शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

बुमरा  आणि  शमी - हे दोन फास्टर्स ऑस्ट्रेलियात चालतील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 5:04 PM

भारतात फास्ट बॉलर्स जन्माला येत नाहीत, हा जुनाट समज मोडीत काढत हे दोघे नवा इतिहास लिहितील का?

- अभिजित पानसे

आयपीएल म्हणजे गोलंदाजांसाठी स्मशानभूमी असते. बॅट्समन फ्रेण्डली खेळपट्टय़ांप्रमाणेच बॅट्समन फ्रेण्डली नियमांमुळे बॉलर हे फक्त बॉलिंग मशीन म्हणून वापरण्यात येत आहे अशी स्थिती भासते. त्यातही यावर्षी आयपीएल जेव्हा यूएईमध्ये भरवण्यात येत आहे तेव्हा वाळवंटातील खेळपट्टय़ा वेगवान बॉलरला मुळीच मदत करणार नाही, इथे स्पीन बॉलरचा बोलबाला असेल हे क्रि केट तज्ज्ञांनी वर्तवलं होतं. जे खरंसुद्धा आहे. पण चार दिवसांपूर्वी रविवारी जे झालं ते अद्भुत होतं. एकाच दिवशी तीन सुपर ओव्हर्स झाल्या. त्या दिवशी दोन सुपर ओव्हर्समध्ये वेगवान बॉलरनं जी कामगिरी केली ती अफाट होती. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट ही की ते दोन्ही वेगवान बॉलर्स भारतीय आहेत.जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या दोघांनी जो खेळ दाखवला ती आहे बॉलिंगची ताकद. आणि टेस्टमध्ये टिच्चून केलेल्या बॉलिंगच्या कौशल्याची कमाल.भारतीय क्रि केट इतिहासातील बुमराह हा सर्वोत्तम वेगवान बॉलर आहे असं सोशल मीडियावर म्हटलं जातंच. जे खरंही आहे.पण मोहम्मद शमी, योग्य यॉर्कर टाकणं हे वेगवान बॉलरसाठी अत्यंत कठीण काम असतं. यॉर्करसाठी प्रचंड शिस्त, सराव लागतो. संपूर्ण शरीराचा त्यात सहभाग असतो. बहुतेकवेळा कठीण आणि नाजूक परिस्थितीमध्ये यॉर्कर टाकताना तो फूलटॉस पडतो, तर क्वचित बीमर होतो. दोन्ही गोष्टी बॉलरला मारक ठरतात; पण फक्त पाच धावा वाचवताना सहाही बॉल्स मोहम्मद शमीनं अचूक यॉर्कर टाकले. त्यानंतर पुढचा इतिहास आता सर्वज्ञात आहे.त्या दिवशी सामना कोणत्या टीमनं जिंकला हे महत्त्वाचं नसून दोन भारतीय वेगवान बॉलर्सने जो बॉलिंगचा शो केला तो अद्भुत होता.

के.एल. राहुलने परवा एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, तो व संपूर्ण टीम सुपरओव्हरसाठी मानसिकरीत्या तयार नव्हती. कोणाला बॉलिंग द्यावी हेही समजत नव्हतं. फक्त पाच धावा केल्यावर सामना हरलोय हे सगळ्यांनी स्वीकारलं होतं; पण मोहम्मद शमीनं त्याला म्हटलं की तो सहाही बॉल यॉर्कर टाकू शकतो. लॉकडाऊनच्या संपूर्ण काळात मोहम्मद शमीनं त्याच्या उत्तर प्रदेशातील फार्महाऊसच्या खेळपट्टीवर दररोज सराव केला. त्यामुळे जिथे बहुतेक सर्व खेळाडू आयपीएलमध्ये सुरुवातीला ‘आऊट ऑफ टच’ दिसलेत तिथे मोहम्मद शमी मात्र पहिल्या सामन्यापासून पूर्ण फॉर्ममध्ये आहे.               लॉकडाऊनचा काळ त्यानं आपल्या बॉलिंगवर मेहनत करण्यात घालवला.  त्यामुळे तो नाजूक स्थितीत सहा सलग अचूक यॉर्कर टाकू शकला. याशिवाय मोहम्मद शामीनं ‘नकल बॉल’चं अस्रही आपल्या भात्यात वाढवलं आहे.दीड महिन्यानी भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जात आहे. चार कसोटी सामन्यांची मानाची मालिका भारत खेळणार आहे. शिवाय यात प्रथमच डे- नाइट कसोटी खेळणार आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी भारताचे हे दोन्ही वेगवान बॉलर्स आता ऑस्ट्रेलिया दौर्‍यात जबरदस्त कामगिरी करतील आणि भारतीय फास्टर्सचा दरारा जगाला दाखवतील, अशी आशा आहे.भारतात फास्ट बॉलर्स जन्माला येत नाहीत, ही जुनाट प्रथाच हे दोघं मोडीत काढून नवी वाट चालतील अशी आशा तरी आहे.

( अभिजित ब्लॉगर आहे.)