शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
3
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
4
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
5
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
6
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
7
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
8
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
9
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
10
अंबरनाथची संपूर्ण, तर बदलापूरमध्ये ६ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली
11
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
12
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
13
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
14
Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच असणार 'बिग बॉस मराठी'चा होस्ट, सलमान खान म्हणाला- "भाऊ तुम्ही..."
15
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
16
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
17
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
18
फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!
19
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
20
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हालाही कोरोना फोबिया झाला आहे का ? भीती  वाटतेय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 09:43 IST

कोरोना कोंडीच्या काळात आपल्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं तज्ज्ञांकडून जाणून घेऊन, जगणं अधिक सुकर आणि आनंदी करता येईल का? या काळात काही कृतिशील वर्तन होईल का यासाठीचा हा विशेष संवाद.

ठळक मुद्देजे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया

- डॉ.हमीद दाभोलकर , मनोविकार तज्ज्ञ

 1.कोरोना फोबिया असा काही प्रकार तरुणांमध्ये दिसतोय? म्हणजे मला कोरोना झालाय असं वाटणं. घरातल्यांना होईल का अशी काळजी करणं? त्यावर काय उपाय असू शकतात? 

-  एखादा साथीचा रोग मोठय़ा प्रमाणात पसरतो तेव्हा अशी भीती साहजिक आहे. फोबिया ही जास्त चिंतेतून निर्माण होणारी गोष्ट आहे. ज्या माणसांना मुळातच तब्येतीची जरा जास्तच चिंता करण्याची सवय असते, शरीरात घडणा:या छोटय़ा छोटय़ा गोष्टींकडे खूप लक्ष देण्याचा स्वभाव असतो, अशांमध्ये ही समस्या दिसण्याची शक्यता जास्त असते. पुन्हा यातही दोन प्रकार आहेत. एक म्हणजे अगदी काहीच लक्षण नसताना आपल्याला संसर्ग झालाय असं वाटणं आणि दुस:या प्रकारात आपल्याला झालेला साधा सर्दी-खोकलाही कोरोनाशीच संबंधित आहे असं वाटणं. त्यामुळे मन सैरभैर होऊ शकतं. आम्ही  मनोबल ही जी हेल्पलाइन चालवतो, त्याच्यावर सातारा जिल्ह्यातल्या कोरेगावच्या एका मुलाचा फोन आला. त्याच्याशी झालेल्या संवादानुसार त्याला तीव्र भीती वाटत होती. तो इतका अस्वस्थ झाला होता, की त्याला घरातून निघून जावंसं वाटत होतं. काही औषधं आणि समुपदेशन यातून त्याला बरं वाटू लागलं. त्यामुळे कुणाला भीती वाटत असेल तर त्याची चेष्टा न करता, शांतपणो कुणातरी जाणकाराशी बोलणं गरजेचं आहे. हे अनेकदा आजूबाजूच्या कुटुंब आणि मित्नमंडळींना दिसतं, की या व्यक्तीचा स्वभावच जास्त चिंता करण्याचा आहे. त्यामुळे त्या व्यक्तीने अशावेळी आसपासच्या लोकांचा सल्ला ऐकलेला बरा असतो. त्यातूनही अस्वस्थता कायम असेल तर डॉक्टर आणि समुपदेशकाची मदत घेतली पाहिजे. आपण हेसुद्धा समजून घेतलं पाहिजे, की तरु णांमध्ये जवळजवळ 95 टक्के प्रमाण हे संसर्गातून पूर्ण बरं होऊन बाहेर निघण्याचं आहे. बहुतांश वेळा अर्धवट माहितीमुळे हे सगळं भीतीचं वातावरण उद्भवतं. 

2) सतत सक्तीनं घरी बसून राहण्यातून अनेकांची चिडचिड, घुसमट होतेय. उदास वाटतं आहे, त्यावर कशी मात करता येईल?

