coronavirus : lockdown - feeling all alone? down? depressed? -try this | लॉकडाउनमध्ये फार उदास, एकेकटं वाटतं आहे ? चिडचिड होतेय ?- मग 'हे' करा !

लॉकडाउनमध्ये फार उदास, एकेकटं वाटतं आहे ? चिडचिड होतेय ?- मग 'हे' करा !

ठळक मुद्देस्ट्रॅटेजी आणि मॅन्यूप्युलेशन : या दोन गोष्टी नात्यातही कशी जादू करतात?

- आनंद नाडकर्णी  

1. लॉकडाउनमध्ये घरातल्यांशी संवाद साधा असं सगळेच सांगतात; पण ते करावं कसं?

इथं मुळात काय लक्षात घ्यावं लागेल, की तुमचा घरातल्या लोकांबरोबर आत्तार्पयत जे आणि जसं नातं होतं, पूर्वी जो संवाद होता, त्याचा या काळातल्या संवादावर खूप प्रभाव पडणार आहे. 
समजा, आधीच सामंजस्य कमी होतं, तर नात्यातले ताण या काळात अजूनच वाढतील. पूर्वी सामंजस्य उत्तम होतं, तर ते या काळात अजून चांगलं होईल. मुळात आपल्या जवळच्या नात्यांबद्दल मला नेमकं काय वाटतं याबद्दल माझी भूमिका आपल्या मनातच स्पष्ट नसेल तर मी संवाद कसा साधणार?
या लॉकडाउन काळाच्या निमित्तानं आपण नात्यांबद्दलचा एक सोप्पा आणि गमतीदार प्रयोग करून बघू शकतो. प्रयोगाचं नाव आहे ‘माझी ग्रहमाला’. यात काय करायचं? तर कागदाच्या पानावर किंवा अगदी मनामध्ये एक रेखाटन करायचं. त्यात स्वत: म्हणजे सूर्य. सूर्याला नाव द्यायचं मी. सूर्याच्या आसपास वेगवेगळ्या कक्षेत ग्रह फिरतात ना? त्या सहा-सात कक्षांची वर्तुळं काढायची. मग विचार करायचा, की मला एकदम पहिल्या कक्षेत कुणाला ठेवायला आवडेल? पहिल्या कक्षेतले ग्रह माङयासाठी कोण आहेत?
बघा विचार करा, त्या कक्षेत कुटुंबातल्या काही सदस्यांपैकी कुणी येईल, मित्न-मैत्रिणींपैकी कुणी येईल. अशा सगळ्या कक्षांमध्ये आपण कुणाकुणाला ठेवू ते कळेल.  हा किती जवळचा, हा किती लांबचा, असं सगळं लक्षात येईल. हा प्रयोग म्हणजे काय आहे तर आपल्यापासून आपल्याच म्हणवणा:या माणसांचं भावनिक अंतर किती आहे, ते मोजतोय. या भावनिक अंतराची कल्पना आपल्याला असली पाहिजे.
म्हणजे आपली एखादी मैत्नीण सध्या पाचव्या कक्षेत आहे; पण वाटतंय, की ती पहिल्या कक्षेत आली तर खूप छान होईल. मला तिच्या माङयातलं भावनिक अंतर कमी करायचंय.  असाच सा:या माणसांविषयी विचार करून पहायचा. समजा आपले वडील आहेत. त्यांना एरव्ही पहिल्या कक्षेत ठेवलं; पण त्यांच्याशी भयंकर भांडण झालं की वाटतं त्यांना एकदम सहाव्या कक्षेत टाकावं.
पण म्हणजे कायम आता सहाव्या कक्षेत राहातील का?
म्हणजे आपल्याला बघावं लागेल की काही नात्यांची कक्षा स्थिर राहावी लागेल. ठेवावी लागेल. हे वाटणं हेच आपलं भान जागं करणारी गोष्ट आहे. नात्यांमधलं भावनिक अंतर काही वेळेला वाढतं तर कधी कमीही होतं. काही नात्यांमध्ये ते स्थिर राहातं. 
आता दुसरा मुद्दा. कोण कुठल्या कक्षेत आहे यानुसार माझी त्या व्यक्तीशी संवादाची शैली ठरणार. असं वाटतं त्यांच्यातही करावी लागेल. त्यानुसार संवादाची शैली ठरणार. स्थिर भावनिक कक्षेत जी माणसं आहेत, त्यांच्याशी काय बोलणार, कसं बोलणार हे ठरवणार. हा प्रयोग नियमित करून पहायला हवा. पण ते करताना एक प्रश्न पडणारच, की आपण एखाद्या नात्यात जेवढी भावनिक गुंतवणूक जास्त करतो ना, तेवढा परतावाही (रिटर्न) आपल्याला हवा असतो. तो परतावा जर मिळाला नाही तर की लगेच आपल्या संवादाची शैली बदलून जाते. 
मात्र ज्या माणसांशी आपलं पहिल्या कक्षेतलं नातं असेल तिथं भावनिक गुंतवणूक करताना परताव्याचा नियमच लावायचा नाही. कदाचित पाचव्या किंवा सहाव्या कक्षेतल्या व्यक्तीसाठी  परताव्याचा नियम लावता येईल; पण आपला घोटाळा कुठे होतो, तर अपेक्षा ठेवण्याची नाती कुठली, कोणत्या नात्यांमध्ये निरपेक्षता असावी हेच आपल्याला कळत नाही. आणि म्हणून आपल्याला वाटतं की, बोलावं-मनातलं सांगावं अशी माणसं आवतीभोवती नाहीत. 

