corona virus : आता जगायचं कसं ते सांगा? - खेड्यापाडयातलं तारुण्य कसली शिक्षा भोगतंय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 15:30 IST2020-04-02T15:28:57+5:302020-04-02T15:30:32+5:30
परवा इचलकरंजीजवळच्या खोतवाडी भागात बाजारला भाजी विकण्यासाठी गेलो तर भाजी गाडीवरून उतरवायच्या आत लोक तुटून पडलं, सोशल डिस्टन्स वगैरे हे या गर्दीला माहीत नाही. या गर्दीने पाच मिनिटांच्या आतबाहेर भाजी संपवली; तितक्यात पोलीस आले दांडके घेऊन. बाजार गुंडाळला.

corona virus : आता जगायचं कसं ते सांगा? - खेड्यापाडयातलं तारुण्य कसली शिक्षा भोगतंय?
-श्रेणिक नरदे
कोरोना विषाणू परदेशातून आला. शेतकरी परदेशात नव्हता गेला. शेतमजूर गेला नव्हता. चहाटपरीवाला, भाजीवाले, फुलवाले, गजरा विकणारे, इस्रीवाला, गवंडी, भांडी घासणारी, धुणं धुणारी, पंक्चर दुकानवाला, केळेगाडीवाले, लोहार, कासार, गावोगावच्या जत्रेत खेळण्याची दुकाने लावणारे, फिरून चिरमुरे, आईस्क्र ीम गारेगार विकणारे अशी ही हातावर पोटं असलेली गोरगरीब लोकं परदेशात गेली नव्हती.
जगभर विशेषत: चीनमध्ये जेव्हा हाहाकार उडला होता तेव्हा आपली व्यवस्था मजेतच चालू होती.
त्यानंतर आपल्या देशातील मंत्र्यासंत्र्यांनी, वजनदार लोकांनी आपलं वजन वापरून परदेशातले लोक विमानाने भारतात आणले.
जुजबी तपासणी केली आणि त्यांच्या हातावर शिक्का मारून सोडून दिलं. हेच लोक आले आणि गावभर बोंबलत हिंडले. नाचले. गायले. जेवणावळ्या उठवल्या, पाटर्य़ा केल्या.
अशी मजा या लोकांनी केली आणि हळूहळू यातलेच काही लोक पॉङिाटिव्ह आले.
जनता कफ्यरू लागला. लगेचच दोनेक दिवसांनी लॉकडाउनचा निर्णय झाला.
लोकांनी स्थलांतर चालू केलं. गावोगावी पोलीस तैनात झाले. कारणाने बाहेर आलेले लोकही पोलिसांच्या दंडुक्याचे शिकार झाले.
आज गावोगावी लोक द्राक्षांच्या बागा तोडून टाकालेत. फिरते विक्रे ते, छोटे व्यापारी बसून आहेत, चहापानटपरीवाले बसून आहेत.
परवा इचलकरंजीजवळच्या खोतवाडी भागात बाजारला भाजी विकण्यासाठी गेलो तर भाजी गाडीवरून उतरवायच्या आत गि:हाइकं तुटून पडलं, सोशल डिस्टन्स वगैरे हे या गर्दीला माहीत नाही.
या गर्दीने पाच मिनिटांच्या आतबाहेर भाजी संपवली; तितक्यात पोलीस आले दांडके घेऊन, बाजार गुंडाळला.
देणा:यांनी पैसे दिले बाकीचे पळून गेले. ही वेळ पैशाचा हिशेब घालण्याची नाही याची जाणीव आहे.
मात्र याच बाजारात एक जाणवलेली गोष्ट अशी की, जे छोटे व्यापारी दर आठवडी बाजारात दिसायचे त्यातील एकही व्यापारी दिसला नाही.
कारण त्यांना वाहतुकीचं कोणतंच साधन उपलब्ध नाही. यात जास्त करून महिला होत्या, त्यांची उपजीविका कशी चालत असेल काय माहीत?
जे परदेशातून आले त्यांना सरकारने अतिशय अदबीनं आणलं.
मात्र लॉकडाउन झाल्यावर लोक आपापल्या घरी शेकडो किलोमीटर चालत निघाले तेव्हा त्यांची वाहतुकीची सोय केली नाही.
आता जेव्हा हे लोक गावी परतले तेव्हा त्यांना रस्त्यावर बसवून त्यांच्यावर औषध फवारणी केली जातीय हा कुठला अमानुष प्रकार?
हीच पद्धत रोग घेऊन येणा:या पांढरपेशा इंडियन लोकांवर का वापरली नाही.
मात्र या क्वॉरण्टाइन नीट न पाळलेल्या इंडियन लोकांमुळे आज कशातच काही दोष नसलेला ग्रामीण भारतीय वर्ग भिकेला लागलेला आहे. आणि ग्रामीण तरुणाचं तर पूर्ण भवितव्य अधांतरी वाटू लागलं आहे.
इंडिया आणि भारत असे या देशाचे दोन चेहरे होतेच.
आता भारत, तिथला तरुण अधिक होरपळतो आहे.
हा दुष्काळाच्या आधीचा धोंडा महिना आहे.
कसं होणार .? कुणाला माहिती.?