- परिस्थिती विपरीत आहे हे खरं असलं तरी आपल्याला मार्ग शोधावेच लागतील. त्यासाठी आज जवळजवळ प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विविध संस्था आणि शासनाच्या हेल्पलाइन्स उपलब्ध आहेत. तरु णांनी कसलाही संकोच न बाळगता अशा हेल्पलाइन्सची मदत घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रसंगांकडे, परिस्थितीकडे आपण काय नजरेने बघतो यावर सगळ्या गोष्टी ठरतात. चिडचिड, राग हे कशामुळे होतं, तर हे माङयाच वाटय़ाला का आलं? त्या गोष्टीकडे संकट म्हणून न पाहता आपलं व्यक्तिमत्त्व अधिक कणखर बनवण्याची संधी म्हणून त्याचा उपयोग करता येईल. 

आपल्याला आयुष्याच्या या टप्प्यावर हा एक असा काळ आलाय ज्याला आपल्यासकट आसपासची सगळीच माणसं सामोरी जातायेत. पण पुन्हा हे काही कायमस्वरूपी नाही. कोरोनामुळे आपल्याहून जास्त भरडल्या गेलेल्या देशांमध्ये आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येते आहे. ते आपापल्या परीने सुटकेचे, बचावाचे मार्ग शोधताहेत. त्यामुळे आपल्याला काय आवडतं याचा विचार करून, छोटी का होईना छोटी कृती करणं गरजेचं आहे.

लॉकडाउनच्या या काळात असाही विचार करता येईल का, की भारतासह जगभरात गेल्या काही शतकांत असे अनेक नेते होऊन गेले ज्यांनी आपल्या आयुष्याचा वर्षानुवर्षाचा काळ तुरुंगात घालवला. नेल्सन मंडेला, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू अशी अनेक नावं डोळ्यासमोर सहज येतात. त्यांनी तो काळ कितीतरी प्रभावीपणो लेखन-वाचन-चिंतन यासाठी वापरला. आपण तर अगदीच तुरुंगात नाही, आपापल्या घरात आहोत. शक्य त्या सोईसुविधा उपभोगतो आहोत. आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी वेळेअभावी राहून जातात. त्या करायला आता कितीतरी वेळ आहे. पुन्हा तंत्नज्ञानानं उपलब्ध करून दिलेली माध्यमं आहेत. एखादी कला किंवा भाषा शिकायची असेल तर इंटरनेटवर त्यासाठी सगळं एका क्लिकवर मिळतं. भारतात तरुणांनी घरातल्या कामात मदत करण्याची गोष्ट जवळपास नगण्य आहे. ती संधी तरु ण या काळात घेऊ शकतात. स्वयंपाक शिकू शकतात. काहीतरी नवं केल्याचा आनंद आणि स्वावलंबन दोन्हींना चालना देणारी ही गोष्ट असेल, नाही का? 

3) मन:स्वास्थ्य राखण्याच्या दृष्टीने काय ऐकता, वाचता, पाहता येईल?

- एकच एक गोष्ट सगळ्यांना लागू पडणार नाही. त्यामुळे हमखास उपाय काही मी प्रीस्क्र ाइब करणार नाही. आपापला वेळ ज्यात आनंदात जाऊ शकतो त्याचा शोध आपणच घेणं महत्त्वाचं. तुमची अस्वस्थता, चिंता दूर होऊन समाधान मिळेल असं काही जरा शोधलं,  स्वत:ला चाचपलं तर ते जरूर सापडेल. कुठलीही लहानशी गोष्ट असू शकते, जी तुम्हाला प्रसन्न करते. स्वत:शी आनंदी राहायला शिकवते. वाचणं, गाणं, एखादं वाद्य वाजवणं, काहीही. याच काळात नाही तर एरवीही अशा गोष्टींची सोबत तुम्हाला असली पाहिजे.

4) तरुणांचं घरच्यांशी पटत नाही, वाद होतात, अबोले आहेत, अशा वेळी काय करायचं?

