BX 9059
By Admin | Updated: March 11, 2016 12:15 IST2016-03-11T12:15:18+5:302016-03-11T12:15:18+5:30
टाटा हॉस्पिटलमधला हा माझा फाईल नंबर. त्या हॉस्पिटलच्या असंख्य पेशंट्सपैकी आता मी एक, आणि हा नंबर हीच माझी नवी ओळख. कॅन्सर तर होताच, पण तो आता माझा जीव घेणार नव्हता. मग त्याच्यासह टाटा हॉस्पिटल नावाच्या मुंबईतल्याच पण मुंबईहून वेगळ्या दुनियेतला प्रवास सुरू झाला.

BX 9059
>कॅन्सर डेज - ऐन विशीत कॅन्सरशी सामना करून मिळवलेल्या हिमतीची जिगरबाज गोष्ट
आपल्याला कॅन्सर झालाय हे कळलं.आणि माझे त्याकाळचे सगळे सो कॉल्ड ‘गंभीर’ प्रश्न मागे सारत मला हादरवून सोडणारं खरंखुरं गंभीर असं काहीतरी आता समोर उभं होतं.
जे वेगळं होतं, नवीन होतं आणि अर्थातच सोपं नव्हतं. कॉलेज, फ्रेंड्स, डेटांगभोवती फिरणारी गाडी भलत्याच ट्रॅकवर चालली होती.
मला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला होता.
आणि त्याची ट्रिटमेण्ट सुरू होणार होती.
पुढचे 8 महिने टाटा हॉस्पिटलच्या वा:या सुरू होणार होत्या. या संपूर्ण ट्रिटमेण्ट काळात मला मिळालेलं अटेन्शन, कधी न मिळालेलं प्रेम आणि सतत काहीतरी वेगळं घडतंय याचं थ्रील या सगळ्यांमुळे किमोथेरपी, सजर्री आणि रेडिएशन हे सगळे टप्पे फारच मंतरलेले होते. आज ‘त्या’ दिवसांकडे मागे वळून पाहिलं तर खूप वेगळं वाटतं.
पण एक नक्की, आपण फार काही ग्रेट केल्यासारखं आणि खूप काही सोसलं, मिळवलं असं मात्र नक्कीच वाटत नाही. हां! ‘टाटा हॉस्पिटल’ या एका वेगळ्या, मुंबईतच असलेल्या आणि तरीही मुंबईहून अधिक वेगानं पळणा:या दुस:याच मुंबईशी माझी ओळख झाली. याच मंतरलेल्या दिवसांची ही गोष्ट. मला भावलेली माणसं, प्रसंग आणि अर्थातचं मला भेटलेल्या कॅन्सरची गोष्ट.
बीएक्स 9059
हा माझा फाईल नंबर.
टाटा हॉस्पिटलच्या असंख्य पेशंट्सपैकी आता मी एक. आणि हा नंबर होता माझी ओळख. प्रचंड गर्दी असलेल्या वेटिंग रूममध्ये मी माझा नंबर येण्याची वाट पाहात बसले होते. मी, बाबा आणि गिरिजा काकू. मी नवा पेशंट असल्यानं आम्हाला लगेचच आत बोलावलं. छोटय़ा छोटय़ा एक्ङॉमीन रूम्स असलेल्या त्या ब्रेस्ट ओपीडीमध्ये सिस्टर्स, डॉक्टर्स, पेशंट्स आणि त्यांच्या नातेवाइकांची लगबग सुरू होती. मला एका एक्झामीन रूममध्ये जाऊन ‘रेडी’ व्हायला सांगितलं. मी प्रचंड घाबरले होते. खूप बायका अर्थातच माङया वयापेक्षा मोठय़ा. माङया डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं. सतत एकच भीती वाटतं होती. ब्रेस्ट काढून टाकला तर, कारण माङया मामे बहिणीलाही ब्रेस्ट कॅन्सर होता. तिचा एक स्तन काढून टाकला होता. आईला ओव्हेरिअन कॅन्सर. दोघीही आता या जगात नव्हत्या आणि आता मी. त्याच वाटेनं जाण्याच्या उंबरठय़ावर उभी होते.
