शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

थकल्यासारखं वाटतं? मूड जातो? चिडचिड होते? -मग तुमचा मेंदू रेड झोनमध्ये आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 09:45 IST

काम तसं नेहमीपेक्षा जास्त नाही; पण फटिग येतो? पुस्तक हातात घेतलं तर वाचवत नाही, बातम्या लावल्या तर काय ऐकलं हे आठवत नाही, सिनेमे पाहतानाही मन लागत नाही त्यात. हे सगळं का होतं आहे?

ठळक मुद्देमेंदूचा रेड झोन

- श्रुती पानसे

माणसं कायम पुढच्या योजना आखत असतात.आज - उद्या - एका महिन्यांनी - पुढच्या वर्षी - त्यानंतर, दहा वर्षानी.उत्तरंही देतात अनेकजण मुलाखतीत की, आजपासून दहा वर्षानी स्वत:ला कुठं पहायला आवडेल?मात्र अगदी पुढच्या वळणावर काय होणार आहे, हेही आपल्याला माहीत नसतं. याचाच अनुभव आता जगभरातली माणसं या लॉकडाउनमध्ये घेत आहेत.काही दिवस घरातल्यांना वेळ दिला, प्रदूषण कमी झालं याचं छान वाटणं, नवीन पदार्थ करून बघणं, पत्ते, कॅरम, सापशिडी खेळून, जुने जुने खेळ शोधून काढून लहानपण आठवणं, वाळवणाचे पदार्थ करणं, बाजूला ठेवलेली पुस्तकं वाचली. एकमेकांना व्हॉट्सअॅपवर कोडी घालणं,  फेसबुक, इन्स्टावर वेगवेगळी टाइमपास चॅलेंजेस खेळणं बरेच दिवस मनात होत्यात त्या गोष्टी करू करूम्हणणं.हे सारं आता अनेकांचं कररून झालं.त्यात पुन्हा लॉकडाउन वाढला. यानंतरही तो वाढेल का, सगळं सुरळीत कधी होईल हे आता कुणीच सांगू शकत नाही,किती काळ की अनिश्चित काळार्पयत आपण असेच- घरात राहणार हे माहिती नाही.पण हे सारं स्वीकारायला आपल्या मेंदूतली न्यूरोप्लास्टीसिटी कामी आली. म्हणजे काय तर नवीन रूटीनलाही माणसं ठीक म्हणू लागली. पहिले त्रगा करून झाला; पण हळूहळू त्रस होईनासा झाला. काही नवे शोध व्हॉट्सअॅपवर लागले. जसं, जगात र्अजट असं काही नसतं. अन्न, वस्र, निवारा हेच कसं महत्त्वाचं आहे, बाकी - सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. शिक्षणसुद्धा ‘अत्यावश्यक’मध्ये येत नाही. जी जी दुकानं चालू आहेत, तेवढीच फक्त जगायला अत्यावश्यक आहेत. बाकी काहीच नाही.हे सगळं मान्य असो नसो, हळूहळू आपण स्वीकारायला सुरुवात केलीच.दुसरीकडे आपापल्या घराकडे पायी जाणारे मजूर, त्यांच्या बायका, कडेवरची- खांद्यावरची उन्हं ङोलत जाणारी मुलं पाहून अस्वस्थही झालो. त्यांच्यासाठी काही करता येत नाही, आपण घरातच अडकून पडलो म्हणून काहीजणांची चिडचिडही झाली असेल. जेवायला बसलो की हे सारं आठवून  त्यांच्यासाठी घास अडला. अश्रू आले. जमेल तशी मदत सीएम फंडात/पीएम फंडात अनेकांनी दिली.पण तरीही एक नक्की की, जे लोक चालत निघालेत त्यांचे कष्ट ते त्यांचे कष्ट याची स्पष्ट जाणीव अनेकांच्या मनाला झाली. आपण कोणाच्याही मदतीलासुद्धा जाऊ शकत नाही. घरात बसणं हीच मदत - स्वत:ला, घरच्यांना, नातेवाइकांना, शेजा:यांना, पोलिसांना, डॉक्टरांना, दुकानदारांना, सरकारला. हीच मदत ! हेच महत्त्वाचं हे पुन्हा पुन्हा सांगावं लागलं स्वत:ला !वर्क फ्रॉम होम करणारे घरात असून, ऑफिसमध्ये. 9.30 ला लॉग इन. निदान नोकरी चालू आहे, नियमित पैसे मिळतील याचं समाधान. अधला मधला मध्यम वर्ग- कनिष्ठ मध्यम वर्ग. नोकरीची शाश्वती नाही. व्यवसायात किती पैसे मिळणार? मिळणार की नाही, माहीत नाही.पुढे काय? अनेकांनी घरं घेतले, त्याचे इएमआय. आणि आपलं काय होणार याचं एक टेन्शन.हे सारं असं असूनही काम करणं, आताही घरातली कामं, मन रमवणं, स्वत:ला सकारात्मक ठेवणं चालूच आहे. पण मन मात्र निराश होण्याच्या मोडवर जाऊ लागलं आहे, कितीही सकारात्मक विचार करा, नकारात्मक विचारांची साखळी जोरात सुरू होते.असा अनुभव अनेकांना येऊ लागला आहे.पुन्हा पुन्हा नकारात्मक विचारांच्या रेड झोनकडे जातं मन. त्याचं काय करायचं हे कळत नाही.दुसरीकडे खूप जणांना थकवा जाणवतोय. काही केलं आणि नाही केलं तरी खूप थकवा जाणवतोय. अगदी अंगदुखीर्पयत.खरं तर आपलं रस्त्यावरच्या प्रचंड वाहतुकीतून जाणं -येणं कमी झालंय. बाहेरची कामं बंद झाली आहेत. प्रदूषण आपल्या अंगावर येत नाहीये. फक्त घरची कामं चालू आहेत. तरीही थकवा का? ज्यांना शारीरिक कष्ट फारसे नाहीत तरीही त्यांना थकवा का जाणवतो आहे?

