तुम्हाला नेलपॉलिश लावता येतं?

By Admin | Updated: September 4, 2014 16:27 IST2014-09-04T16:27:06+5:302014-09-04T16:27:06+5:30

नेलपॉलिश घेतली, चोपडली नखांवर तर चांगली दिसेल ? नेलपॉलिश लावणं हे सुद्धा एक स्किलच आहे !

Can you use helpless? | तुम्हाला नेलपॉलिश लावता येतं?

तुम्हाला नेलपॉलिश लावता येतं?

>धनश्री संखे, ब्यूटी एक्सपर्ट
 
म्हटलं तर किती सोपा, पण सोडवायला गेलं तर फार अवघड प्रश्न नेलपॉलिश कसं निवडायचं?
अनेक मुली तर मिळेल तिथून मिळेल ते नेलपेण्ट खरेदी करतात आणि हाताना चोपडतात. तेवढय़ापुरतं ते चांगलं दिसतंही असेल, पण ते खरंतर ‘चांगलं’ नसतं ! मग चांगलं नेलपॉलिश कसं 
निवडायचं? मुळात नेलपॉलिशमध्ये ट्रेण्डी काय? महागडे म्हणजे चांगले असं काही नेलपेण्टमध्ये असतं का? सुंदर निमुळती बोटं, नाजूक नखं हे सौंदर्याचं परिमाण असतं का?
- यासा-या प्रश्नांची उत्तरं समजून घेतली पाहिजेत, कारण नेलपॉलिश हा अनेकींच्या आयुष्यात आज अत्यंत महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग झाला आहे. ब:याच जणी तर अशा असतात की ज्या नेलपॉलिश लावल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊलही टाकत नाहीत. त्यांच्यासाठी आणि खरंतर सगळ्याच मुलींसाठी या काही स्मार्ट टीप्स.
1) आपली त्वचा, केस आणि डोळे आपल्या आरोग्याविषयी बोलतात हे तर तुम्हाला माहिती आहेच, पण तितकीच आपल्या आरोग्याची माहिती देतात आपली नखं. जरा हात डोळ्यासमोर धरा, आणि पहाच एकदा की, आपलं आरोग्य कसंय!
2)   अनेकजणी नेलपॉलिश कोणतं घ्यायचं याविषयी जागरुक असतात, पण नखं आपली भयानक अवस्थेत आहेत, हेच विसरुन जातात. त्यामुळं जरा नखं काय सांगताहेत ते ऐकाच.
3)  नखं मुळात स्वच्छ असली पाहिजे, अनेकींच्या नेलपेण्ट चोपडलेल्या नखांमधे खूप घाण असते. नखात घाण असेल तर ती वाढत नाहीत, वाईट दिसतात.
4)   नेलपॉलिश निवडताना एक लक्षात ठेवायचं की ती अॅक्सेटोन फ्रीच असली पाहिजे. नेलपॉलिशमधल्या 
अॅक्सेटोनमुळे नखांची मूळ चमक निघून जाते.
5)  सतत नखांवर अती मॉईश्चुरायझर असलं तरी नखं कोरडी, रखरखीत होऊ शकतात.
6)  तुमची नखं जर कोरडीच असतील तर त्यावर क्लिअर नेलपॉलिश लावा. बाजारात अनेक ब्रॅण्डच्या क्लिअर नेलपॉलिश मिळतात. 
7)   तुमची नखं खूपचं पातळ असतील तर ‘हार्डनर्स’ प्रकारची नेलपॉलिश निवडा. नेलपॉलिश लावण्यापूर्वी बेस कोट म्हणून हे हार्डनर्स वापरता येतात. त्यात ‘फायबर’ असतं.
8)   नेलपॉलिश लावताना कायम क्लिअर पॉलिश बेस कोट आणि टॉप कोट लावायचाच.
9)    नेलपॉलिश न लावता नखं तशीच ठेवायलाही अधनमधनं हरकत नाही. सतत केमिकलचा मारा नको. त्याऐवजी रोज रात्री झोपताना कापसाने नखांना खोबरेल तेल, पेट्रोलियम जेली, मायश्चरायझर लावणं उत्तम.
10)  आपले हात नाजूक दिसावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर नखांना गोल आकार द्या. ते दिसतातही चांगले आणि गोल नखांमध्ये घाणही कमी अडकते.
 
 

Web Title: Can you use helpless?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.