किती महिने, किती र्वष असणार माङया हातात? किमोथेरपीमुळे वाटय़ाला आलेलं अशक्त, विद्रूप आयुष्य आईच्या रूपानं मी पाहिलं आणि अनुभवलेलंही होतं वयाच्या 16व्या वर्षी. एका दिवशी सकाळी उठले तेव्हा घरात खूप माणसं जमा झाली होती. तेव्हा मला कळलं की आई गेलीय. मी 16 आणि माझी बहीण 10 वर्षाच्या होतो तेव्हा. बाबांशी काही संवादच नव्हता. सगळं आईच्या माध्यमातूनच व्हायचं. ट्रीपला जायची परवानगी ते प्रगतिपुस्तकावर सह्या. आता बाबांशी थेट संवाद साधावा लागणार होता. त्यांचा राग, त्यांचं फ्रस्ट्रेशन, त्यांचा मार हे सगळं सहन करत आता कुठे त्याची सवय होत होती आम्हाला आणि आता हे नवं संकट.
टाटामधल्या त्या छोटय़ाश्या एक्झामीन रूममध्ये हे गेल्या 8 वर्षातलं आमचं जगणं एखाद्या सिनेमासारखं भर्रकन माङया डोळ्यासमोरून गेलं. डॉ. राजेंद्र बडवे माङो डॉक्टर आणि टाटा हॉस्पिटलच्या ब्रेस्ट युनिटचे एचओडी. माङया मनात शंकांचं काहूर माजलं होतं. बाहेर बाबा उभे होते. त्यांच्यासमोर मला कोसळायचं नव्हतं. पण विचारायची हिंमत होत नव्हती.
डॉ. बडवे प्रसन्न हसले, म्हणाले, ‘घाबरू नका’!
त्यांनी मला तपासलं. ब्रेस्टसह मान, काख, गळा आणि पोटही तपासलं. शरमेनं आणि भीतीनं डोकं सुन्न होतं. त्यानंतर पुढच्या 8 महिन्यांत अशा प्रकारे तपासणी अनेकदा झाली. वेगवेगळे डॉक्टर्स आणि वेगवेगळ्या एक्झामिनेशन रूम्स. हळूहळू त्याची लाज आणि भीतीही वाटेनाशी झाली.
तर वेटिंग रूममध्ये पहिल्यांदा मी, बाबा, गिरिजा काकू वाट बघत होतो. ते म्हणाले, ‘कॅन्सर आहे.’
आणि त्यानंतर डॉक्टर तेच बोलले, ज्याची मला सर्वात जास्त भीती वाटत होती. ‘‘किमो घ्यावी लागेल’’
‘.. बट आय प्रॉमीस, किमोनंतर तुङो केस आत्ता आहेत तसेच पुन्हा नव्यानं येतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वी आर नॉट गोईंग टू रिमुव्ह द ब्रेस्ट!’
ते ऐकलं तेव्हा पचवणं अवघड होतं. पण आता मी म्हणोन ही दोन्ही माङयासाठी टर्निग पॉईण्ट होती. मी ज्याप्रमाणो विचार केला होता म्हणजे जास्तीत जास्त नुकसान म्हणजे मृत्यू; तो टळला होता.
त्यामुळे पुढचा मार्ग सुकर झाला होता.
माझं एम. ए. आणि जर्मन भाषेचं शिक्षण चालू होतंच.
दुसरीकडे ही कॅन्सरची ट्रिटमेंट.
कॅन्सर तर होता, पण तो आता माझा जीव घेणार नव्हता.
अर्थात मी तो त्याला घेऊ दिला नाही तर...
- शची मराठे
( कॅन्सरशी यशस्वी लढा देऊन आशावादी जगणं जगणारी शची ही एक मुक्त पत्रकार आहे. आणि न्यूज चॅनलमध्येही तिनं काम केलेलं आहे.)
shachimarathe23@gmail.com