आपण इतके का थकतोय?हा थकवा मानसिक आहे. मनात येणारे असंख्य विचार- त्यातही नकारात्मक विचारांची संख्या जास्त. नकारात्मक विचार कॉर्टिसोलची निर्मिती करतं. परिणाम थकवा, अंगदुखी.पुस्तक हातात धरलं आहे; पण त्यात काय लिहिलंय हे मेंदूर्पयत जातच नाही थोडय़ा वेळाने. अवघ्या काही मिनिटात पुस्तक बंद करून टीव्हीवरच्या बातम्या लावल्या जातात. पुस्तक वाचायला घेतलंय. पण मन भरकटतंय. कारण मनाला एकाग्र करणं त्याला ङोपत नाहीये. अनिश्चिततेच्या वातावरणात मन एकाग्र होणं अवघड आहे.  काही मिनिटं बातम्या बघितल्या तरी तेच तेच शब्द फिरून फिरून कानावर पडताहेत असं वाटतं. नक्की काय सांगताहेत, याच्या पलीकडे मन जातं. ते केव्हा भरकटलं तेही लक्षात येत नाही. दिवसातून एक-दोन वेळा टीव्हीवरच्या बातम्या बघणं ही वेगळी गोष्ट आहे. पण सात-आठ वेळा त्याच त्या बातम्या बघू शकत नाही. कारण आकडय़ांची संख्या बदलते, प्रदेशांची नावं बदलतात. बाकी सगळं तेच. नावीन्य नाही तिथे मेंदू फार काळ लक्ष देऊ शकत नाही.  या शिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्या नजरेसमोर तीच ती दृश्य पुन्हा पुन्हा दिसायला लागली तर मेंदूला अतोनात कंटाळा येतो. म्हणून ही दृश्यं म्हणजे स्कीमाज बदलते हवेत. पण सध्या ते शक्यच नाही. घरातल्या त्याच त्या भिंती, माणसांचे तेच ते चेहरे आणि टीव्हीचंही तेच. यामुळे  नावीन्य मिळत नाही. 

