coronavirus : घरात बोअर झालात? "हा" पंचाक्षरी मंत्र वापरा ,जादू होईल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 18:19 IST2020-04-09T18:18:53+5:302020-04-09T18:19:29+5:30
फारच बोअर होतंय घरात? काहीच सुचत नाही? मग हे करून पाहा. फिक्स, वॉच, लर्न, सॉर्ट, टॉक

coronavirus : घरात बोअर झालात? "हा" पंचाक्षरी मंत्र वापरा ,जादू होईल!
अनेक आजारांत लोक सेल्फ हेल्प ग्रुप्स करतात. आपली दु:ख, लक्षणं, आपण काय काळजी घेतो, त्यातली सकारात्मकता शेअर करतात.
कोरोना हा तर जगभर पसरलेला आजार. गरीब, श्रीमंत सगळ्यांना त्यानं एका रांगेत आणून बसवलं. जगभरात लॉक डाउन झालं. सगळं जग इंटरनेटने मात्र कनेक्टेड राहिलं. म्हणून एकमेकांचे अनुभव लोकांना समजत आहेत. त्यातून अनेकांनी लॉकडाउनचे आपले अनुभव सांगितलेत. अशा अनेक कहाण्या नेटवर वाचायला मिळतात. त्यापैकी अनेकजण घरात एकेकटे अडकलेले. त्यांनी आपलं जगणं याकाळात कसं निभावलं याची कहाणी ते सांगतात. त्यातून या टप्प्यात टिकण्याची 5 सूत्रं हाती येतात. फिक्स, वॉच, लर्न, सॉर्ट, टॉक त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो.
1. फिक्स म्हणजे रुटीन फिक्स करा. कधीही उठायचं, कधीही झोपायचं, वाटलं तर करायची आंघोळ, वाटलं तर जेवायचं, म्हणजे दिवसाला काही शिस्तच नाही. असं करू नका. जितक्या गोष्टी आपण फिक्स करू त्यानं आपला आत्मविश्वास वाढेल, की गोष्टी आपल्या कण्ट्रोलमध्ये आहेत. आपण जे ठरवतो ते होतंच. म्हणून रुटीन फिक्स करणं गरजेचं आहे.
2. वॉच. पहा. भरपूर पहायला उपलब्ध आहे. टीव्हीवर, नेटवर, घराच्या बाहेर झाडापानांवर ते पहा. ठरवून तासभर तरी मनाला आनंद देईल असं म्हणजे जुन्या क्रिकेट मॅच ते सिनेमे, ते गाण्याच्या मैफली पहा.
3. ऑनलाइन शिका. जे आवडेल ते. अगदी स्वयंपाक शिक. विणकाम शिका. दोरीवरच्या उडडय़ा मारणं ते पाठांतर असं काहीही शिका. शिकल्यानं जरा मेंदू फ्रेश होतो.
4. आवरा. पसारा आवरा. घरात स्वच्छता मोहित रोज ठरवून करा. कपाटं, पुस्तकं आवरा. फोनमधला पसारा आवरा. भरपूर आवरायला आहे, ते आवरा. नको ते काढून टाका. ओझं कमी करा.
5. बोला. बोलायला बंदी नाही. लांबून शेजारच्यांशी बोला. फोनवर बोला. घरातल्यांशी बोला. स्वत:शी बोला.
बोलत राहा. बोलणं ही माणसांची गरज आहे, हे बोलणं थांबवू नका.