coronavirus : कोरोना  काळात  एकटं  वाटतंय ? - या ५ गोष्टी  करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 17:36 IST2020-04-02T17:25:44+5:302020-04-02T17:36:29+5:30

सारं जग घरात कोंडलं जात  असताना काहीजण एकेकटेच घरात आहेत, ते एकटय़ानं ही लढाई कशी लढत आहेत?

coronavirus: Fix, Watch, Learn, Sort, Talk- 5 formula | coronavirus : कोरोना  काळात  एकटं  वाटतंय ? - या ५ गोष्टी  करा 

coronavirus : कोरोना  काळात  एकटं  वाटतंय ? - या ५ गोष्टी  करा 

ठळक मुद्देलॉकडाउनमध्ये एकटे- फिक्स, वॉच, लर्न, सॉर्ट, टॉक !

लॉकडाउन काही फक्त भारतात झालं असं नाही.  तर जगभरात झालं.
आणि आपल्याकडे तरी कुटुंबपद्धती खास असल्याने तरुण मुलंही पालकांसोबत राहतात. घरातले सगळे फायदे उत्तम घेतात,
मात्र अनेक देशांत तरुण मुलं एकेकटी राहतात. या लॉकडाउनमध्येही अनेकजण एकेकटेच आपल्या घरात आहेत. अगदी एकटे. घरात बोलायला कुणी नाही, कुणाकडे जाता येत नाही, माणूस दिसत नाही.
कुणी मदतीला नाही की सोबतीला नाही. या मुलांचं काय होत असेल? एकटय़ानं ते कसे काढत असतील घरात दिवस?
त्यासंदर्भात काहींनी सोशल मीडियात पोस्ट लिहिल्या आहे.
होम अलोन इन लॉकडाउन टाइम असा हॅशटॅगही अनेकांनी इटली, स्पेनमध्ये चालवला.
इतरांनी त्यांना मदत केली. आपल्याकडेही घरात अनेकजण एकेकटे आहेत.

ही पाच सूत्रं अनेकजण सांगतात.
1. फिक्स म्हणजे रुटीन फिक्स करा, ते पाळाच.
2. दोन म्हणजे भरपूर पहायला उपलब्ध आहे ते पहा, माणसं सोबत असल्यासारखं वाटतं.
3. तीन म्हणजे शिकण्यासारखं ऑनलाइन आहे, काहीतरी एक गोष्ट ठरवा ती शिका.
4. चार सॉर्ट म्हणजे घरातला पसारा ते कपाट ते फोनमधला पसारा ठरवून आवरा.
5. टॉक, फोनवर बोलायला, गॅलरीत उभं राहून बोलायला बंदी नाहीये. बोला. टेक्स नव्हे, तोंडानं बोला.
यासा:यातून एकटेपणाची लढाई अनेकजण आनंदानं लढत आहेत.

 

Web Title: coronavirus: Fix, Watch, Learn, Sort, Talk- 5 formula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.