तुमच्या करिअरचा काटय़ावर काटा येईल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 07:30 IST2019-10-03T07:30:00+5:302019-10-03T07:30:11+5:30

करिअर क्लॉक काढा, आपण कुठं कमी पडतो, कोणती आपली बलस्थानं हे लिहा आणि मग बघा तुमचं करिअर उत्तम वेळ कशी दाखवतं!

career clock- learn how to earn capacities | तुमच्या करिअरचा काटय़ावर काटा येईल का?

तुमच्या करिअरचा काटय़ावर काटा येईल का?

ठळक मुद्दे‘करिअर क्लॉक’ची मांडणी करण्याचा अजून एक फायदा म्हणजे आपल्या कमतरता ओळखून त्यावर काम करण्याचा निश्चिय करणं.

-भूषण केळकर

आपण गेल्या आठवडय़ात ‘करिअर क्लॉक’ बघितलं. त्यानुसार 12 उपविभागांमध्ये तुम्ही 1-10 या स्केलवर कुठे आहात ते कागदावर नीट मांडा. तुम्ही अंदाज मांडलात तरी चालेल. 
उदा. समजा तुम्ही नाटय़ व खेळ या विषयात कॉलेजला, राज्याला रिप्रेझेन्ट केलं असेल तर तुम्ही स्वतर्‍ला 10 पैकी 7 मार्क देऊ शकता. जर बाकी काहीच नाही (नाटय़, क्रीडा इ.) परंतु इंटरमिजिएट/एलिमेंटरी परीक्षेत (ड्राइंगच्या) बी ग्रेड मिळाली असेल तर 10 पैकी 4 देऊ शकता.
असं सर्वच 12 च्या 12 उपविभागात तुम्ही स्वतर्‍ला स्कोअर देऊ शकता. 
अजून एक उदाहरण देतो जर्मन/फ्रेंच भाषा मॅक्सम्युलर वगैरे मधून शिकून बी1/बी2 पातळीर्पयत असाल तर 10 पैकी 8 मार्क देऊ शकाल. जर कोर्सेरावर ऑनलाइन कोर्स पूर्ण केला असेल तर 10 पैकी साडेचार देऊ शकाल आणि जर डय़ूलिंगोवर अनौपचारिकपणे जुजबी शिकला असाल तर 10 पैकी 2-3 मार्क गुण देऊ शकाल.
आता या सगळ्या गुणांचा फायदा असा होऊ शकतो की तुम्ही या 12 भागात जर ते नीट मांडलंत आणि त्याची एक आकृती (सोबत फोटोत दाखवल्याप्रमाणे) तयार केलीत तर तुम्हाला रेझ्युमे किंवा सीव्ही अथवा बायोडाटासाठी लागणारी माहिती, तुमच्या मुलाखतीसाठी लागणारी माहिती, एसओपी म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पजसाठी लागणारी माहिती, इंट्रोडय़ूस युवरसेल्फ या अत्यंत सर्वमान्य प्रश्नाच्या उत्तराची माहिती, ‘आम्ही तुम्हाला का निवडू’ या प्रश्नाचं उत्तर, एवढेच काय तर तुमची बलस्थाने व कमतरता सांगा (स्ट्रेंथ अ‍ॅन्ड विकनेस) याही प्रश्नाची तयारी या एका आकृतीमुळे होईल. 


कसे ते मी सांगतो, पण त्याआधी  पूर्ण झालेलं तुमचं ‘करिअर क्लॉक’ बघा.  याला ‘स्पायडर वेब करिअर क्लॉक’ म्हणता येईल!
उदाहरणादाखल घेतलेल्या एखाद्या मुला/मुलीच्या ‘करिअर क्लॉक’मध्ये दिसतंय की 3, 6 व 8 या बाबी म्हणजे परकीय भाषा प्रावीण्य (3) नेतृत्वगुण (6) व प्रत्यक्षानुभव (8) यामध्ये हा मुलगा/मुलगी 8 व 9 स्कोअरवर आहे. मात्र याचा वापर आपण कसा करायचा?
रेझ्युमेच्या समरी या भागामध्ये या मुला/मुलीने वरील तीनही गोष्टी प्रथम मांडाव्यात, ‘डिस्क्राइब युवरसेल्फ’च्या उत्तरातही त्या चटकन सांगाव्यात. अर्थातच स्ट्रेंथ्स/बलस्थानांमध्ये त्या सांगाव्यात आणि व्हाय वी शूड सीलेक्ट यू? याच्याही उत्तरात ते प्रथम व अग्रक्रमाने यावे!
बाकी गोष्टी त्या मानाने कमी स्कोअरच्या असल्याने त्याबाबत खूप जोर देऊन या मुला/मुलीने लिहू-बोलू नये! 
विकनेस विचारला तर (अभ्यासपूरक गोष्टीतील कमतरता (4) व शोधनिबंध नसणं (12) हे मांडावं. त्या दोन्हीत या मुला/मुलीचा स्कोअर केवळ 1 आहे.
‘करिअर क्लॉक’ची मांडणी करण्याचा अजून एक फायदा म्हणजे आपल्या कमतरता ओळखून त्यावर काम करण्याचा निश्चिय करणं.
ते केलं तर आपल्या करिअरचं घडय़ाळ आपल्यासाठी उत्तम वेळ दाखवू शकेल!

Web Title: career clock- learn how to earn capacities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.