बरसत्या पावसात आठवणारे कॉलेजातले चिंब दिवस

By Admin | Updated: July 12, 2016 15:46 IST2016-07-12T15:34:18+5:302016-07-12T15:46:16+5:30

तो आला आणि बरोबर ‘तिला’ही घेऊन आला. मी बदललो पण ती तशीच होती, हो असणारच ना तिला बंधन नाही काळाचे आणि त्यामुळे वयाचे.

Collegiate chimpanzees that remember the rainy season | बरसत्या पावसात आठवणारे कॉलेजातले चिंब दिवस

बरसत्या पावसात आठवणारे कॉलेजातले चिंब दिवस

>- पूजा दामले
तो आला आणि बरोबर ‘तिला’ही घेऊन आला. मी बदललो पण ती तशीच होती, हो असणारच ना  तिला बंधन नाही काळाचे आणि त्यामुळे वयाचे. 
ती राहते तशीच चिरतरुण कारण सर्व बदलते मात्र ती तशीच राहते, 
तिला बदलण्याची ताकद कोणातच नाही..
ती? - ‘ती आठवण’...
पावसाळा सुरु  झाला, जोरदार पाऊस कोसळतो, पण भिजयला जाण्यापेक्षा आता लांब उभं राहूनच पाऊस पाहायला आवडतं. आॅफिसच्या खिडकीतून पाऊस पाहता येत नाही. पण, रविवारी कोसळणारा पाऊस घराच्या खिडकीतून पाहता आला आणि सगळी आठवणींची कवाडं उघडली, पावसात न भिजता मनातून दाटलेल्या ढगातून बरसणाºया पावसात चिंब ओला झालो...
जॉब सुरु  होऊन दीड वर्षच झालं आहे. पण कॉपोर्रेटमधला दिखाऊपणा न कळतं मी आत्मसात केल्याचं या पावसाने मला दाखवून दिलं. खरं तर मला माहित होतं पण ते मला मान्य करावं लागलं या पावसामुळे! 
कॉलेजनंतर आयुष्य बदलतं हे ऐकले होते. पण मला इतक्या लवकर  हा बदल अनुभवता येईल, असं वाटलं नव्हतं!
-पण आता आहे, हे असं आहे...
कॉलेजच्या पहिला दिवस १६ जुलै. पहिल्यांदाच ट्रेननय एकट्यानं केलेला प्रवास, आणि त्यात कोसळणारा पाऊस. मनात धाकधुक होती, ट्रेन बंद पडली, कॉलेजला जायला उशीर झाला तर? पण सुदैवानं असं काहीच झालं नाही. पाऊस कोसळत असूनही मी अगदी सुखरूप आणि मुख्य म्हणजे वेळेत स्टेशनला पोहचलो. पहिला दिवस कॉलेजला नीटनेटकं आय मीन चकाचक आणि अपटू डेट जायचं म्हणून टकाटक होऊन निघालेलो पण छत्री काय नि विंडचीटर काय कोणाचाही उपयोग नाही. अर्ध्याहून अधिक भिजलेल्या परिस्थितीत कॉलेजला पोहचलो, म्हणायला मी तिथे एकटा होतो पण तसा पाहायला मी एकटा नव्हतो.  कारण माझ्यासारखे अनेकजण तिथे मला दिसत होते. थोडेसे भांबावलेले, पण डोळ्यात एक चमक कॉलेजला आल्याची आणि त्यात आपण एकट वेगळे म्हणजे बावळट वाटू नये म्हणून चेहºयावर एक वेगळा भाव आणायची धडपड. पण तरी आपल्यासारखे इतरजण पाहून सर्वांनी सोडलेला सुटकेचा नि:श्वास. हे सगळं पाहत म्हणजे निरीक्षण करत असताना माझ्या कानावर आवाज पडला, ‘एफवायजेसी डिव्हिजन सी’. हो, मला लक्षात आलं मलाही याच वर्गात जायचं आहे. नजर फिरवत तो आवाज कोणाचा हे शोधण्याचा प्रयत्न सुरु  केला. अवघ्या काही सेकंदात यश मिळालं. सडसडीत बांध्याचा, सावळा रंग पण शार्प फिचर असलेला तो,  माझा कॉलेजमधला पहिला मित्र शुभम.  दोघजण वर्गात गेलो. सवयीप्रमाणे थोडे मागे म्हणजे चौथ्या बाकावर बसलो. माझ्या आणि माझ्या मागच्या बाकावर मिळून आम्ही आठजण बसलो. याच दोन बाकांचा कट्टा झाला. कॉलेज कट्टा इथेच जमल्यामुळे कॉलेजविषयीची मनातली भीती पार पळून गेली. कॉलेजमध्ये  झालेली ही माझी खरी कमाई. कॉलेजमध्ये गेल्यावर पहिल्या नजरेत जिनं मला घायाळ केलं ती नीरजा. सगळयांपासून लपवयचा प्रयत्न करूनही सगळ्यांना समजलेलं ते माझं सिक्रेट... 
आणि त्यामुळे ग्रुपमध्ये संचारलेला नवा उत्साह... हाहाहा...
आॅफिसमध्ये काम करताना आता कधी तरी वाटत त्यावेळी अभ्यास केला असता तर?
तर काहीही झालं नसतं कारण ५ वर्षातल्या २० महिन्यातली पावसाळ्याची मज्जा आणि इतर पावसाळे  नुस्ते आठवले तरी त्या दिवसांत जे मिळालं ते परीक्षा मार्कमधून किती मिळालं असतं?
आत्ताही पडतोय की पाऊस, पण त्याच्यापेक्षा आठवणींची सर जास्त चिंब करते आहे..
तसं चिंब होत असताना आठवतं बरंच काही, त्याविषयी बोलायला पुन्हा इथंच भेटू..

Web Title: Collegiate chimpanzees that remember the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.