CAGE व्यसनांचा सापळा

By Admin | Updated: October 22, 2015 21:49 IST2015-10-22T21:49:29+5:302015-10-22T21:49:29+5:30

दुर्दैवानं कुणा ओळखीच्या व्यक्तीला किंवा कुटुंबातील कुणाला व्यसनानं घेरलं तर करायचं काय?

Cage addiction trap | CAGE व्यसनांचा सापळा

CAGE व्यसनांचा सापळा

 दुर्दैवानं कुणा ओळखीच्या व्यक्तीला किंवा कुटुंबातील कुणाला व्यसनानं घेरलं तर करायचं काय?  इंग्रजी उअ¬ए या शब्दात मोठा अर्थ सामावलेला आहे. त्या शब्दातले प्रत्येक अक्षर एक प्रश्न निर्माण करतं आणि काय काळजी घ्यावी याची माहिती देतं.

 
सावध होण्याचे 4
सिगAल
1) पहिला मोठा सी म्हणजे कन्सर्न.
- काळजी वाटते का? व्यसन करणा:या माणसाला मनापासून आपलं व्यसन वाढत आहे असं वाटतं का? आणि छोटा सी म्हणजे कुटुंबातल्या माणसांना ती त्याच्या व्यसनामुळे काळजी करायला लावते का?
2) दुसरा मोठा ए म्हणजे अॅन्झायटी. व्यसन करत असलेल्या माणसाला व्यसन करण्याची कधी संधी मिळेल? त्यासाठी पैसे कसे उभे राहतील याची चिंता वाटत असते. आणि वियोग लक्षणो सुरू झाली तर आपल्याला ती सहन होतील का याची चिंता असते. तर छोटा ए-अॅँगरचा. घरातल्या माणसांना त्याच्या व्यसन करण्यामुळे प्रचंड संताप होतो. पत्नी आणि आई म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार अशा अवस्थेत राहतात, तर पुरु ष मंडळी ‘चार लाफे दिल्याशिवाय सरळ व्हायचा नाही’ अशा आवेशात असतात. प्रसंगी हात उगारायला कमी करत नाहीत.
3) तिसरा जी म्हणजे गिल्ट. व्यसनी व्यक्तीच्या दृष्टीने गिल्ट -अर्थात आपण चुकलो आहोत, चुकत आहोत अशी भावना त्याच्या मनात असते. म्हणून तो माङया हातून तसे परत घडणार नाही याची आश्वासनं देतो का? कुटुंबाचीसुद्धा अपराधीपणाची भावना असते. आईला वाटते- ‘माङया संस्कारांमध्ये काही उणीव तर राहिली नाही ना? पत्नी म्हणते- मी त्याला प्रेम द्यायला कमी तर नाही पडले?
4) शेवटचा ई- म्हणजे एम्पटीनेस : आपल्या आयुष्यात करण्यासारखे काही राहिले नाही. काय करावे समजत नाही. एक न संपणारे रिकामपण आणि त्यातून वाढणारे व्यसन. कुटुंब अप्रत्यक्षपणो त्याचे व्यसन वाढायला कारणीभूत ठरते. त्याला इंग्रजी भाषेत म्हणतात एनॅबलिंग. व्यसनी व्यक्तीला पैसे देणो, त्याच्या व्यसन करण्याच्या कारणांवर विश्वास ठेवणो, त्याचे व्यसन झाकण्याचा प्रयत्न करणो अशा अनेक गोष्टी कुटुंबीयांकडून अभावितपणो होत राहतात आणि प्रश्न गंभीर राहतो.
 
 
घरात व्यसन शिरलं असेल तर? 
1) ज्या घरात व्यसन चालू आहे किंवा नुकताच प्रवेश झाला आहे त्या सर्वांनी वर दिलेल्या गोष्टी घडत असतील तर कुटुंबीयांनी ताबडतोब लक्ष घालणं आवश्यक आहे. सर्वप्रथम हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की व्यसन करणारा माणूस कधीही आपण होऊन व्यसनाच्या आजारासाठी उपचार घेण्यास तयार असत नाही. फार फार तर व्यसनाचे परिणाम म्हणून अपचन, पित्त, उलटय़ा होणं, रक्तदाब वाढणं अशा प्राथमिक शारीरिक त्रसांसाठी डॉक्टरकडे जाईल; परंतु नशा बंद करा हा डॉक्टरांचा सल्ला मानणार नाही.
2) व्यसनाच्या आजारावर कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नाही. याबाबतीत संशोधन चालू आहे. परंतु भारतात ती औषधे उपलब्ध झालेली नाहीत. व्यसन करण्याने होणारा त्रस कमी व्हावा म्हणून काही औषधे आहेत. व्यसन अचानक बंद केले तर होणारा त्रस कमी करण्याची औषधे आहेत. नशेबद्दल घृणा वाटावी किंवा कितीही नशा केली तरी नशेचा अपेक्षित परिणाम न मिळवून देणारीही औषधे आहेत.
3) पर्यायी जडीबुटी, काढे, गोळ्या देऊन व्यसन सोडवा असा दावा करणारी औषधे आणि दारू सोडवा अशी जाहिरात करणारे अनेकजण भेटू शकतात; परंतु त्यांचे उपचार अजून शास्त्रीय कसोटय़ांवर सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी अशा उपचारांवर विश्वास ठेवून खर्च करू नये.
4) व्यसनाचे उपचार एक व्यक्ती एकटीच करू शकत नाही. त्याकरता शारीरिक व्याधींसाठी फिजिशियन, त्यातील मेंदूशी आणि भावनांवर उपचार करण्यासाठी मनोविकारतज्ज्ञ, मानसोपचारक आणि योगशिक्षक एकत्रितपणो उपचार देत राहतील तेव्हा व्यसनाचा आजार बरा होण्याची शक्यता वाढते. हे सगळे उपचार घरी राहून करता येतात. व्यसनी जर हिंसक होत नसेल, कामावर जात असेल आणि व्यसन केले नाहीतर त्याला वियोग लक्षणांचा फार त्रस होत नसेल तर हे उपचार नक्कीच उपयोगी ठरू शकतात.
5) या उपचारांच्या जोडीला आणि खर्चाची तयारी नसेल तर - अनामिक मद्यपी ही संघटना अतिशय प्रभावी ठरते. या सभा बहुतेक सर्व मोठय़ा शहरांत होतात. त्या सभांतून व्यसनांपासून काही दिवसांपासून काही वर्षांपर्यंत लांब राहणारे मित्र जमतात. मी व्यसनात कसा अडकलो होतो, त्याचा मला किती त्रस झाला आणि त्यातून मी कोणत्या गोष्टी करून बाहेर पडलो याचे अनुभव सांगतात. ते अनुभव नीट ऐकले तर व्यसनमुक्त राहण्याची प्रेरणा मिळते. त्या सभेतला मित्र आपल्याप्रमाणो व्यसनमुक्त राहावा म्हणून सर्वतोपरी मदत करतात.
6) या संघटनेच्या सभा होतात तिथेच व्यसनी व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या पण सभा होतात. व्यसनामुळे कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडलेले असते. व्यसन घरात आले तर आपण काय केले पाहिजे, काय टाळले पाहिजे या अनुभवांची देवाण-घेवाण होते आणि कुटुंबीयांना मोठा आधार मिळतो. 
हे सारे प्रयत्न अपुरे पडले तर व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करावे लागते.
हा शेवटचा आणि जगात सर्व ठिकाणी महत्त्वाचा उपाय मानला जातो.
 
- आनंद पटवर्धन 
सहकार्य- मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणो 

Web Title: Cage addiction trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.