चढणवाटांवरची सायकल
By Admin | Updated: December 18, 2014 18:39 IST2014-12-18T18:39:56+5:302014-12-18T18:39:56+5:30
मानव विकास मिशनतर्फे ज्या मुलींना सायकली मिळाल्या त्या मुलींबरोबर केलेल्या एका प्रवासाची गोष्ट.

चढणवाटांवरची सायकल
मानव विकास मिशनतर्फे ज्या मुलींना
सायकली मिळाल्या त्या मुलींबरोबर केलेल्या
एका प्रवासाची गोष्ट.
एक साधीशी सायकल,
तिचं काय कौतुक?
पर्यावरणवाले किंवा फिटनेस फ्रीक वापरतात हल्ली सायकल.
बाकी तर बुंगाट बाईक्सचाच जमाना!
शाळा-कॉलेजातली पोरंसुद्धा हल्ली सर्रास बाईक्स उडवतात,
तिथं सायकलींचं
कुणाला अप्रूप असणार?
एक सायकल आयुष्यात आली तर,
असं काय जग इकडचं तिकडे
होणार आहे?
मुळात सायकल घेणं
इतकं अवघड आहे का,
ज्याची एवढी चर्चाबिर्चा करावी?
- हे असे प्रश्न ज्यांना पडतात,
किंवा असे प्रश्नसुद्धा ज्यांना पडत नाहीत
इतकं ज्यांचं जग वेगळं आहे,
त्यांनी मुद्दाम भेटावंच या उत्साही शाळकरी मुलींना !
एरवी निंदायखुरपायला जाणार्या या मुली, घरी पाठची भावंडं सांभाळणार्या,
सैपाक रांधणार्या, पाणी भरणार्या
आणि लग्न जमेपर्यंतच शाळेचं तोंड पाहणार्या या मुलींना एक साधीशीच सायकल मिळाली तर त्या म्हणतात,
‘सायकल नाही जणू इमानच चालवल्यागत वाटतंय.’
एक सायकल आली आणि
त्यांचं लग्न लांबणीवर पडलं,
दहावीच्या पुढे कॉलेजाचं तोंड पाहण्याचं स्वप्न त्यांना पडू लागलं,
आणि एवढंच नाही तर त्यांच्या बरोबरीनं
त्यांचे भाऊ, वडील आणि
गावातलीही वडीलधारी माणसं
म्हणू लागली,
‘शिक तुला शिकायचंय तर,
काय नको येऊ निंदायला !
हा असा बदल एका सायकलमुळे
होऊ शकतो, यावर विश्वास ठेवाल तुम्ही?
अवघड आहे ना,
मग पान उलटा आणि
चला या मुलींबरोबर
सायकलवरुनच त्यांच्या शाळेत
आणि परत घरी.
तरच कळेल,
सायकलवरची ही चढणीची वाटही
किती मोकळा श्वास घेऊ देते ते.
- ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com