शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

coronavirus : औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना आधी दुष्काळ आता  कोरोनाचा ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 3:54 PM

दुष्काळानं पोळलेली शिक्षण घेणारी ही मराठवाडय़ातली मुलं. औरंगाबाद त्यांच्यासाठी हक्काचं; पण परीक्षाच नाही म्हटल्यावर काही गावी गेले. काही औरंगाबादेतच आहेत. त्यांच्या जेवणाचे प्रश्न तर अनेकांनी सोडवले; पण बाकी जगण्याचे काच. ते काचतातच.

ठळक मुद्देजेवण्याखाण्यापलीकडे हे मनाचे, परिस्थितीचे आणि भविष्याचे काचही सध्या काचू लागले आहेतच.

- राम शिनगारे

औरंगाबाद.  मराठवाडा आणि विदर्भातीलही काही जिल्ह्यांतून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी औरंगाबादलाच येतात. इथं येणारी ही मुलं अतिशय सामान्य कुटुंबातील असतात. त्यात दुष्काळानं पोळलेला भाग. आधीच दुष्काळ आणि आता कोरोना अशी अवघड वाट या मुलांच्या वाटय़ाला आली आहे.एरव्हीही आपला शहरात राहण्याचा महिन्याचा खर्च निघावा, गावाकडून, आईवडिलांकडून पैसे मागण्याची गरज लागू नये, यासाठी अनेक विद्यार्थी हॉटेल, एटीएममध्ये कामं करतात. कमवा आणि  शिका योजनामध्ये अनेक जण कामं करतात. यातून हजारो विद्यार्थी आपला उदरनिर्वाह चालवतात. पुणो, मुंबईसह इतर शहरांच्या तुलनेत रूम,अभ्यासिका आणि मेस खर्च अत्यल्प आहे. औरंगाबादला कमी आहे. त्यामुळे सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थी औरंगाबादची निवड करतो. असे अनेक मुलं या शहरात राहातात, आपल्या स्वप्नांचा पाठलाग सुरूच ठेवतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने 16 मार्चपासून शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर बहुतांश विद्यार्थी मिळेल ती गाडी पकडून स्वत: च्या गावी परतले. तरीही विद्यापीठात पीएच.डी. करणारे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा परीक्षा देणारे अनेकजण मागे उरले. एम.पी.एस.सी.ची परीक्षा 5 एप्रिल रोजी होणार असल्यामुळे या परीक्षेची तयारी करणारे युवक थांबले होते. सुरुवातीला शैक्षणिक बंद जाहीर केल्यानंतर राज्य शासनाने प्रत्येक दिवशी नवीन नवीन निर्णय घेतल्यामुळे सगळेच बंद होत गेले. त्यात विद्याथ्र्याच्या मेसही बंद झाल्या.दरम्यान, देशभर 21 दिवसांचा लॉकडाउन घोषित झाला. तत्पूर्वी तो राज्यातही लागू झालेला होताच.स्पर्धा परीक्षा आणि शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याच्या उपासमारीच्या घटना समोर येऊ लागल्या. समाजात याची माहिती होताच विद्याथ्र्याना जेवणाची पॅकेट वाटण्यासाठी अनेकांचे हात पुढे आले.सर्वात आधी टय़ूलिप फाउण्डेशन आणि आम्ही परभणीकर मित्रमंडळतर्फे जेवणाचे पॅकेट्स वाटपास सुरु वात झाली. यासाठी सोशल मीडियात विद्याथ्र्याना कोणतीही मदत हवी असल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले. यातून विद्यारथ्र्याचे फोन्स येत गेले. पहिल्या चार दिवसातच मदत वाटप केल्याचा आकडा 75क् च्या वर पोहोचला. तो वाढतच आहे. या सामाजिक संस्था पुढे आलेल्या असतानाच माजी आमदार कुशनचंद तनवाणी हे मागील अनेक वर्षापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणिरु ग्णालय अर्थात घाटीत खिचडीचे वाटप करतात. त्यांनीही विद्याथ्र्याच्या जेवणाची व्यवस्था करण्यास सुरु वात केली. त्यांच्याकडेही 1क्क् पेक्षा अधिक विद्याथ्र्याची नोंदणी झाली. यानंतर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी ही विद्याथ्र्याना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनीही आवाहन केल्यानंतर 25क् पेक्षा अधिक विद्याथ्र्यानी नोंदणी केली. भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरीश बोराळकर यांनीही स्वत:च्या स्वयंसेवी संस्थेमार्फत विद्याथ्र्याना मदतीचा हात दिला. विविध संस्थांच्या मदतीमुळे विद्याथ्र्याना नियमितपणो जेवणाचे पॅकेट मिळण्यास सुरु वात झली. यातून जेवणाचा प्रश्न सुटला आहे. मात्र 5 एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे औरंगाबादेत असलेल्या विद्याथ्र्याना ही स्वत:चे घर जवळ करायचे आहे.मिळेल त्या वाहनाने गावी जायचे आहे. कारण शहरात कोरोनाची भीती अधिक असल्यामुळे गावाकडून आईवडील, नातेवाईक गावाकडे येण्यास सांगताहेत. मात्र गावाकडे जाण्यासाठी गाडी नाही, जिल्हाबदली करता येत नाही. त्यामुळे जेवण मिळत असतानाही हे विद्यार्थी अस्वस्थ आहेत. त्यांचे लक्ष अभ्यासातही लागत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.स्पर्धा परीक्षांची अनेक वर्षापासून तयारी करणा:या काही युवकांमध्ये नोकरी नसल्यामुळे गावाकडे जावे वाटत नाही. हे विद्यार्थी गावी गेले तर अनेकांच्या नोकरीसंदर्भातील प्रश्नांना उत्तारे द्यावी लागतात. ही उत्तरे देण्याचं सामथ्र्य या युवकांमध्ये नसतं. अगोदरच नोकरी लागत नसल्याचं शल्य मनाला डाचतं. त्यात नातेवाईक, गावक:यांच्या कुत्सित प्रश्नांना तोंड कसं द्यायचं, हा प्रश्न असतो. त्यामुळे अलिप्त राहिलेलंच बरं म्हणून हे विद्यार्थी शहरातच राहातात.जेवण्याखाण्यापलीकडे हे मनाचे, परिस्थितीचे आणि भविष्याचे काचही सध्या काचू लागले आहेतच.

( राम लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीत शिक्षण वार्ताहर आहे.)