शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सेलिब्रेशन...ही चार दिवसांची आतषबाजी, रोषणाई तर आहेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 01:00 IST

ही चार दिवसांची आतषबाजी, रोषणाई तर आहेच.. पण हे लख्खं उजळलेले दिवे माझ्यासोबत कायम असतील आणि त्या प्रकाशात मी प्रत्येक क्षणी आनंद वेचेल. आनंद वाटेल..जगण्याचं सेलिब्रेशन मनापासून करेल! आज. उद्या. कायम.

सेलिब्रेशन.हा शब्द कधी आला आपल्या आयुष्यात.जरा काही चांगलं झालं की,आपण म्हणतो चला, पार्टी करू..चलो सेलिब्रेट करते है..पण करतो आपण खरंच सेलिब्रेट.आणि केलंच तर ‘खाणं-पिणं’धांगडधिंगा नाचणं यापलीकडेसेलिब्रेशनचा आनंद येतो आपल्या वाट्याला?- अनेकदा नाहीच!कारण पार्ट्या, खाणंपिणं, चहाच्या टपरीपासून पबपर्यंतचा दंगाहे सारं आपल्या आयुष्यात कॉमन व्हायला लागलं.विकेण्ड पार्ट्या, लॉँग ड्राइव्ह,लेट नाइट पार्ट्या हे सारं तर रुटीनच.आणि ते नियमित करूनही आपलाआनंद आपल्या मनात खोलखोल उतरत नाही.अत्तराच्या मंद गंधासारखी आपली सोबत करत नाही,आपल्या मनात दरवळत नाही..असं का?कारण आपण जगण्याचं सेलिब्रेशन करत नाही..आपल्याला छोट्या गोष्टीत आनंदच होत नाही..आईनं केलेल्या बटाट्याच्या काचºया,बहिणीच्या हातचं गोड-आंबट वरण,मित्रानं आठवणीनं आपल्यासाठी डब्यात आणलेला चिवडा,कुणीतरी आपल्यासाठी जेवायला थांबणं,कुणी आपली वाट पाहणं,आपल्याला मेसेज करून कुठेस विचारणं,पहिल्या पावसात भिजत आपल्यासाठी भजी घेऊन येणं,पौर्णिमेचा चंद्र बघ किती सुंदर दिसतोय असं फोन करून सांगणं,आपल्या वाढदिवसाला पहिला फोनकरता यावा म्हणून मध्यरात्रीपर्यंत जागणं,आणि आपण उदास असलो, चिडलो, भडकलोतरी ते समजून घेणारं कुणीतरी असणं..यासाºयात आपल्याला सेलिब्रेशन दिसत नाही.मोगºयाची मूठभर फुलं,रस्त्यावरचा प्राजक्ताचा सडा,सिग्नलवर उभी हसरी शाळकरी मुलंयांच्याकडे पाहून आपल्याला आनंद होत नाही..आणि मग आपलं सेलिब्रेशन मनात उतरत नाही..जगण्यात मुरत नाही..यंदा दिवाळी साजरी करतानासांगू ना स्वत:ला की,ही चार दिवसांची आतषबाजी आहे,रोषणाई तर आहेच..पण हे लख्खं उजळलेले दिवेमाझ्यासोबत कायम असतीलआणि त्या प्रकाशात मी प्रत्येक क्षणी आनंद वेचेल.आनंद वाटेल..जगण्याचं सेलिब्रेशन मनापासून करेल!आज. उद्या. कायम.

टॅग्स :diwaliदिवाळीDeepotsav 2017दीपोत्सव 2017