कोरोना काळात सैरभैर झालोय, पण बोलू कुणाशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 06:45 IST2020-04-16T06:45:00+5:302020-04-16T06:45:02+5:30

मनोबल हेल्पलाइनला राज्यभरातून येणारे तरुणांचे फोन काय सांगतात !

coronavirus : manobal mental health helpline shares experinces from youth | कोरोना काळात सैरभैर झालोय, पण बोलू कुणाशी?

कोरोना काळात सैरभैर झालोय, पण बोलू कुणाशी?

ठळक मुद्देताप आलाय, कोरोना तर नसेल? एक्झामपण पुढे गेली, आता पुढं काय? धंदा बसणार माझा, करायचं काय?

रेशमा कचरे

मनोबल या हेल्पलाइनविषयी तुम्ही गेल्या आठवडय़ात ‘ऑक्सिजन’मध्ये वाचलं.
‘परिवर्तन’ संस्था, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अन्य काही समविचारी लोकांनी एकत्न येऊन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हमीद दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मनोबल’ नावाची हेल्पलाइन सुरू केलेली आहे.
कोरोना कोंडीच्या काळात आपलं मन मोकळं करायला लोकांना विशेषत: तरुणांना जागा हवी, समुपदेशक म्हणून काम करत असतील किंवा करायचं असेल तर त्यांना ऑनलाइन प्रशिक्षण मिळावं म्हणून ही हेल्पलाइन काम करते.
समुपदेशकांचे मोबाइल क्रमांक त्यासाठी जाहीर करण्यात आले. याकाळात किमान भावनिक प्रथोमोपचार मिळावा म्हणून ही हेल्पलाइन काम करूलागली.
राज्यभरातून आमच्याकडे रोज फोन येतात. अनेकांच्या बोलण्यात काळजी आहे. त्यांना मन मोकळं करायचं आहे.
साधारण काय दिसतं या बोलण्यात?
त्यातले हे काही सर्वसाधारण प्रश्न. जे कॉमनली विचारले जातात. 


1.  अनेकजण सांगतात की, आम्हाला कुणाशी असं मनातलं बोलायची सवयच नाही. आता बोलू वाटतं तर बोलावं, आपल्याला समजून घेईल असं कुणी दिसत नाही. पहिल्यांदाच अशा कोणत्या हेल्पलाइनला फोन करतो आहे. फार उदास झालोय. मला कुणाशी बोलायची सवय नाही. पण आता काहीच पर्याय नाही. या कोरोनामुळे खूप अवघड झालंय . एकतर काय करावं या लॉकडाउनमध्ये ते कळत नाही.  फार रिकामपण आलंय. पण आता डोक्याला भलताच ताप झालाय. माझी गर्लफ्रेण्ड मुंबईत असते. मी इकडे सोलापुरात. तिकडे तिला ताप आलाय. मला काहीच कळत नाहीय मी काय करू?  मला खूप खूप काळजी वाटतेय. मी तिच्यासोबत नसण्यातून मला गिल्ट यायला लागलाय. तिला कोरोना तर झालेला नसेल?
आणि झाला असेल तर मी काय करू शकतो? 
2. हे फोन साधारण एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षा देणा:या मुलींचे. आपल्या भवितव्याची त्यांना काळजी वाटते आहे.  अनेकजणी सांगतात, एमपीएससीची परीक्षा पुढं गेली. तरी एक बरं झालं बरोबर वेळेत पुण्यावरून गावी तरी आलो.  पण इथं घरी काही अभ्यास होत नाही. पुण्यात अभ्यासिका लावलेली, क्लास होते. एक रूटीन फिक्स होतं. अभ्यासिकेत सगळे अभ्यास करतेत, हे बघून माझापण अभ्यास व्हायचा. आता काय करायचं, काही कळेना. रडू येतंय. त्यात इथं आले की घरचे लग्नाचा विषय काढतात. मला नाही करायचं लग्न. किती वेळा सांगितलं. कोरोनामुळे तेपण  आता बारगळलंय ते बरं आहे. पण अभ्यास झाला असता तर किमान एमपीएससीची परीक्षा पास व्हायची गॅरंटी तरी वाढली असती. आता नुसती घरची बडबड. इथं हातात पुस्तक घेतलं की, पुस्तकातले शब्दच दिसेनासे होतात. दिवस खायला उठलाय असं वाटतंय. आता काय करायचं, माझा अभ्यासात काही फोकसच नाही माझा, आता पुढं काय होणार? मी काय करू?

3. हे तिसरे फोन म्हणजे व्यवसाय नुकताच सुरूकेला असे तरुण. काहीजण संतापानं नुसते उडत असतात. ‘वो कापड का दुकान निकाला था अभीच. और अभीच लॉकडाउन होने को मंगताय क्या? अब कैसा जाये आगे ! मुङो तो कुछ सुधर नही रहा. क्या करे अभी इस पुरे दिन क्या ? मुङो लगा था अभी दुकान खोलने के बाद सब ठीक हो जायेगा. घर का भी सब देख पाऊंगा. लेकीन कुछ अच्छा होही नही सकता मेरे लाइफ में. ये कोरोना को भी अभी आनेका था! जैसे मेरे दुकान खोलने के ही इंतजार कर था! दो दिन भी नही हुए थे. क्या करे सर इस सिच्युएशन का? अब कुछ है नही करने को! लगता है ऐसेच मर जाऊंगा. कुछ फ्युचर नही दिख रहा. 
 
***
साधारण या तीन कॅटेगरीसह प्रेम प्रकरण, घरच्यांशी न पटणं, यासारख्या नेहमीच्या गोष्टी आहेतच. मात्र या तीन गोष्टी ठळक आहेत.
आपल्याला किंवा आपल्या जिवलगांना काही आजार झाला असेल, तर कोरोना असेल का?
आपण आपल्या नोकरी-व्यवसायाचं काय? आत्ताच्या रिकामपणानंतर पुढे काय?
आम्ही त्यांना रेडिमेड उत्तरं देऊ शकत नाही, मात्र त्यांचं ऐकून घेतो. ते ऐकून घेणंही याकाळात महत्त्वाचं आहे, त्यातून प्रश्न कळतात आणि उत्तरं एकत्र शोधू, तुम्ही एकटे नाही असा आशावाद तरी मनांना देता येतो.
आम्ही हेल्पलाइन म्हणून स्वयंसेवक म्हणून सोबत राहू, सोबत आहोत असं सांगतो, धीर देतो!


( लेखिका मनोबल हेल्पलाइनमध्ये समुपदेशक म्हणून काम करतात.)

                                       

Web Title: coronavirus : manobal mental health helpline shares experinces from youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.