सतत तुमचा कम्प्लेन मोड ON आहे, मग कोरोनाकाळात कसं होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 03:40 PM2020-04-30T15:40:34+5:302020-04-30T16:33:18+5:30

हा कोरोना, त्यानं आपल्याला कोंडून घातलं आहे. मला खूप काही करायचं होतं; पण आता काहीच करता येत नाही, आपलं लाइफच आउट ऑफ कण्ट्रोल झालंय असं म्हणून रडत बसायचं, की आयुष्याचा कण्ट्रोल आपल्या हाती घ्यायचा, डिसाइड करो बॉस !

corona lockdown - off your complain mode & switch to action mode. | सतत तुमचा कम्प्लेन मोड ON आहे, मग कोरोनाकाळात कसं होणार ?

सतत तुमचा कम्प्लेन मोड ON आहे, मग कोरोनाकाळात कसं होणार ?

Next
ठळक मुद्देविचार फार, कृती कमी किंवा कृती शून्य, विचार खूप या चक्रातून बाहेर पडा, तर जगणं हाताशी लागेल!

प्राची पाठक

लॉकडाउनच्या काळात आणि एरवीही नेहमी होणारी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का?
आपण एरवीही जरा आरामात उठतो. त्यानंतर हळूहळू माणसात यायला अर्धा-एक तास घेतो. 
हातात फोन आलेला असतोच सकाळी सकाळी.
झोपेचे जे काही चार-पाच सात तास आपल्याला मिळालेले असतात, त्यानंतर इतक्या तासांनी आपण फोन हातात घेत असतो. 
म्हणजे पाच-सहा तास जगातलं बरंच काही मिस झालं असेल तर? कोणाचे स्टेटस अपडेट बघायचे राहून गेले तर?
त्यामुळे उठल्या उठल्या आपण आधी तो फोन चेक करून घेतो. त्यात  दीड-दोन तास सहज निघून जातात.
मग थोडंफार स्वत:चं काहीतरी आवरून दिवसभर आपण आळसात घालवतो. आणि मग म्हणतो, काहीच करण्यासारखं नाही, आयुष्यात काहीच भारी घडत नाही.
एरव्हीही घडत नव्हतंच; पण आता कोरोना काळात तर आपण इतकी रडगाणी गातो, जगणं ‘स्टक’ झाल्याची की एरव्ही आपण फारच क्रांतिकारी काम करत होतो.
तर ते जाऊ देत.
पण विचार करा, एरवी आपले खूप प्लॅन असतात. हे करू, ते करू. पण ते सगळं कधी करायचं, कुठून सुरुवात करायची याचा आपल्याकडे कुठलाही प्लॅन नसतो. फक्त मनातच मांडे खायचे. मला वेळ मिळाला की मी हे करून बघेन, ते करून बघेन. पण प्रत्यक्ष जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आपण जितकं ठरवलेलं असतं, त्याच्या काही टक्क्यांमध्येदेखील आपण ते काम करत नाही. दिवसभर इकडे तिकडे काय चाललंय, काय न्यूज अपडेट आहेत वगैरे करण्यात गेल्यावर रात्नीच्या वेळीच आपल्याला आपल्या सिनेमांचा बॅकलॉग भरून काढायची हुक्की येते. मग आपण एरवी दिवस-दिवस लोळत पडून रात्नी सिनेमे बघायला घेतो. ते संपेर्पयत अर्धी रात्न ओलांडते. झोपायला उशीर झाल्याने उठायलादेखील उशीर. परत तेच चक्र. करू करू म्हणून लटकवून ठेवलेल्या याद्या तशाच लटकलेल्या असतात. पुन्हा आपल्या डोक्यात असतंच, अरे आपल्याला पाहिजे तसं काही झालं नाही. 
आता सांगाल यावर काय करता येईल? 
जेणोकरून आपल्या या लिस्टमधल्या सगळ्या गोष्टी एक एक करून पूर्ण होत जातील. त्या पूर्ण झाल्याचा आनंदही आपल्याला मिळत जाईल. त्या आनंदातून आपण आणखीन अपडेट होऊ आणि नवनवीन गोष्टी मार्गी लावायचा, करून बघायचा आपला उत्साह असाच वाढत राहील..
मुख्य म्हणजे आपण जे ठरवू ते होतं, हा आत्मविश्वास मिळेल. आपण ठरलेलं काम पूर्ण करू, त्याचा आनंद, सेन्स ऑफ अचिव्हमेण्ट मिळेल. दुसरं म्हणजे आपलं जगणं आपल्या आटोक्यात नाही, आउट ऑफ  कण्ट्रोल आहे असं वाटत असेल तर ते तसं नाही, हेही आपल्याला जाणवेल आणि आपण अधिक जोरकसपणो पुढचं आव्हान स्वीकारू.
तर मग त्यासाठी काय काय करता येईल?
ही एक सहज सोपी यादी घ्या.
तसं करून पहा.
किंवा तुमची यादी स्वत: बनवा.
लाइफ एकदम आपल्या कण्ट्रोलमध्ये येईल, आपण विचारातून बाहेर पडून कृती करायला लागू हे नक्की.
कृती महत्त्वाची. मग लागा कामाला.
म्हणजे करून पहा.
ट्राय इट.

