शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

corona : जॉब  हवा ? तुम्ही कोणत्या झोनमध्ये आहात? ग्रीन की रेड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 16:06 IST

कोरोनानंतर जर फक्त डिग्रीवर अवलंबून राहिलात तर काम सोडा काहीच हाती लागणार नाही. त्यामुळे आजच लहानमोठे स्किल्स शिका, तेही घरच्या घरी. तरच टिकाल !

डॉ. भूषण कोळकर

आज 30 एप्रिल म्हणजे कोविड-19च्या लॉकडाउनमधील भारतासाठी महत्त्वाचा टप्पा.आजच्या आकडय़ांवर बरीच गणिती प्रारूपे अवलंबून आहेत आणि आपलं करिअर आणि भविष्यही.या प्रारूपांवरून प्रामुख्याने हे ठरेल की आपला लॉकडाउन आणि त्यानंतरची रिकव्हरी ही कशी असेल?कुठल्याही आर्थिक संकटातून बाहेर पडताना तीन प्रकारची रिकव्हरी सांगितली जाते.व्ही-यू आणि एल-व्ही प्रकारात आर्थिक व्यवहार प्रचंड वेगानी खाली येतात; पण परिस्थिती सुधारताना ती तेवढय़ाच वेगाने सुधारते.यू प्रकारात खालावलेली आर्थिक स्थिती ही काही काळ तशीच राहून मग सुधारते.एल या प्रकारात ती अत्यंत कमी वेगाने सुधारते किंवा सुधारतच नाही! अर्थात आपण ही आशा प्रार्थना करा की भारताची रिकव्हरी ‘व्ही’ आकाराची असावी आणि त्याची सुरुवात लवकरच व्हावी.पंतप्रधान मोदींनी म्हटल्याप्रमाणो ‘‘जान है तो जहान है’’ वरून ‘‘जान भी, जहान भी’’कडे संक्रमण करण्याचा हा काळ! एक चांगली बाब पुढे येते आहे म्हणजे सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड डिझाइन (जेयूटीडी) यांनी ‘एसआयआर’ नावाच्या मॉडेलच्या आधाराने असं वर्तवलय की जगभरात कोरोना मे मध्यार्पयत आणि भारताचा मेअखेर-जून सुरुवातीर्पयत खूप आटोक्यात येईल. दुसरीकडे आपल्याकडेही पूल टेस्टिंग, प्लाङमा थेरपी याचे चांगले परिणाम दिसत आहेत. त्याचाही उपयोग होईल अशी आशा आहे.आता यासा:या पाश्र्वभूमीवर सर्व विद्याथ्र्याच्या/ तरुणाईच्या दृष्टीने पाहिल्यास काय दिसतं?तर ते आपण पाहू.1. महत्त्वाची बाब म्हणजे यूजीसी असं म्हणतंय की पुढील शैक्षणिक वर्ष हे सप्टेंबरमध्ये सुरू होईल. म्हणजेच आपल्या करिअर घडवण्याच्या मार्गात निदान ही शैक्षणिक नुकसान होण्याची तरी शक्यता दिसत नाही.2. मग तरीही आपलं करिअर, त्यासंदर्भातले निर्णय, कोरोनानंतरची आव्हानं आणि संधी आपल्यासाठी काय आहेत? नक्की आपला कुठं लाभ आणि कुठं नुकसान होऊ शकतं?3. पहिलं म्हणजे थॉमस फ्रीडमनने ‘दे वर्ल्ड इज फ्लॅट’मध्ये जे जागतिकीकरण सपाट होत गेलेलं दाखवलं ते जग परत विलगीकरणाकडे झुकतं आहे. उदा. युरोपीय समुदायातील घटक राष्ट्र स्वत:पुरता विचार करत आहेत. अमेरिकेने जेव्हा पाहिलं की 2 कोटी 6क् लाख लोकांनी बेरोजगार भत्ता मिळवण्यासाठी अर्ज केलेत, तेव्हा पुढील दोन महिन्याकरिता नोकरीसाठी स्थलांतराची सर्व प्रक्रिया त्यांनी थांबवली. ग्रीन कार्ड, एचवनबी व्हिसा या सर्वावर र्निबध घातले. हे तात्कालिक वाटलं तरी याचे परिणाम आणि ही दिशा दुरगामी असणार हे उघड आहे.4. दुसरं म्हणजे आतार्पयत कोणताही देश जागतिक वितरण सावलीवर जसा अवलंबून होता तसाच्या तसा आता अवलंबून राहणार नाही. एकाच