फक्त एका क्लिकवर बिझनेस

By Admin | Updated: October 15, 2015 17:44 IST2015-10-15T17:44:37+5:302015-10-15T17:44:37+5:30

एकाचं हॉटेल, दुस-याची ऑर्डर आणि ऑनलाइन मदत करून घरपोच ऑर्डर पोचवायचं काम. कोल्हापूरच्या दोस्तानं कसं जमवलं?

Business with just one click | फक्त एका क्लिकवर बिझनेस

फक्त एका क्लिकवर बिझनेस

>- तांबडा-पांढरा असो, की स्वादिष्ट पुरणपोळी आणि कटाची आमटी प्रत्येक खाद्यपदार्थाची चव कोल्हापुरात चाखायला मिळते. पावलोपावली हॉटेल, घरगुती खानावळी हे कोल्हापूरचे एक वैशिष्टय़. असं असतानाही ऑनलाइन ऑर्डर घेऊन गरमागरम जेवण घरपोच देण्याची वेगळी कल्पना मॅकेनिकल इंजिनिअर असलेल्या महेश पिसे यानं इथं प्रत्यक्षात आणली. 
   कोल्हापूर जिल्ह्यातील मूळचे चिंचवाड (ता. करवीर) इथला हा महेश. केआयटी कॉलेजमधून  मेकॅनिकल  इंजिनिअर आणि ‘मास्टर इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट’ची पदवी त्यानं मिळविली. त्यानंतर नोकरीनिमित्त इंग्लंड गाठलं. तिथं एका तेल कंपनीत इंजिनिअर म्हणून काम केलं. पण ते सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी तो वर्षभरानंतर कोल्हापुरात आला.  मॅकेनिकलचा व्यवसाय सांभाळत असतानाच ही ऑनलाइन जेवण पुरविण्याची वेगळी कल्पना त्यांना सुचली. 
‘सिट इन इट’ हे संकेतस्थळ त्यांनी सुरू केलं. त्यावर त्यांनी शहरातील काही हॉटेल, त्याठिकाणी उपलब्ध असणारे खाद्यपदार्थ, त्यांचे दर इत्यादी गोष्टींची नोंद केली. संकेतस्थळावरील हॉटेल आणि हवा तो मेन्यू निवडून त्याची ऑनलाइन ऑर्डर नोंद केल्यानंतर 45 मिनिटांत गरमागरम जेवण घर अथवा कार्यालयांत त्यांच्याकडून पोहोचविले जाते. त्यासाठी ते ऑर्डरच्या एकूण बिलावर काही टक्के कमिशन घेतात. हॉटेलमधील जेवणाचा आस्वाद घ्यावयाचा आहे, पण वेळ अथवा काही कामानिमित्त तिथंर्पयत जाणो शक्य नाही. अशा लोकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरत आहे. 
महेश सांगतो, इंग्लंडमधील मंदीच्या स्थितीमुळे कोल्हापुरात मेकॅनिकलचा व्यवसाय करण्यासाठी परत यायचं ठरवलं. परदेशातून यंत्रसामग्रीची मागणी केली. त्याला येण्यास काही महिन्यांचा कालावधी होता. हा वेळ वाया घालविण्याऐवजी सेवाक्षेत्रत काही तरी, वेगळा प्रयोग करण्याचे सुचलं. त्यात इंग्लंडमध्ये असताना ‘जस्ट इट’ या ऑनलाइन सेवेद्वारे घर, कार्यालयांत जेवण मागविले होतं. त्यावर हीच कल्पना ‘सिट इन इट’ म्हणून कोल्हापुरात राबविण्यास सुरुवात केली. लोकांना घरपोच सेवा मिळू लागली आणि या उपक्रमातून चार मुलांना त्यांनी रोजगारही उपलब्ध झाला. 
सेवाक्षेत्रतील वेगळ्या कल्पनांना सध्या चांगले दिवस आहेत. शिवाय येत्या काही वर्षात या क्षेत्रतील ‘टर्न ओव्हर’ मोठा असणार असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सेवाक्षेत्रत नक्की काम करून आपण नव्या संधी शोधायला हव्यात, असं महेश पिसे सांगतात.
 
- संतोष मिठारी
 
 

Web Title: Business with just one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.