ये हो सकता है, अगर करो तो!

1. सगळ्यात आधी आपल्याला आपल्या पेंडिंग लिस्टवर एक नजर टाकून तिची जराशी उजळणी करावी लागेल. त्यातल्या राहून गेलेल्या गोष्टींचा प्राधान्यक्र म ठरवावा लागेल. एकदा हे ठरलं की आपण त्या यादीमधून ज्या गोष्टी सहज करून टाकण्यासारख्या आहेत, त्यांच्यासाठी कुठलं सामान पाहिजे, इतरांची मदत पाहिजे, असं अडून बसायची गरज नाही, त्या आधी निवडायच्या. आपल्याकडे हे नाही, ते नाही, ते त्यांना विचारायचं, हे यांनी सांगितलं तरच होईल, असल्या कुठल्याही कारणांमध्ये न अडकता त्या गोष्टी करायला घ्यायच्या.
2) सुरुवातीला अगदी दहा-पंधरा मिनिटात होऊन जाणा:या गोष्टी निवडायच्या. जसं की छोटीशी आवराआवर करणो. आपले कप्पे आवरणं. आपली सायकल, गाडी पुसून काढणं.  त्यात हवा भरणं, कोणाला पेंडिंग मेल पाठवायचे असेल तर पाठवून देणं, एखादं बिल भरून टाकणं, कोणाला काही निरोप द्यायचा असेल तो देऊन टाकणं, आपले शूज, चप्पल नीट साफ करून ठेवणं, आपली रोज वापरती सॅक, पर्स, बॅग स्वच्छ करणं, तिच्या चेन्स तुटल्या असतील तर त्या बसवायला शिकणं, बाहेर आलेले धागे काढून टाकणं, एखादी टीप कपडय़ांना मारणो, कपडे इस्री करून नीट ठेवणं वगैरे. या चटकन आणि खात्नीनं यशस्वी होणा:या कामांमुळे एकेक करून कामं मस्तं संपत जातात, असा हुरूप आपल्याला येईल. आपली कामं आपल्याला हवी तशी संपतात, हे लक्षात येईल. आपण हातात घेऊ ते काम मस्तं पूर्ण करतोच, असा विश्वास वाढत जाईल. 

3) मग सोप्या कामाकडून, रोजच्या कामाकडून जरा अवघड कामांकडे जायचं. ज्यांना थोडा जास्त वेळ देणं गरजेचं आहे, अशी कामं निवडायची. रोज त्यासाठी किमान अर्धा, एक तास वेळ आपण देऊच, असं पक्कं करायचं स्वत:शी. काही प्रोजेक्ट्स असतील, काही असाइनमेंट्स असतील, कसली माहिती घेणं असेल, एखादा कोर्स पूर्ण करून टाकणं असेल. ते एकेक करत संपवून टाकायचं. म्हणजे पुढच्या कामासाठी आपण तयार असतोच, परत ही कामं नीट झाल्याचा आनंद आपल्याला मिळतो.

4) छोटय़ा छोटय़ा गोष्टींपासून सुरुवात करायची आणि मग मोठय़ा गोष्टींकडे जायचं. आपल्याकडे हे नाही, ते नाही, अमक्याकडे ढमकं आहे, म्हणून त्याचं तमकं सुरू आहे, या विचारांतून बाहेर पडायचं. जे आहे, त्यात कामं सुरू करायची. कुरकुर, किरकिर मोड ऑफ करायचा. हा एक अमुक गोष्टी ‘गिव्हन’ असलेला गेम आहे, असं समजून भिडायचं.. तरच तो गेम खेळायला मजा येईल..

5) मुद्दा काय तुमची विचारांची गाडी कृतीच्या ट्रॅकवर आणा, कामाला लागा. विचारच करत राहिला तर काहीच घडत नाही म्हणून रडत बसा. घडत काही नसतंच, ते घडवावं लागतं मनासारखं. आणि ते मनासारखं असणं आपल्या हातात असतं, फक्त कामाला लागलं पाहिजे.

(प्राची मानसशास्नसह पर्यावरण आणि सूक्ष्म जीवशास्नची अभ्यासक आहे.)

Web Title: corona lockdown - off your complain mode & switch to action mode.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.