एकमेकांशी सुसंवाद नसताना घरच्यांसोबत सक्तीनं एकत्न राहणं हे मात्न तरु णांसाठी खरंच अडचणीचं ठरू शकतं. एकमेकांच्या स्वभावाचे बोचणारे पैलू, अस्वस्थता, राग अनेक नात्यांत असूच शकतात. मात्न याच्याकडे दोन्ही पद्धतीने पाहता येईल. एक, आपण भरपूर प्रयत्न केले आणि मनातल्या गाठी सुटण्याच्या काही शक्यता दिसत नसतील तर स्वीकार करून एकमेकांना न दुखावता तेवढय़ापुरतं सोबत राहता येईल, ती वेळ निभावून नेता येईल. कारण ही सगळ्यांसाठीच या ना त्या प्रकारे आव्हानाची परिस्थिती आहे. अशावेळी आपण आणखीनच वाद करत, लहानसहान बाबी चिघळवत राहिलो तर कुणालाच फायदा नाही. त्यातून सगळ्याच यंत्नणोचं संतुलन ढासळू शकतं. दुसरा मार्ग असा असू शकतो, की याकडे संधी म्हणूनही बघता येतं. मॅरेज थेरपीच्या तत्त्वांपैकी एक असं आहे, की ज्या जोडप्याचं आपसात पटत नाही त्या जोडप्याला काही ठरावीक काळासाठी एकत्न राहायला सांगितलं जायचं. पूर्वी ही पद्धत होती. नात्यात टोकाचे मतभेद, हिंसा शोषण असेल तर याचा उपयोग नाही. पण इतर वेळी अशा प्रयोगातून अनेकदा एकमेकांच्या चांगल्या बाजूही लक्षात येऊ शकतात. कुटुंबातही संवादातली दरी सांधण्यासाठी हा काळ वापरता येऊ शकतो. नीट पाहिलं तर हा काळ हेसुद्धा सांगतोय, की आयुष्य किती क्षणभंगूर आहे. त्यादृष्टीने आजूबाजूचं वास्तव पाहिलं तर लहानलहान रु सवे, मानापमान मनात धरून बसण्याची निर्थकता लगेच लक्षात येईल. जगताना आपण अनेकदा लहान गोष्टींना गरजेहून जास्त  झूम-इन  करतो. त्यातून गोष्टींचा नको तितका बाऊ करायला लागतो. कोरोनानं आपल्याला जगण्यातच झूम आउट करायला शिकवलंय..

5) स्क्रिन टाइम फार वाढला हे सगळ्यांना कळतं; पण त्यावर उत्तर काय?

याचं असं आहे, की इंटरनेट आणि त्याचा वापर हे दुधारी शस्र असतं. प्रत्येकाने आपापल्या प्राथमिकता ठरवून स्वत:ला कसा, किती वापर करायचा याबाबत शिस्त लावून घेतली पाहिजे. आपण सोशल मीडिया चालवतो की आपला ताबा घेत तो सोशल मीडियाच आपल्याला चालवत नाही ना हे सतत प्रत्येक युजरनं स्वत:ला विचारलं पाहिजे. आनंदाच्या, मन रमवण्याच्या इतरही खूप गोष्टी सापडतील, त्या आजमावल्या पाहिजेत. सोशल मीडिया वापरताना तर फोबोसारख्या सिंड्रोमपासून स्वत:ला वाचवावं. डेटिंग साइट्स असो, गेमिंग असो की पॉर्न, कशावरही सरसकट बंदी घालून कधी प्रश्न सुटलेला नाही. आपलं शोषण होत नाही, आणि आपण कुणाचं शोषण करत नाही या दोन गोष्टींची खात्नी करून घ्यावी. पॉर्नच्या आहारी जात नाही ना, याबाबत सावध असलं पाहिजे. 

6) नक्की काय केलं तर डोकं शांत राहील? 

जे टाळणो अशक्य दे शक्ती दे सहायाजे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया या कवितेच्या ओळी प्रत्येकानं आपल्या मनाला सांगत राहाव्यात अशा. ही भाविनक, बौद्धिक क्षमता आपण मिळवली पाहिजे. इतर दैनंदिन जगण्यातल्या गोष्टी सांगायच्या तर नीट पौष्टिक खाणं, व्यायाम, योग्य वेळी पुरेशी झोप घेणं हे पाळलं पाहिजे. घरकाम आणि लहानलहान गोष्टींतून आनंद मिळवणं अशा सवयी लावून घेतल्या पाहिजेत. मित्न-मैत्रिणींशी बोलून अस्वस्थता कमी होऊ शकते. अशा हक्काच्या जागा निर्माण करून जपल्या पाहिजेत.  

 

मुलाखत- शर्मिष्ठा भोसले