त्यात वाढलेला स्क्र ीन टाइमस्क्र ीन टाइम अतोनात वाढला आहे. आपल्या मेंदूला नवे अनुभव हवे असतात, असं म्हटलं तरी त्यालाही काही प्रमाण आहे. दर मिनिटा-दोन मिनिटाला विविध विषयावरच्या पंचवीस-तीस पोस्ट्स वाचल्या तर तासाभराने थकवा येणारच आहे. कारण मेंदूवर किती आणि काय काय आदळणार? एक तासभर सोशल मीडियावर घालवणा:या व्यक्तीला असं विचारलं की काय काय बघितलंस? काय वाचलंस? काय आठवतंय? फारसं काहीच हाताला लागणार नाही. कारण मेंदूने ते सर्व फार वरवर पाहिलं आहे. डोळ्यांनी मेंदूर्पयत सर्व गोष्टी पोहोचवल्या; पण तारतम्याने मेंदूने त्या स्वीकारल्याच नाहीत. आपल्या मेमरीवरचा कचरा वाढवलेलाच नाही. कारण त्याला ते महत्त्वाचं वाटलेलं नाही. पण यामुळे त्याच्यावर खूप काम पडलं आहे. मेंदूला काम पडलं, परिणाम थकवा.  असं सगळं होतंय का तुमचं?घाबरूनका. सगळ्यांचंच होतं आहे. अनेकांच्या वाटय़ाला आता लॉकडाउनमध्ये हा अनुभव येतोय. अगदी निरोगी मनातही कधीतरी अशा सगळ्या गोष्टी व्हायच्याच. आपल्या सर्वाना माहिती आहे की, जे जे मनात चाललेलं आहे त्या सर्वच्या सर्व विचारांचे परिणाम शरीरावर होत असतात. मन आणि शरीर याचं फार जवळचं नातं आहे. त्यामुळे आपलं मन आणि मेंदू आपल्याला रेड झोनमध्ये नेत आहेत कारण आपण त्यांना तसं करायला भाग पाडतो आहोत. 

ग्रीन झोनमध्ये जाण्यासाठी काय करायचं?

आता हे वास्तव आहे हे मान्य केलं तर असं लक्षात येतं की, अजून काही काळ ही लॉकडाउनची परिस्थिती निश्चित बदलणार नाहीये. मात्र रेड झोनमधला आपला मेंदू ग्रीन झोनमध्ये आणायचं काम मात्र आपण स्वत:च्या भल्यासाठी करायलाच हवं. ते आपलं आपल्यालाच करायला लागणार आहे.ते कसं करायचं?या काही गोष्टी करून पहा.1. रोजच्या कामात थोडा बदल करून मेंदूला नावीन्य मिळतं. त्यामुळे काम बदल करून पहा.2. रोज ऑफिसच्या कामाला बसण्याची जागा बदलून/दिशा बदलून मेंदूला नवीन दृश्य बघायला मिळतात. 3. श्रमविभागणी करून तोच तोपणा घालवता येतो. त्यामुळे कामाचं शेडय़ुल लावा. 4. स्क्र ीन टाइम कमी करून खरे बैठे खेळ खेळता येतात.5. घरची वाढीव कामं करून दमलं तरी चालेल; पण शारीरिक कष्ट करायलाच हवेत. फक्त मानसिक थकवा नको. शारीरिकही हवा. 6. जमेल/ङोपेल तो व्यायाम करायला हवा. व्यायामामुळे  सेरोटोनिन हे आनंदी वाटण्यासाठी आवश्यक हार्मोन निर्माण होतं. मेंदू आपोआपच ग्रीन झोनमध्ये जातो. 7. योग-प्राणायाम कुठेही करता येतो. घरात कमी जागा असली तरी. मेंदूच्या ग्रीन झोनसाठी हे करायला हवं.8. नवीन पदार्थ करणं, टाकाऊतून नवी कलाकृती तयार करणं, नवे खेळ, कोडी स्वत: तयार करणं, काहीही खेळणं यामुळे मेंदूला चालना मिळते ते नियमित करायला हवं.9. आपला मेंदू नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सिद्ध होतो आहे. त्याला मदत करणं आपलं काम आहे आणि ते सहज शक्यही आहे. 10. त्यामुळे बघा तुमचा मेंदू ऑरेंज झोनमध्ये आहे की रेड? त्याला त्यातून बाहेर काढून ग्रीन झोनच्या आनंदी जगात न्यायचं काम आपल्यालाच करायचं आहे.

(लेखिका मेंदूविषयक अभ्यासक , करिअर कौन्सिलर आहेत.)