चांदरातीचं सेलिब्रेशन
By Admin | Updated: October 22, 2015 21:45 IST2015-10-22T21:45:58+5:302015-10-22T21:45:58+5:30
कोजागरी पौर्णिमा येत्या मंगळवारी आहे. मग तुम्ही म्हणाल सो व्हाट?

चांदरातीचं सेलिब्रेशन
कोजागरी पौर्णिमा
येत्या मंगळवारी आहे.
मग तुम्ही म्हणाल सो व्हाट?
तसंही आता कुठं आपल्याला जागरणांचं कौतूक राहिलंय.
आपण रोजच जागतो आणि लेटनाईट पाटर्य़ा करतो.
मग त्यात कोजागरीचं काय कौतूक?
आणि त्यातही दूध पिणो कार्यक्रम म्हणजे एकदम बाळूछापच!
पण ्रआपल्या जुन्याच गोष्टी फिरुन फिरुन जशा फॅशनेबल होतात तसाच यंदा कोजागिरीचा इव्हेण्टही पुन्हा चर्चेत आहे.
म्हणजे काय तर?
कोजागिरी पार्टीचं आयोजन.
ते ही आपापल्या घरांच्या गच्चीवर आणि नातेवाईकांसह.
त्यात गाण्याची मैफल. गप्पा असा जुना फॉम्यरुला.
आता काही कार्पोरेटवाल्यांना या जुन्या फॉम्यरुलात नवीन गंमत दिसू लागली आहे.
आणि म्हणून टीम स्पिरीटचा भाग म्हणून ऑफिस कोजागरीचं प्लॅनिंग होतंय.
त्यात आपापले कलागूण दाखवण्याची अनेकांनी संधी मिळतेय.
अमूकतमूक कंपनी गॉट टॅलण्ट म्हणत जो तो आपापले कलविष्कार सादर करण्याच्या स्पर्धेत आहे. त्याचे व्हिडीओ युटय़ूबवर अपलोडही होत आहेत.
एवढंच कशाला अनेक क्लासेसवाले आपापल्या गच्चीवर मुलांसाठी मैफल आयोजित करायचं घाटताहेत.
तर मुंबईत रुईयासारख्या महाविद्यालयात अनेक वर्ष कोजागरी साजरी होतेय.
त्यामुळे हे सारं बोअर, जुनाट असं समजू नका.
मस्त दोस्तांना जमवा.
कोजागिरीचं दुध आटवा. काहीतरी खायला आणा. आणि गप्पा मारत, गाणी म्हणत चंद्रप्रकाशात प्रसन्न एनर्जी मिळवा.
ट्राय करुन पहा. कदाचित हे जुन्या पद्धतीचं सेलिब्रेशनही खूप मस्त फ्रेशनेस देईल!
कारण जी गंमत आपल्या जीवाभावाच्या दोस्तांशी गप्पा मारण्यात आहे, ती एरव्ही कशात मिळावी?
-सायली देव