जन्माचा जोडीदार निवडताय? पण तुमचा निर्णय योग्य आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 07:00 AM2018-10-04T07:00:00+5:302018-10-04T07:00:00+5:30

जोडीदाराची विवेक निवड या उपक्रमातून लग्नाळू मुला-मुलींना ‘संवाद’ शिकवणारा एक प्रयोग

Choosing a life partner? But is your decision right? | जन्माचा जोडीदार निवडताय? पण तुमचा निर्णय योग्य आहे का?

जन्माचा जोडीदार निवडताय? पण तुमचा निर्णय योग्य आहे का?

Next
ठळक मुद्देलग्न तर करायचंय पण पालकांना काय सांगायचं, कळत नाही! स्थळ पाहायला गेलं तर संभाव्य जोडीदाराला प्रश्न काय विचारायचे सुचत नाही!लव्ह मॅरेज केलं तरी तेच, रोमॅण्टिक बोलण्यापुढे गाडी जात नाही आणि नंतर व्यावहारिक अडचणी पायांत येतात. तेव्हा प्रश्न कसे सोडवणार? माहीत नाही! या प्रश्नांचं उत्तर काय?

  - आरती नाईक 

जोडीदाराची विवेकी निवड.
हे तीन शब्द ऑक्सिजनच्या लेखात वाचले, आणि म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडला. डॉ. दाभोलकरांच्या लेखासोबत प्रसिद्ध केलेल्या फोन नंबरवर पालकांनी आणि तरुण मुलांनीही फोन करून विचारलं की जोडीदाराची निवड करताना काही गोष्टी पारंपरिक रीतीनं आपण पाहतोच; पण हे विवेकी निवड काय? हा उपक्र म काय आहे?
तर त्या उपक्रमाविषयी आणि लग्न ठरवताना काय विचार केला जातो किंवा अजिबात केला जात नाही, हे बोलू.
आपल्या अरेंज मॅरेज या कल्पनेनुसार अजूनही मुलांची लग्न पालक स्थळं पाहून, पाहून-दाखवून ठरवतात. मुळातच लग्न या विषयावर आपल्याकडे अपुरा संवाद आहे. पालकांनी आपल्याला एवढय़ा काळजीनं, प्रेमानं वाढवलेलं असतं मग मुलांच्या लग्नाच्या बाबतीत ते वाईट निर्णय थोडीच घेणार आहेत असं मुलांना वाटतं. पालकही मुलांचं ‘भलं’ व्हावं असा विचार करून स्थळं पाहू लागतात. दुसरीकडे मुलांना पण पालकांना अजिबात दुखवायचं नसतं. उलट आपल्या लग्नाच्या निर्णयात, त्यानंतर आणि पुढे संसारातही ते मुलांना सोबत हवे आहेत.
आता दोघांचाही हेतू एकमेकांना दुखवायचा, त्नास द्यायचा मुळीच नसतो हे उघड आहे. मात्र तरीही काही संवाद होत नाही, अपेक्षा सांगितल्या जात नाहीत, आपल्याला काय हवं हे कुणी बोलत नाही, मग गैरसमज आणि विसंवाद वाढीस लागतो. लग्नाचा विषय काढला की मुलं फारसं बोलतच नाहीत असं पालकांचं मत असतं.  मुलांचं म्हणणं पडत की आमचं आणि पालकांचं छान चाललेलं असतं पण लग्न विषय आला की आमच्यात खटके उडतात. ते काही समजूनच घेत नाही, आम्ही काय म्हणतो हे त्यांना कळत नाही.
का होत असेल हे सगळं? 
कारण एकच, संवादाचा खूप मोठा अभाव.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हणूनच जोडीदाराची विवेकी निवड हा उपक्रम सुरू केला. हा उपक्रम संवादाचा दुवा होईल का, असा प्रय} सुरू केला.

संवादाची तिहेरी पायरी
संवाद म्हणजे तरी काय?
लग्न या विषयाला धरून तीन पातळीवरचा संवाद गरजेचा आहे.
1) पहिला म्हणजे स्वतर्‍चा स्वतर्‍शी होणारा संवाद.
2) पालकांशी होणारा संवाद.
3) होणार्‍या जोडीदाराशी अपेक्षित असलेला संवाद.

अरेंज मॅरेज-दहा मिनिटांत निवड?

सर्वसाधारणपणे आपल्या समाजात लग्न जुळवण्याच्या दोन पद्धती असतात अरेंज मॅरेज आणि  लव मॅरेज. अरेंज मॅरेजमध्ये पालकांचा सहभाग जास्त असतो. यात मुला-मुलींना एकमेकांना ओळखायला फारसा वाव मिळत नाही.  मिळालाच तर तो कांदेपोहेच्या वेळी गच्चीत बोलायला मिळालेली 10 मिनिटे. ड्रेस घेतानादेखील तासन्तास लावणारे लोकं या दहा मिनिटांत आयुष्याचा जोडीदार कसा बरं निवडू शकतात. मग इथंच खरी कसोटी लागते.

लव्ह मॅरेजचं आकर्षण?

जे अरेंज मॅरेजमध्ये होतं तेच लव्ह मॅरेजमध्येही. लव्ह मॅरेज, प्रेमविवाह हे ऐकायला गोड वाटत असेल, रोमॅण्टिकही वाटत असेल पण यातही तितक्याच त्नुटी आढळतात. लग्न ठरवताना फक्त त्या दोघांनीच काही  विचार केलेला असतो. पालकांचा सहभाग कुठेच नसतो. नंतर पालकांना कळतं तेव्हा त्यामुळे पालकांची नाराजी  ओढावते. ते ही मानलं तरी प्रेमात पडून लग्न करण्याचा निर्णयही अगदी विचार करून घेतलेला हा निर्णय असतोच असं नाही. कधी आकर्षणातून प्रेमात पडूनसुद्धा हा निर्णय घेतलेला असतो. या प्रेमावर आम्ही चांगलं आयुष्य जगू शकू असं आधी वाटत राहातं; पण खर्‍या अडचणी लग्न झाल्यावर जाणवायला लागतात.
पर्याय काय?
लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज या दोन्हींचा मेळ  घेऊन पालक आणि तरुण मुलं  यांना या संवादाचं महत्त्व कळलं पाहिजे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं सुरू केलेल्या जोडीदाराची विवेकी निवड हा उपक्रम ‘परिचय विवाह’ हा पर्याय मांडतो. 
म्हणजे काय तर लग्न करताना, जोडीदाराची निवड करताना काही प्रश्न आपण स्वतर्‍ला विचारले पाहिजे. पत्रिकेतले गुणच तेवढे न पाहता, आपल्या आवडीनिवडी स्पष्ट बोलल्या पाहिजे, भविष्यातली स्वप्न, विचार, जगण्याची मांडणी, लाइफस्टाइल, परिवाराची लाइफस्टाइल याविषयीही मोकळेपणानं बोललं पाहिजे. संसार करताना ज्या अडचणी येऊ शकतात, त्याविषयी बोलून मत जाणून घेतलं पाहिजे. त्यात पालकांनाही सहभागी करून घ्यायला पाहिजे.
 म्हणूनच आम्ही म्हणतो, ‘चुप्पी तोडो और रिश्ता जोडो!’

 

Web Title: Choosing a life partner? But is your decision right?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.