coronavirus : २१ दिवस 24 तास, पुण्यात जे तरुण अडकले त्यांनी करायचं काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 15:47 IST2020-04-02T15:47:42+5:302020-04-02T15:47:53+5:30
घरी जाऊ जाऊ म्हणता म्हणता अनेकजण पुण्यात अडकले. छोटय़ाशा खोलीत अनेकजण दाटीवाटीने राहातात. जेवणाची सोय तर संस्था, संघटनांनी केली; पण जेवण असं परस्वाधीन हा अनुभवही नवा, काहीसा विचित्रच आहे; पण. तरी राहायचं तर आहेच.

coronavirus : २१ दिवस 24 तास, पुण्यात जे तरुण अडकले त्यांनी करायचं काय?
- राहुल गायकवाड
होळीच्या दिवशी पुण्यात कोरोनाचे दोन रु ग्ण आढळले. राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचं स्पष्ट झालं. प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरु वात केली. पुढे रु ग्णांचा आकडा वाढायला सुरु वात झाली. अनेकांच्या स्वाइन फ्लूच्या वेळेसच्या आठवणी जाग्या झाल्या. देशात पुण्यात सर्वप्रथम लॉकडाउनची घोषणा झाली. पुढच्या काही दिवसात देशातही लॉकडाउन घोषित झाला. आणि हे सुरूअसताना पुण्यात शिकायला आलेल्या मुलांनी मात्र घरचा रस्ता धरला. अनेकांना घरी जाण्यावाचून पर्यायही नव्हताच, कारण परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या तर पुण्यात राहून काय करणार?
पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर बाहेरगावी जाण्यासाठी उसळलेल्या गर्दीचे व्हिडीओ व्हायरल झाले. अनेकांनी जाणा:यांना दुषणंही दिली.
दुसरीकडे पुण्यात कोरोनाचे रु ग्ण आढळल्यानंतर गावोगावचे पालकही मुलांना फोन करून घरी बोलवू लागले.
प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली होती.
पुण्यातून बाहेरगावी जाणा:या ट्रेन, बसेस भरून जात होत्या.
काही दिवसातच जवळजवळ 90 टक्के विद्यार्थी आपापल्या गावी परतले.
काहीजण घरी परतण्याच्या तयारीतच होते अन् देशभरात लॉकडाउन जाहीर झाला.
त्यांना पुण्यात अडकून पडावं लागलं.
आता 21 दिवस काढायचे कसे, असा प्रश्न त्याच्या समोर निर्माण झाला होता.
मेस, हॉटेल सर्वच बंद झाल्याने सुरु वातीला खाण्याची आबाळ झाली;
परंतु त्यांच्या मदतीला पुण्यातील स्वयंसेवी संस्था आल्या. अनेकांच्या जेवणाची सोय झाली. अर्थात अनेकांसाठी हा अनुभवही नवीन आहे.
अन्नासाठी दुस:यावर अवलंबून राहावं लागणं, आपण परस्वाधीन होणं ही भावना नवीन आहे.
त्यात अनेकजण एका छोटय़ा खोलीत राहतात. भरपूर मुलं एका खोलीत, त्यांनाही आता 21 दिवस कसे काढायचे कळत नाही. दाटीवाटीनं तगून आहेत.
पुण्यातील एका खासगी संस्थेत काम करणारी मूळची नांदेडची असणारी मोहिनी घरी जाण्याच्या तयारीत असतानाच लॉकडाउन जाहीर झालं.
तिला पुण्यात अडकून पडावं लागलं.
मोहिनी तिच्या बहिणीसोबत एका ठिकाणी पेइंग गेस्ट म्हणून राहाते.
पुण्याची परिस्थिती बघून घरच्यांनी गावी येण्याचा तगादा लावला होता;
पण ऑफिसला सुट्टी मिळेर्पयत लॉकडाउन जाहीर झालंच.
रेल्वेचं तिकीट हातात असताना आता घरी जाता येणार नव्हतं.
त्यातच या काळात मोहिनीच्या आजीचे निधन झालं.
पण तिला आजीला शेवटचं भेटताही आलं नाही. आजी गेल्याचं दु:ख सोबत घेऊन पुण्यात राहाणं या बहिणींच्या वाटय़ाला आलं आहे.
कधी एकदा हा लॉकडाउन संपतोय आणि गावी जाता येतंय असं झालंय, असं मोहिनी सांगते.
मोहिनीसारखी परिस्थिती पुण्यात अडकलेल्या अनेकांची आहे.
कामामुळे किंवा बस, रेल्वे न मिळाल्यामुळे ते आता पुण्यात अडकून पडलेत.
सोबतीला फोन, इंटरनेट आणि पुस्तकं एवढंच आहे.
21 दिवस चोवीस तास करायचं तरी काय, असा प्रश्न आता त्यांना पडलाय.
पहिले काही दिवस गेले कसेबसे; पण आता जेलमधल्या कैद्यासारखी त्यांची परिस्थिती झाल्याचं ते सांगतात.
पुस्तकं, मोबाइल याचा एका पॉइंटनंतर कंटाळा येतो. बाहेर तर पडता येत नाही अन् घरात ना टीव्ही आहे ना इतर मनोरंजनाच्या गोष्टी.
एका खोलीत तर पाच ते सहा जण अशी अनेकांची अवस्था. अनेकजण निराश, उदास होऊ लागलेत. गप्प गप्प राहात आहेत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था.
गजानन त्याच्या चार रूम पार्टनरसोबत राहातो. त्यातले काही जॉब करतात तर काही स्पर्धा परीक्षांची तयारी.
प्रत्येकजण रोज आपापल्या कामाला जायचा अन् रात्री भेटायचा.
आता 24 तास घरातच. ज्यांना वर्कफ्रॉम होम आहे ते आपलं काम करतात; पण उरलेल्या वेळेत काय करायच? हे अजूनही त्यांना कळत नाही.
त्यातच अनेकांना खूप वेळ घरात राहायची सवय नाही.
त्यामुळे त्यांची तर घुसमटच होतीये. अनेकांना दगदगीच्या आयुष्यातून शांतता मिळत असल्याने हायसं वाटतंय; पण ते किती दिवस टिकेल हे माहीत नाही.
सातत्याने एकाच ठिकाणी असल्याने मनात विचारांच काहूर आहेच. त्यातच रोज घरच्यांचे काळजी करणारे फोन येतातच.
प्रणिता हिंजवडीतल्या एका आयटी कंपनीत काम करते.
लॉकडाउनमुळे वक्र फ्रॉम होम तिला करावं लागतंय.
तिचा छोटा भाऊ आणि ती एका फ्लॅटमध्ये राहाते. भाऊ घरी गेलाय तर प्रणिता एकटीच आता पुण्यात.
ऑफिसचं काम असल्याने दिवस जातो कसा बसा निघून पण इतर वेळ खायला उठतो.
मग पुस्तकं वाच किंवा गाणी ऐकत बसं असे काही तिचं सुरू आहे. हा नवाच अनुभव तिच्या वाटय़ाला येतोय.
पुण्यात अडकलेला प्रत्येकजण लॉकडाउन संपण्याची वाट पाहतोय.
त्यांना या चार भिंतींच्या कैदेतून सुटका हवीये; परंतु कोरोना नावाचा राक्षस दारात उभा आहेच..
( राहुल लोकमत पुणो ऑनलाइन वार्ताहर आहे.)