coronavirus : कोरोनानंतर जग बदललेलं असेल, आपल्या पोटापाण्याचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 07:00 IST2020-04-23T06:55:05+5:302020-04-23T07:00:17+5:30

जागतिक कामगार संघटना म्हणते आहे की, कोरोनामुळे जगात अडीच कोटी नोक:या जातील. एक ते साडेतीन कोटी, लोक वर्किग पॉवर्टीमध्ये जातील. म्हणजे नोकरी असून पुरेशी आमदनी नसेल. असं म्हणतात, 2008 ची आर्थिक मंदी काहीच नाही त्याहून मोठी महामंदी येण्याची शक्यता आहे. विचार करा, पुढं काय होईल?

coronavirus: jobs-destroyed-coronavirus-sparks-recession-what about our skills ? | coronavirus : कोरोनानंतर जग बदललेलं असेल, आपल्या पोटापाण्याचं काय?

coronavirus : कोरोनानंतर जग बदललेलं असेल, आपल्या पोटापाण्याचं काय?

ठळक मुद्देजग बदललेलं असेल; पण तुमचे स्किल बदलणार आहेत का? - लेखांक -1

डॉ. भूषण केळकर

गेलं वर्षभर आपण ‘इंडस्ट्री 4.0’च्या लेखमालेच्या निमित्तानं भेटलो होतो. 
इंडस्ट्री 4.क् जशी जागतिक होती, तशाच जागतिक पातळीवरचा अजून एक बदल म्हणजे हा ‘कोरोना’. 
आपण नव्या काळात कुठल्या स्किलवर काम करायचं या विषयावर आपण त्या लेखमालेत बोललो होतोच.
आता या कोरोनानंतर जग बदलून जाईल अशी आताच चर्चा आहे.
तर कसं असेल ते जग?
आता हेच पाहा ना, हा लेख तुम्ही वाचा, मोठा असला तरी वाचा, तुम्हाला वाचन करायला वेळ आहे का, असा प्रश्न मी विचारणार नाही.
कारण तसा प्रश्न विचारणं भाबडेपणाचं ठरेल. कारण हा लेख वाचायला तुम्ही मोकळे असाल, तुमच्याकडे आता रिकामा वेळ आहे, जो पूर्वी नसेल तो वेळही आता आहे हे उघड आहे.
कारण लॉकडाउनमुळे तुम्हाला वेळच वेळ असणार आहे! 
कवी संदीप खरेंच्या भाषेत म्हणजे कवितेत म्हंटलंय तसं, आता ‘कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो’.
या काव्यपक्तींची पुरेपूर ओळख करून देणारा हा काळ!
आपण हे ऐकत-वाचत असतो की, एप्रिलचा दुसरा-तिसरा आठवडा हा भारतासाठी या कोरोनाचा ‘पीक’ म्हणजे शिखर गाठण्याचा काळ असेल. हे ऐकताना माङया मनात प्रश्न येत राहिला की हे शिखर असेल तर स्विस आल्प्समधलं ‘मास्टरहॉर्न’ सारखं टोकदार की दक्षिण अफ्रिकेतील केपटाउनमधलं ‘टेबल माउण्टन’च्या पठारासारखं असेल?
म्हणजेच हे शिखर गाठल्यानंतर कोरोनाचा प्रभाव माटरहॉर्नप्रमाणो झपाटय़ाने कमी होईल की टेबल माउण्टनच्या 2 किलोमीटर पठारासारखं टिकून राहील?
जरा विचार करू. त्या विषयीच आपण या लेखात बोलू. या लेखात आणि पुढच्याही.
कोरोनानंतरचं जग/करिअर/नोक:या यांच्यातील बदल व आपत्ती, त्यादृष्टीनं उचलायची पावलं आणि तरुणांनी काय करायचं या विषयी आपण जरा बोलू.
आजच्या संवादात आपण कोरोनानंतर जग-भारत-महाराष्ट्र कसा असेल हे जरा पाहू. आणि ते बदलेल त्याला अनुसरून आपण करायच्या गोष्टी, तंत्रज्ञान-स्किल्स- सृजनात्मक ठोस कृती याबद्दल बोलू.
भारताने आणि जगातील अनेक राष्ट्रांनी कोरोनाशी लढताना ‘लॉकडाउन’ हे शस्त्र म्हणून वापरलं आहे आणि ते आवश्यकच आहे-होतं, यात शंकाच नाही. आपले  पंतप्रधान मोदींनी सांगितलं आहे 3 मेर्पयतचे 4क् दिवसांचे लॉकडाउन प्रभावी ठरले आहे असे दिसते. अमेरिकेत भारताच्या चौपट लोकसंख्या असून, अद्ययावत तंत्रज्ञान असून, त्या देशातील बळींच्या संख्येच्या केवळ निम्मे लोकांना भारतात संसर्ग झालाय! बीसीजी  लस, मुळातील अधिक रोगप्रतिकारकशक्ती, तापमान किंवा मुळातच कमी होस्टिंग इ. काही कारणं असूनही भारतात वेळीच योग्य पावले उचलली गेली हे तर जगाने मान्य केलंय!
आता आपली तयारी कोरोनानंतर काय? ही असायला हवी.
लॉकडाउनमुळे आणि त्यानंतरही अनेक बदल आपण जगभर पाहणार आहोत, यात जगभरात कुणालाच काही शंका नाही.
1. भारताचं आरोग्यक्षेत्र अजिबात सुस्थितीत नाही. आपल्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या केवळ 9 टक्के खर्च या क्षेत्रवर वर्षानुर्वष होत आलाय. त्यात बदल अपरिहार्य असेल.
2. कोरोनाचे सामाजिक परिणाम जाणवायला लागलेत. ही जी अनिश्चितता वाढते आहे त्याने हतबलता येऊन गृहकलह, स्रियांवरील अत्याचार, मानसिक अस्वास्थ्य इ. गोष्टींमध्ये भारतातच नाही तर जगभर वाढ झाली आहे.
3. त्यातल्या त्यात चांगले बदल म्हणजे क्रूड ऑइलचे भाव प्रचंड घसरल्यामुळे भारताला परकीय गंगाजळीचा फायदा होईल. 
4 .अजून चांगला बदल म्हणजे पर्यावरण चांगलं स्वच्छ होतं आहे, हवा-पाणी निर्मळ होत आहे!!
5. लोकांच्या बोलण्यात सतत सोशल डिस्टन्सिंग हा शब्द येतो आहे. तसंच लाइफ और लाइव्लीहूड. म्हणजेच जीवन की जीवनमान असा उल्लेख होतोय.
6. कोरोनामुळे मरायचं की भूकबळी जाणार अशी चिंता आपल्यासारख्या विकसनशील देशांत जाणवतं आहे.
7. वरवर ही कारणं वेगळी दिसत असली तरी या सगळ्याला आर्थिक आणि सामाजिक पाश्र्वभूमी आहे.
8. जागतिक कामगार संघटना ( आयएलओ) असं म्हणते आहे की, जगात अडीच कोटी नोक:या जातील. एक ते साडेतीन कोटी, लोक वर्किग पॉवर्टीमध्ये जातील. म्हणजे नोकरी असून पुरेशी आमदनी नसेल.
9. असेही बोलले जातेय की 2008 ची आर्थिक मंदी काहीच नाही त्याहून मोठी महामंदी येऊन 1929 मधील ग्रेट डिप्रेशनची स्थिती उद्भवेल.
10. एक निकष म्हणून बघितलं तर 1929 मध्ये बेरोजगारी होती 25 टक्के आणि आता बेरोजगारी आहे 23 ते 30 टक्के झाली आहेच.