 2. पण मग काय केलं तर घरातल्या माणसांशी बोलता येईल, त्यांना बोलतं करता येईल?

आम्ही मानसशास्नत दोन शब्द वापरतो. स्ट्रॅटेजी आणि मॅनिप्युलेशन. स्ट्रॅटेजी म्हणजे पवित्ना. स्ट्रॅटेजी वापरणारा माणूस नात्यात चतुर, चाणाक्ष असतो. मॅनिप्युलेशन म्हणजे लबाडी, धूर्तपणा. आपण सगळे जगताना या दोन्ही गोष्टी वापरतो. लोकही आपल्यासोबत या दोन्ही गोष्टी करतात; पण यात फरक काय?
संवादात जेव्हा मनातला हेतू त्या नात्याला पोषक असतो तेव्हा ती स्ट्रॅटेजी. मनातला हेतू शुद्ध नाही, मला त्या नात्याला एक्सप्लॉइट करायचंय, तेव्हा आपण जे वापरतो ते म्हणजे मॅनिपुलेशन.
म्हणजे जवळचा कुणी मित्न कठीण परिस्थितीतून जातो आहे. मित्नाचा प्रेमभंग झालाय. मला त्या मित्नाची काळजीही वाटतेय. त्याला मी त्याच्या प्रेमभंगाचे कुठले संदर्भ न देता त्याला आश्वस्त करणारा, धीर देणारा संवाद करतो ती स्ट्रॅटेजी. हा संवाद नात्याला पोषक आहे. हे करताना मी चतुर असतो, लबाड नाही; पण माझा दुसरा एक मित्न या मित्नाला मुद्दाम टोचून-टोचून दुख:या गोष्टी आठवून देतो. ते झालं मॅनिपुलेशन.
चतुर बना. लबाड नका बनू. आपण संवाद करताना हे चातुर्य आहे की लबाडी हे स्वत:ला विचारत राहा. 

 3. मनात ज्यांच्याविषयी राग आहे, ती माणसंही घरात दिसतात, लॉकडाउनमध्ये तर चिडचिड होते, असं अनेक जण सांगतात. त्यांनी काय करायचं?