देशातून केवळ स्वस्त मिळतं म्हणून, सर्व माल आयात करणं हे यापुढे धोक्याचं ठरेल हे ओळखून त्याच्या छोटय़ा शृंखला करून अनेक देशातून तो पुरवठा मिळवला जाईल. हे विशेषत: अत्यावश्यक वस्तू/सेवा आणि औषधं, संरक्षण साधनं यासंदर्भात घडेल.5. तिसरं म्हणजे चीनबद्दल सार्वगिक पातळीवर किमान संशय/काळजी ते उघड शत्रुत्व अशी भावना दिसते आहे ! त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग व औषधनिर्माण या क्षेत्रतील खूप काम जे आधी स्वस्त श्रममूल्यामुळे चीनमध्ये होते, ते आता अन्य देशात व मोठय़ा प्रमाणात जाईल अर्थात याचा भारताला प्रचंड फायदा होऊ शकतो आणि भारत सरकार व उद्योग ते करून घेतील. ‘‘चायनाज लॉस इज इंडियाज गेन’’.6. चौथं म्हणजे कार्यपद्धतीत फरक पडेल. वर्क फ्रॉम होम, डिजिटल व ऑनलाइन/व्हचरुअल कार्यपद्धती रुजेल, वाढेल!7. पाचवं म्हणजे ज्याला गीज इकॉनॉमी म्हणतात की ज्यात पर्मनंट कामगार नसतात तर प्रॉजेक्टच्या गरजेनुसार कंत्रटी कामगार, अर्धकाळ कामगार व फ्रीलान्सर्स अशांकडून कामं पूर्ण केले जातं, ते वाढीस लागेल.8. सहावं म्हणजे माणूसकेंद्री अंगमेहनीतचं व एकजिनसी काम कमी होऊन रोबोट्स व नवतंत्रज्ञानाचा वापर वाढेल.1क्. सातवं म्हणजे भावनात्मक/संवेदना/समवेदना आणि समुपदेशन/मानसशास्र आधारित मानवकेंद्रित कामांना, त्या प्रकारच्या भूमिकांना मागणी वाढेल.11. आठवं म्हणजे तंत्रज्ञानपूरक व तंत्रज्ञान आधारित कामांचा गती येईल. विशेषत: चीनमधून भारतात आलेली अनेक प्रकारची काम- मॅन्युफॅक्चरिंग, औषधनिर्माण, संरक्षणपूरक तंत्रज्ञान व सेवा इ. यामध्ये कोरोनात्तर काळात, सर्व क्षेत्रत समान होणार नाही. 12. त्यामुळे हे लक्षात ठेवा की डिग्री हा फारतर तुमचा तात्पुरता व्हिसा आहे, तो लागेलच. पण प्रत्येक वेळेला प्रवास करायला वेगळं तिकीट  काढावं लागेल. स्वयंअध्ययन त्यासाठी ऑनलाइन साइट्सचा वापर करणं. (कोर्सेरा, ईडीक्स, इनव्र्हिसीटी इ.) डीलीगोसारख्या अॅपवरून परकीय भाषा शिका तेही विनामूल्य. पूट ऑन ही कोडींग लॅँग्वेज आणि डाटा अॅनॅलिसिससाठी ‘आर’ हे शिका हे सारं विनामूल्य आहे!कोरोनोत्तर काळात यशस्वी करिअरसाठी स्वयंशिस्त व स्वयंअध्ययनाचा ‘‘ऑक्सिजन’’ आवश्यक आहेच!कोरोनोत्तर काळात टिकण्यासाठी तुम्ही अॅनॉलिसिसकडून सिन्थेसिस (विश्लेषणाकडून संश्लेषणाकडे) जाणं आवश्यक आहे. डिग्रीबरोबर किमान 1/2 पूरक कोर्सेस, डिप्लोमा, सर्टिफिकेशन करणं आवश्यक आहे. अन्यथा गीज इकॉनॉमीमध्ये आपला टिकाव लागणार नाही. त्यामुळे वेळ आहे, तो वाया घालवू नका.

 सरकारने रेड-ऑरेंज-ग्रीन झोन्स तयार केले तसेच मी कोणती क्षेत्रं रेड-ऑरेंज अशामध्ये येतील ?1. पर्यटन, विमानप्रवास, हॉटेल, रिटेल, मॅन्युफॅक्चरिंग हे रेड झोनमध्ये आहेत. 2. आरोग्य-शिक्षण-शेती-आर्थिक क्षेत्र पेट्रोलियम व काही काम हे ऑरेंजमध्ये आहेत. 3. सर्व इंडस्ट्री 4.क् ची क्षेत्रे, ऑनलाइन तंत्रज्ञान, सायबर सिक्युरिटी, ब्लॉकचेन, आरोग्यक्षेत्र-औषधनिर्माण, मानसिक आरोग्य ही क्षेत्रं ग्रीन झोनमध्ये असतील.

(लेखक आयटी तज्ज्ञ आणि करिअर कौन्सिलर आहेत.)