. आणि वाटणं चूक नाही; पण ते सारं वाटत असताना आपण ज्याच्या/जिच्या प्रेमात आहोत त्याला/तिलाही तसंच वाटलं पाहिजे हा हट्ट.आणि तो त्या मोबाइलवर सुरू होतं.आणि मग शेवटी एक भरतवाक्य येतंच, की तुला काही माङया भावनांची कदरच नाही.मुळात कदर करणार कशी, काही किलोमीटर लांब, काळवेळमूडमौसम सगळंच वेगळं असताना चला, व्हा रोमॅँटिक असं कसं होईल, त्यापेक्षा हा मोबाइलच नसता तर बरं, असंही काही दोस्तांना वाटतं.मग ते सतत लास्ट सीन, ते स्टेटस, ते टोमणो, ते इमोशलन ब्लॅकमेलिंग असं काहीच झालं नसतं.कोरोनाकाळातल्या या लव्हस्टोरीत एकदम व्हिलनची एंट्री का व्हावी? आणि तोही बिचारा मोबाइल? पण मोबाइल व्हिलन कसा? त्यानंच तर ते प्रेम फुलवलं, जगवलं, वाढवलं, मग त्याला का दोष द्यायचा?पण तरी काही मित्र-मैत्रिणींच्या लव्हस्टो:या, त्यातली भांडणं, त्यांना होत असलेला मनस्ताप, गळ्यात साखळी बांधल्यासारखा बांधलेला कनेक्टिव्हिटीचा पट्टा.यात काही गोष्टी दिसतात. तो गुंता कसा सोडवायचा, हा अर्थात ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे, नाहीतर गुंता होऊ न देणंच उत्तम.