11. गो-एअरसारख्या कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. आणि भारतात एक लाख नोक:या लवकरच जातील असं ठामपणो सांगितलं जातंय.
12. आता पोस्ट कोरोनाची स्थिती ही मागणी व पुरवठा दोन्ही प्रचंड कमी होण्याची असल्याने सर्वच राष्ट्रांना वित्तीय तूट आणि भांडवली तूट अशा दोन्ही उपाययोजना कराव्या लागत आहेत.
13. सेवा-वस्तू यातील (जस्ट इन टाइम-जेआयटी) यावर आधारित जागतिक वितरण साखळी ही प्रचंड विस्कळित झाली आहे. 
14.  सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योग जो भारताचा 45 टक्के एवढा आर्थिक कणा आहे त्यात स्टॅगनेशन आणि चलनवाढ होणं अपेक्षित आहे.
15. अनेक क्षेत्रंमध्ये आलेली मरगळ ही खूप काळ टिकेल. पर्यटन, विमानप्रवास, हॉटेल, रिटेल इ. क्षेत्रत मोठय़ा प्रमाणात पण तसेच कारखाने, वाहनउद्योग इ. क्षेत्रतही परिणाम तीव्र असतील. 
16. अहो, साधं बघा की मुंबई 1 दिवस बंद राहणो याचा अर्थ 5क्क् कोटींचा फटका! आता तर मुंबई किमान 4क् दिवस बंद आहे, किमान!!
17. आपण हे पण लक्षात घेऊ की डिजिटल ऑनलाइन या व्यवसायांना ऊजिर्तावस्था येईल. सेवाक्षेत्रबरोबर आता मॅन्युफॅक्चरिंगला भारतात जास्त संधी वाढेल, कारण चीनवरील अवलंबित्व अनेक देश वेगाने कमी करतील. 
18. ऑनलाइन व्यवहार, शिक्षण, सेवा, मानसिक आरोग्य या क्षेत्रत उत्तम संधी असतील. प्रत्येक संकट हे संधी घेऊन येते याचं अजून एक उदाहरण करोना असेल!
19. या संकटाला/बदलाला आपण सामोरं कसं जातो आणि देश व वैयक्तिक पातळीवर संधीत कसं रुपांतरित करतो ते बघणं औत्सुक्याचं आहे. 
20. मित्रंनो, घोडामैदान जवळच आहे! परवा भारताचा तिरंगा माटरहॉर्नवर स्वीत्ङरलडने प्रकाशमान केला. भारताचे कोरोना शिखर हे माटरहॉर्न असावे, टेबल माउण्टन नको हीच आशा!


( लेखक आयटी तज्ज्ञ आणि करिअर कौन्सिलर आहेत.)
 

Web Title: coronavirus: jobs-destroyed-coronavirus-sparks-recession-what about our skills ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.