दणक्यात उडवताय बार? सावधान महागात पडेल !
By Admin | Updated: October 30, 2014 20:27 IST2014-10-30T20:27:44+5:302014-10-30T20:27:44+5:30
‘लॅव्हिश’ वेडिंग करायचंच असं ठरवलंय तुम्ही? -मग थांबा, तुमचं लग्न टिकण्याचे चान्सेस जरा कमी आहेत, म्हणजे एवढा सगळा खर्च वाया जाण्याची शक्यताच जरा जास्त आहे!!

दणक्यात उडवताय बार? सावधान महागात पडेल !
>यंदा ‘कर्तव्य’ आहे तुम्हाला? ठरलंय लग्न ? साखरपुडा झालाय? प्रेमात पडला आहात? ‘ठरवून’ लगA करण्यासाठी ‘पाहण्या’चे कार्यक्रम सुरू आहेत.? आणि आवडलंच कुणी की, द्यायचाय उडवून बार?
दणक्यात!!
थाटामाटात असं लग्न करायचं की, लोक पाहत राहिले पाहिजेत! प्रचंड खर्च करून ‘लॅव्हिश’ वेडिंग
करायचंच असं ठरवलंय तुम्ही? -मग थांबा, तुमचं लग्न टिकण्याचे चान्सेस जरा कमी आहेत, म्हणजे एवढा सगळा खर्च वाया जाण्याची शक्यताच जरा जास्त आहे!!
-विश्वास नाही बसत ना?
अमेरिकेतल्या एका विद्यापीठानं प्रसिद्ध केलेल्या अभ्यासाचं ठाम मत आहे की, जी जोडपी लगAात प्रचंड खर्च करतात, त्यांची लगA कमी टिकतात.
त्याउलट जी जोडपी कमीत कमी खर्चात लग्न करतात,
त्यांची लग्न तुलनेनं जास्त टिकतात,
ती जोडपी जास्त खुशीत असतात !
-नाही ना विश्वास बसत?
- ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com