असं होऊ शकतं खरं. आता यांच्यात दोन भाग आहेत. ज्याचा राग येतो, तो माणूस जर भावनिक अंतरावर जवळच्या कक्षेत आहे तर त्याच्या वागण्या-बोलण्याचा आपल्या मनावर किती परिणाम करून घेणार हा आपला चॉइस आहे. समजा, पहिल्या कक्षेतल्या माणसानं जर आपल्यावर शाब्दिक हल्ला केला तर त्याचा मला जास्त त्नास होणं साहजिक आहे. पण सहाव्या कक्षेतल्याने नकोसं वागल्यावरही त्याचा त्नास पहिल्या कक्षेतल्या माणसाइतकाच होणार असेल तर लक्षात घ्यावं, की या कक्षाच निर्थक ठरत आहेत. आपल्या त्नाग्यावर आपल्यालाच काम केलं पाहिजे. आपण कक्षेवरून ठरवायचंय, की कुणामुळे किती त्नास करून घ्यायचा.
आता यातल्या थोडय़ा अवघड भागाकडे येऊ, समजा जवळच्याच माणसाने मला उदास केलंय, तर मी काय करायला पाहिजे? इथे एका पारडय़ात त्या व्यक्तीचं वर्तन ठेवायचं, दुस:यात  तिनं आपल्याला दिलेलं कॉन्ट्रिब्युशन, केलेली मदत ठेवायची. ब:याच माणसांसाठी आपण हा मीटर लावला; तर लगेच नाही, पण थोडय़ा वेळात आपल्याला लक्षात येतं, की अरे, या माणसानं खूप दिलंय आपल्याला. आईवडिलांचा राग येत असेल तर त्यांना हा मीटर लावून बघूया.


 4. माफ करून टाका, मनात राग ठेवू नका, कुणाचं काही पटत नसेल तर ते सांगून टाका,  नवीन सुरु वात करा, असं सगळे सांगतात; पण म्हणजे करायचं काय?


मी नेहमी सांगतो, नात्यात एटीएम वापरा, अकाउंट नको. नातं रिफ्रेश करण्यासाठी काय लागतं? मागचं अकाउंट बंद करावं लागतं. एटीएमवर ट्रान्ङॉक्शन असतं. एकदा केलं की संपलं. अकाउंटमध्ये एंट्रीज असतात. एंट्रीज म्हणजे पूर्वग्रह. जेव्हा पूर्वग्रह जास्त असतात तेव्हा अकाउंट निर्माण होतं. माङो कुठले पूर्वग्रह मला नातं पुन्हा जोडून घ्यायला त्नास देताहेत, अडथळा निर्माण करताहेत हे मी बघावं. हे समजून घेतलं तर नातं एटीएमसारखं वापरता येईल. इथेही भावनिक कक्षा येतेच. नातं जर पहिल्या कक्षेत असेल तर मी स्वत:वर काम करेन. नातं सहाव्या कक्षेत असेल तर मी फारसा विचार करणार नाही. कक्षा कळली तर भावनिक ऊर्जा कशी कुठे लावायची हा शहाणपणा येतो. सगळ्या नात्यांवर सारखीच भावनिक ऊर्जा लावणो उपयोगाचे नाही.  हीच तर भाविनक बुद्धिमत्ता आहे!

5. ऐकून घेईल, मला समजून घेईल असं आवतीभोवती कुणी नाही, कुणी बोलायला नाही असं वाटतं, मी काय करू?

इथं आपण हे डोक्यात ठेवलं पाहिजे, की माझं ओळखीचं कोण, मित्न कोण, गाढ मित्न कोण हे ओळखता आलं पाहिजे. दुसरा मुद्दा हा, की हरेकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. काही लोक अंतर्मुख वृत्तीचे असतात. ते एकटे असतात; पण एकाकी नसतात. ते स्वत: स्वत:शी खूप चांगलं राहू शकतात. बहिर्मुख माणसाला सोशलायजेशन महत्त्वाचं वाटतं. मग तो एकटा पडला की त्या एकटेपणाचं रूपांतर तो एकाकीपणात करतो. या दोन्ही उदाहरणांमधून लक्षात येईल की एकटेपणा हा परिस्थितीत आहे. पण एकाकीपणा हा मनात आहे. मी एकटा आहे का एकाकी, ते आपण ओळखायला शिकावं.
आपल्याला हेसुद्धा ठरवलं पाहिजे, की मी जो जगाशी संवाद करतोय तो टाइमपाससाठी किती, भावनिक शेअरिंगसाठी किती आणि वैचारिक विकासासाठी किती हे पाहावं. अर्थात, या तिन्ही माणसाच्या गरजा आहेतच. मात्न त्याचं प्रपोर्शन प्रत्येकानं ठरवावं.


मुलाखत आणि शब्दांकन- ऑक्सिजन टीम

Web Title: coronavirus : lockdown - feeling all alone? down? depressed? -try this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.